Sanket Pathak on Politician video: मालिका आणि ' बिग बॉस 'मधून (bigg boss) प्रकाशझोतात आलेला अभिनेता संकेत पाठक (sanket pathak) प्रोफेशनलसह पर्सनल लाइफमुळे चर्चेत असतो. अभिनेत्याचा चाहतावर्ग खूप मोठा आहे. काही महिन्यांपूर्वी तो बाबा झाला. अभिनेता सोशल मीडियावर सक्रिय असतो. अलीकडेच अभिनेत्याने (marathi actor) एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्याने शेअर केलेल्या व्हिडीओची सध्या चर्चा सुरू आहे. व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये अभिनेता संतापलेला दिसत आहे. चारचाकी चालवत त्याने व्हिडीओ तयार केला आहे. त्याने या व्हिडीओमध्ये राजकारणी व्यक्तीचा उल्लेख केला आहे. व्हिडीओच्या शेवटी अभिनेता ' याचा मी गेम चेंज करणार ' असं म्हणतो. नेमकं प्रकरण काय? जाणून घेऊयात.
संकेत पाठकचा व्हिडीओ व्हायरल, संताप व्यक्त करत म्हणाला...(Actor Sanket Pathak Issues Open Challenge to Politician)
व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये अभिनेता एका राजकारणी व्यक्तीला ओपन चॅलेंज देत असल्याचं दिसत आहे. संकेत पाठक म्हणतो, ' राजकारणात माणूस कुठल्याही लेव्हलला असला तरी तो, स्वार्थीच असतो. मी अशाच एका व्यक्तीबद्दल तुमच्याशी बोलतो आहे. कारण त्याने जे काही केलं आहे, ते अत्यंत चुकीचं आहे ', असं संकेत पाठक म्हणाला.
' आजपर्यंत मी असं कुणाबद्दलही समोर येऊन काहीच बोललो नव्हतो. पण पाणी खरंच आता डोक्यावरून गेलं आहे. अशा व्यक्तीला आता चपलेने मारायची वेळ आली आहे. कारण याची हीच लायकी आहे. या व्यक्तीचं नाव आणि त्याने काय केलं आहे, हे सर्वांना सांगणार आहे. कारण आता मला फरक पडत नाही. मी कुणाच्या बापाला घाबरत नाही. आणि याच्याच भाषेत सांगायचं झालं तर, आता याचा गेम मी चेंज करणार आहे ', असं संकेत पाठक आपल्या व्हिडीओमध्ये म्हणाला. सध्या संकेत पाठकचा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल होत असून, नेटकरी अभिनेत्याला नेमकं प्रकरण काय? असा प्रश्न उपस्थित करत आहेत.
महत्त्वाच्या इर बातम्या:
