एक्स्प्लोर

Actress Alka Kubal on Sexual Harassment: '...तर मुलींनी बापाचा खून करावा', अभिनेत्री अलका कुबल कडाडल्या; नेमकं काय म्हणाल्या?

Actress Alka Kubal on Sexual Harassment: महिलांवर अत्याचार रोखायचं असतील तर आखाती देशांप्रमाणे कठोर कायदे असायला हवे, त्यात एखादा बापच जर मुलीवर अत्याचार करत असेल तर मुलींनी अशा बापाचा खूनच करायला हवा, असं अलका कुबल म्हणाल्या.

Actress Alka Kubal On Sexual Harassment: बाप जर मुलींवर बलात्कार करत असेल, तर मुलींनी अशा बापाचा खूनच करावा, असं खळबळजनक वक्तव्य अभिनेत्री अलका कुबल यांनी केलं आहे. महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी आपल्या देशातही आखाती देशांप्रमाणे कठोर कायदे असायला हवेत, असं आवाहनही अलका कुबल यांनी केलं आहे. दरम्यान, जळगावमध्ये झालेल्या खान्देश करिअर महोत्सवाच्या निमित्तानं अभिनेत्री अलका कुबल (Marathi Actress Alka Kubal) जळगावमध्ये उपस्थित होत्या, त्यावेळी  अनेक सामाजिक आणि कौटुंबिक विषयांना स्पर्श करणारी मुलाखत त्यांनी माध्यमांना दिली.  

खान्देश करिअर महोत्सवासाठी अभिनेत्री अलका कुबल यांनी हजेरी लावली होती. या महोत्सवासाठी अभिनेत्री अलका कुबल उपस्थित होत्या. त्यावेळी त्या म्हणाल्या की, महिलांवर अत्याचार रोखायचं असतील तर आखाती देशांप्रमाणे कठोर कायदे असायला हवे, त्यात एखादा बापच जर मुलीवर अत्याचार करत असेल तर मुलींनी अशा बापाचा खूनच करायला हवा, अशी उद्विग्न होत संतापजनक प्रतिक्रिया अभिनेत्री अलका कुबल यांनी जळगावमध्ये दिली आहे.
 
अलका कुबल म्हणाल्या की, "पालकांनी प्रत्येक मुलाचा कल ओळखणं आवश्यक आहे. फक्त इंजिनिअर, डॉक्टर किंवा वकील बनणं हेच ध्येय नसावं. शेती, नर्सिंग, शिक्षण क्षेत्रासह इतर अनेक क्षेत्रातही मुलं उजळू शकतात.याकडेही लक्ष द्यायला हवं. मुलांचे मानसिक आरोग्य बिघडू नये, म्हणून पालकांनी मुलांवर अपेक्षांचं ओझं टाकू नये. कमी मार्क मिळाले तरी योग्य दिशा दिल्यास या मुलांचं यशस्वी करिअर घडू शकतं."

लहान वयातच मोबाईलच्या अतिरेकामुळे मूलभूत संस्कार हरवत चालले आहेत. घरात मोठ्यांचे मार्गदर्शन आणि एकत्रित कुटुंबपद्धतीमुळे चांगले संस्कार रुजतात, असा  आपला अनुभव असल्याचं अलका कुबल यांनी सांगितलं आहे. स्वतःच्या करिअरमध्ये सासू-सासऱ्यांच्या पाठिंब्यामुळे आणि योगदानामुळे आपल्याला यश मिळालं, हे त्यांनी खासपणे नमूद केलं आहे, असंही अलका कुबल म्हणाले. 

अलका कुबल म्हणाल्या की, "वडिलांनी मुलींवर अत्याचार केल्याच्या बातम्यांवर तीव्र प्रतिक्रिया देत, अशा बापावर आखाती देशा प्रमाणे कठोर कारवाई व्हायला पाहिजे, एवढंच नव्हे तर मुलींनी अशा बापाचा खून करायला पाहिजे अशी प्रतिक्रिया अलकाकुबल यांनी दिली आहे." तसेच, पुढे बोलताना अलका कुबल म्हणाल्या की, एकटेपणा सुखद नाही, कुटुंब हवंच, आई होण्याचा अनुभव जगातला सर्वोत्तम आहे.
 
दरम्यान, अलका कुबल यांनी त्यांच्या वर्कफ्रंटबाबतही माहिती दिली. येत्या 24 एप्रिलला वजनदार हे मराठी नाटक प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. याशिवाय त्या एका हिंदी वेब सीरिजमध्येही दिसणार आहेत. तसेच, एक टेलिव्हिजन शो आणि मराठी चित्रपटांसाठीही अलका कुबल काम करत आहेत. 

पाहा व्हिडीओ : महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटनांवर अलका कुबल यांनी व्यक्त केला संताप

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Best Suspense Thriller Film On OTT: हिरो नसलेली दमदार थ्रिलर फिल्म, पाचव्या मिनिटालाच होतो मर्डर; क्लायमॅक्समध्ये उलगडतं 'रक्तरंजित रहस्य'

