मुंबई : सत्यजीत रे यांचे अत्यंत आवडते अभिनेते म्हणून नावाजलेले रे यांच्या एक दोन नव्हे तर तब्बल 14 चित्रपटांमध्ये महत्वाच्या भूमिका निभावलेले बंगाली सिनेसृष्टीचा चेहरा असलेले ज्येष्ठ अभिनेते सौमित्र चॅटर्जी उर्फ सौमित्र चटोपाध्याय यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर संपूर्ण बंगाली चित्रपटसृष्टी काळजीत बुडाली आहे.


सौमित्र चॅटर्जी हे बंगाली सिनेसृष्टीचा राष्ट्रीय चेहरा म्हणून ओळखले जातात. वयाच्या 85 वर्षीही ते सिनेसृष्टीत सक्रीय आहेत. त्यांच्या कार्याची दखल घेऊन भारत सरकारने त्यांना 2012 मध्ये सर्वोच्च असा दादासाहेब फाळके किताब देऊन गौरवलं आहे. त्याच सौमित्र यांना कोरनाची लागण झाल्यानं बंगाली सिनेसृष्टीला जबर धक्का बसला आहे. त्यांच्या वयाचा अंदाज घेता प्रत्येक कलाकार त्यांची बरी व्हायची वाट पाहातो आहे.


सौमित्र चॅटर्जी यांनी अनेक महत्वाच्या सिनेमांमध्ये भूमिका केल्या आहेत. सत्यजीत रे यांच्या अपू ट्रायॉलॉजीमधल्या अपूर संसर या चित्रपटात त्यांनी रेंसोबत पहिल्यांदा काम केलं आहे. इतकंच नव्हे, तर फ्रान्स सरकारचा अत्यंत मानाचा असा ऑद्रे दे आर्टस एट डे लिटरस हा किताब मिळवणारे ते एकमेव भारतीय कलाकार आहेत. अभिजन, चारुलता, सोनार केल्ला, गणशत्रू आदी 2016 चित्रपटांमधून त्यांनी भूमिका साकारल्या आहेत. त्यांना पद्मविभूषण या किताबानेही गौरवण्यात आलं आहे.


सौमित्र यांना कोरोना निदान झाल्याची बातमी वाऱ्यासारखी बंगालभर पसरली. ते लवकर बरे व्हावेत म्हणून अनेक ठिकाणी प्रार्थना आयोजित कऱण्यात आल्या आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव अद्याप कमी झालेला नाही अशावेळी बंगालच्या मुख्यमंत्र्यांनी पुन्हा एकदा दिलेल्या सवलतीचा विचार करावा असंही काही बंगाली कलाकार बोलून दाखवत आहेत.