Shashank Ketkar: मराठी टीव्ही इंडस्ट्रीतून पुन्हा एकदा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अभिनेता शशांक केतकरने तब्बल पाच वर्षांपासून अडकलेल्या मानधनाचा मुद्दा सार्वजनिक करत निर्मात्याविरोधात थेट आरोप केले आहेत. ‘हे मन बावरे’ या जुन्या मालिकेच्या कामाचे पैसे अजूनही मिळाले नसल्याचं सांगत शशांकने सोशल मीडियावर पोस्ट आणि व्हिडिओ शेअर केले असून हा व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे.

4 जानेवारी 2026 रोजी शशांकने पहिली पोस्ट शेअर करत निर्माता मंदार देवस्थळीने आजवर पैसे दिले नसल्याचं सांगितलं होतं. 5 जानेवारीपर्यंत रक्कम मिळाली नाही, तर सर्व काही उघड करणार असल्याचाही इशारा त्याने दिला होता. मात्र दिलेल्या तारखेपर्यंतही पैसे न मिळाल्याने अखेर शशांकने व्हिडिओ आणि चॅटचे स्क्रीनशॉट्स शेअर करत संपूर्ण प्रकरण बाहेर काढलं. 

काय म्हणाला शशांक केतकर ?

नमस्कार ,मी legal action घेतोच आहे पण तूर्तास मंदार देवस्थळी (मंदार दादा) या उत्तम दिग्दर्शकाचा आणि हे मन बावरे या मालिकेच्या निर्मात्याचा थापा मारण्याचा pattern तुमच्याही लक्षात यावा या साठी हा video screenshots सकट पोस्ट करतो आहे. पैशाचा विषय स्वतः कधीही काढत नाही आणि आम्ही विषय काढला की तो रडतो, गया वया करतो, darling, बाळा वगैरे म्हणतो आणि आम्ही कलाकार मूर्ख ठरतो.

५,००,००० ही एखाद्या साठी मोठी रक्कम आहे की नाही मला माहीत नाही पण माझ्यासाठी तरी आहे. हे मन बावरे या मालीकेचे per day प्रमाणे ठरलेले पैसे कसे बसे मी काढून घेतले (मुद्दल) पण जो TDS त्याने कापला आहे तो अजूनही बाकी आहे. म्हणजे त्यानी payment देताना TDS कापला आणि goverment ला भरला नाही असा दुहेरी गुन्हा केला आहे.

 

बर ही परिस्थिती फक्त माझ्या एकट्याची नाही.... सगळ्यांची आहे. अनेकांची तर मुद्दल आणि TDS दोन्ही बाकी आहे, पण आत्ता मी फक्त माझ्या साठी बोलतो आहे.

YouTube वर ४ वर्षपूर्वीच्या काही मुलाखती दिसतील तुम्हाला त्यातही त्याचा हा थापा मारायचा pattern clear दिसतो. आणि आमच्या पैसाच केलं काय या बद्दल चकार शब्द काढत नाही तो !

संपूर्ण प्रकरणाचा व्हिडिओ केला शेअर

पोस्टच्या शेवटी शशांकने एक महत्त्वाची बाब अधोरेखित केली. सर्वच निर्माते असे नसतात, इंडस्ट्रीमध्ये अनेक प्रामाणिक आणि व्यावसायिक निर्माते आहेत, असं सांगत त्याचा रोष हा फक्त आणि फक्त मंदार देवस्थळी यांच्यापुरताच मर्यादित असल्याचं त्याने नमूद केलं आहे.

 

दरम्यान, ‘सुखाच्या सरींनी मन हे बावरे’ ही मालिका 2018 ते 2020 या काळात प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. आता या मालिकेमुळे निर्माण झालेला आर्थिक वाद आणि शशांक केतकरचा संताप सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.