Raqesh Bapat Opens Up About Rakhi Sawant In Interview: बिग बॉस फेम राकेश बापटला (Rakesh Bapat) आज विशेष ओळखीची गरज नाही. बिग बॉस मराठीच्या (Bigg Boss Marathi Season 6) सहाव्या सिझनमुळे तो घराघरात पोहोचला. त्याच्या फॅन फॉलोइंगमध्ये वाढ झालीये. राकेशने रिअॅलिटी शोमध्ये भाग घेण्यापूर्वी चित्रपट तसेच मालिकांमध्येही काम केलं. बिग बॉसच्या सहाव्या सिझनचा रनरअप राकेश ठरला. त्यानं शेवटपर्यंत उत्तमरित्या टास्क पूर्ण केले. दरम्यान, त्याचं नाव राखी सावंतमुळेही चर्चेत आलं होतं. बिग बॉसच्या घरातून राखी सावंत एलिमिनेट झाली होती. त्यानंतर राखीने, राकेशवर एकतर्फी प्रेम असल्याचं कबूल केलं. तिनं अनेक माध्यमातून राकेश बापटला व्होट करा, अशी नेटकरी तसेच चाहत्यांना आवाहन केलं होतं. दरम्यान, बिग बॉसच्या घरातून बाहेर येताच, राकेशने मुलाखतीत दिली. या मुलाखतीत त्यानं बिग बॉसच्या घरातील किस्से आणि राखी सावंतबाबत भाष्य केलं आहे.
'राखीचा मी कायम आदर ठेवतो' (Raqesh Bapat Reveals Rakhi Sawants Real Side)
सौमित्र पोटेंच्या मित्र म्हणेला दिलल्या मुलाखतीत, राकेश बापटला राखी सावंत कशी वाटली? खरंच काही होतं की, फक्त गेम होतं? असा प्रश्न विचारण्यात आला होता. याचं उत्तर देत राकेश म्हणतो, 'मी तिचा आदर ठेवतो. राखी कायम तिच्या प्रोफेशनला प्रायोरिटीवर ठेवते. तिचं हे ब्रेड अँड बटर आहे, उदरनिर्वाह आहे. कलाकार म्हणून या गोष्टीचा आदर ठेवणं खूप गरजेचं आहे. जे काही असेल, तिनं स्वत:साठी तिचं विश्व तयार केलंय. राखीने प्रायोरिटीमध्ये बिग बॉसला सर्वात वर ठेवलं आहे. तेव्हा ती बाकी सगळ्या गोष्टी विसरते. बिग बॉसमध्ये आलं की ती धुमाकूळ घालतेच', असं राकेश राखीबाबत म्हणाला.
'राखीला आम्ही इमोशनल झालेलं पाहिलेलं आहे' (Raqesh Bapat About Rakhi Sawant)
'कामामध्ये राखी बिन्धास्त वावरते. पण रिअल लाइफमध्ये तिची एक बाजू दिसली, ती खूप दुसऱ्यांची काळजी घेणारी मुलगी आहे. ती उत्कृष्ट जेवण तयार करते. तिच्या हातात जादू आहे. आम्ही तिला बिग बॉसच्या घरातील अन्नपूर्णा आहेस, असं म्हणायचो. राखीचं मन आतून कोमल आहे. सगळ्यांना आपण एक बाजू दाखवतो, राखी सर्वांना एन्टरटेन करणारी मुलगी असं दाखवते, कधीतरी माणूस इमोशनल होतो, राखीलाही आम्ही इमोशनल झालेलं पाहिलेलं आहे', असंही राकेश म्हणाला.
महत्त्वाच्या इतर बातम्या:
प्रसिद्ध कॉमेडियन मुनव्वर फारुकी झाला बाबा, दुसऱ्या पत्नीनं दिली गुडन्यूज; सेलिब्रिटींकडून शुभेच्छा