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Delhi Blast Updates: दिल्ली स्फोटातील 'त्या' छिन्नविछिन्न मृतदेहांचे पोस्टमार्टेम पूर्ण, पोलिसांना मिळाली महत्त्वाची माहिती, शार्पनेल ऑब्जेक्ट....
दिल्ली स्फोटातील 'त्या' छिन्नविछिन्न मृतदेहांचे पोस्टमार्टेम पूर्ण, पोलिसांना मिळाली महत्त्वाची माहिती, शार्पनेल ऑब्जेक्ट....
Maharashtra Live blog: दिल्लीतील स्फोटानंतर 100 पेक्षा जास्त सीसीटीव्ही फुटेजची तपासणी, मेट्रो 1 आणि मेट्रो 4 गेट बंद
LIVE: दिल्लीतील स्फोटानंतर 100 पेक्षा जास्त सीसीटीव्ही फुटेजची तपासणी, मेट्रो 1 आणि मेट्रो 4 गेट बंद
Delhi Bomb Blast News: दिल्लीतील लाल किल्ला मेट्रो स्टेशन स्फोटाचे पुलवामा कनेक्शन; पोलीस तपासात धक्कादायक माहिती समोर
दिल्लीतील लाल किल्ला मेट्रो स्टेशन स्फोटाचे पुलवामा कनेक्शन; पोलीस तपासात धक्कादायक माहिती समोर
Operation Sindoor 2.0 : पाकिस्तानला जगाच्या नकाशावरुन मिटवण्याची हीच योग्य वेळ; दिल्ली स्फोटानंतर सोशल मीडियावर ऑपरेशन सिंदूर 2.0 ची चर्चा
पाकिस्तानला जगाच्या नकाशावरुन मिटवण्याची हीच योग्य वेळ; दिल्ली स्फोटानंतर सोशल मीडियावर ऑपरेशन सिंदूर 2.0 ची चर्चा
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Delhi Blast Probe: पोलिसांची मोठी कारवाई, Paharganj-Daryaganj हॉटेल्समधून ४ संशयित ताब्यात
Delhi Blast: लाल किल्ल्याजवळ Chandni Chowk मध्ये भीषण स्फोट, CCTV फुटेज आले समोर
Delhi Blast Alert: दिल्लीतील स्फोटानंतर भुसावळ, मनमाड, नाशिक रेल्वे स्थानकांवर हाय अलर्ट
Delhi Blast:दिल्ली बॉम्बस्फोटानंतर Nagpur अलर्टवर, संघ मुख्यालयाला CISF, SRPF आणि पोलिसांची सुरक्षा
Shegaon High Alert : Delhi बॉम्बस्फोटानंतर Shegaon च्या Gajanan Maharaj मंदिरात सुरक्षा वाढवली

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Delhi Blast Updates: दिल्ली स्फोटातील 'त्या' छिन्नविछिन्न मृतदेहांचे पोस्टमार्टेम पूर्ण, पोलिसांना मिळाली महत्त्वाची माहिती, शार्पनेल ऑब्जेक्ट....
दिल्ली स्फोटातील 'त्या' छिन्नविछिन्न मृतदेहांचे पोस्टमार्टेम पूर्ण, पोलिसांना मिळाली महत्त्वाची माहिती, शार्पनेल ऑब्जेक्ट....
Maharashtra Live blog: दिल्लीतील स्फोटानंतर 100 पेक्षा जास्त सीसीटीव्ही फुटेजची तपासणी, मेट्रो 1 आणि मेट्रो 4 गेट बंद
LIVE: दिल्लीतील स्फोटानंतर 100 पेक्षा जास्त सीसीटीव्ही फुटेजची तपासणी, मेट्रो 1 आणि मेट्रो 4 गेट बंद
Delhi Bomb Blast News: दिल्लीतील लाल किल्ला मेट्रो स्टेशन स्फोटाचे पुलवामा कनेक्शन; पोलीस तपासात धक्कादायक माहिती समोर
दिल्लीतील लाल किल्ला मेट्रो स्टेशन स्फोटाचे पुलवामा कनेक्शन; पोलीस तपासात धक्कादायक माहिती समोर
Operation Sindoor 2.0 : पाकिस्तानला जगाच्या नकाशावरुन मिटवण्याची हीच योग्य वेळ; दिल्ली स्फोटानंतर सोशल मीडियावर ऑपरेशन सिंदूर 2.0 ची चर्चा
पाकिस्तानला जगाच्या नकाशावरुन मिटवण्याची हीच योग्य वेळ; दिल्ली स्फोटानंतर सोशल मीडियावर ऑपरेशन सिंदूर 2.0 ची चर्चा
Delhi Bomb Blast : दिल्ली स्फोटामध्ये वापरलेल्या i20 कारचा मूळ मालक सलमान, फरिदाबाद कनेक्शन समोर, दहशतवादी हल्लाच असल्याचं स्पष्ट
दिल्ली स्फोटामध्ये वापरलेल्या i20 कारचा मूळ मालक सलमान, फरिदाबाद कनेक्शन समोर, दहशतवादी हल्लाच असल्याचं स्पष्ट
Delhi Blast : लाल किल्ला मेट्रो स्टेशन स्फोटानंतर राजधानी हादरली, संपूर्ण दिल्लीसह मुंबईमध्ये हाय अलर्ट जारी
लाल किल्ला मेट्रो स्टेशन स्फोटानंतर राजधानी हादरली, संपूर्ण दिल्लीसह मुंबईमध्ये हाय अलर्ट जारी
दिल्ली हादरली! लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ मोठा स्फोट, कारमध्ये धमाका झाल्यानंतर हाय अलर्ट जारी
दिल्ली हादरली! लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ मोठा स्फोट, कारमध्ये धमाका झाल्यानंतर हाय अलर्ट जारी
Video: दिल्ली स्फोटानंतर अमित शाह माध्यमांसमोर, देशवासीयांना संबोधित करत म्हणाले, आय-20 कारमध्ये स्फोट
Video: दिल्ली स्फोटानंतर अमित शाह माध्यमांसमोर, देशवासीयांना संबोधित करत म्हणाले, आय-20 कारमध्ये स्फोट
Embed widget