Rajpal Yadav Surrenders In Cheque Bounce Case: राजपाल यादवचं तिहार जेलमध्ये सरेंडर; कोर्टानं फटकारल्यानंतर आत्मसमर्पण, प्रकरण नेमकं काय?
Rajpal Yadav Surrenders In Cheque Bounce Case: बॉलिवूड अभिनेता राजपाल यादवनं तिहार जेलमध्ये आत्मसमर्पण केलं आहे. दिल्ली उच्च न्यायालयानं फटकारल्यानंतर अभिनेत्यानं आत्मसर्पण केलंय.

Rajpal Yadav Surrenders In Cheque Bounce Case: बॉलिवूड (Bollywood News) अभिनेता राजपाल यादव (Rajpal Yadav) सध्या चेक बाऊन्स प्रकरणामुळे (Cheque Bounce Case) चर्चेत आहे. दिल्ली उच्च न्यायालयानं अभिनेत्याला 4 फेब्रुवारी रोजी शरण येण्याचे आदेश दिले होते. दरम्यान, अभिनेता राजपाल यादवनं सरेंडर केलं आहे. त्यानंतर राजपाल यादव पुन्हा एकदा दिल्ली उच्च न्यायालयात हजर झाला आणि त्यानं दिलासा मागितला. राजपाल यादवनं म्हटलं की, तो 25 लाख रुपये घेऊन आला आणि उर्वरित रक्कमही लवकरात लवकर भरेल. दरम्यान, न्यायालयानं त्याला फटकारलं आणि सांगितलं की, कोणताही दिलासा देण्याचा विचार करण्यापूर्वी आत्मसमर्पण करणं आवश्यक आहे.
न्यायालयानं म्हटलं की, आत्मसमर्पण केल्यानंतर, न्यायालय काही दिलासा देऊ शकतं का? ते तपासलं जाईल. उच्च न्यायालयानं असंही स्पष्ट केलंय की, राजपाल यादवला वारंवार दिला जाणारा दिलासा हा वाद सौहार्दपूर्णपणे सोडवला जाईल आणि तक्रारदार कंपनीला त्याची थकबाकी भरली जाईल, या आश्वासनावर आधारित होता. पण तसं झालं नाही आणि प्रकरण चिघळलं. न्यायालयानं म्हटलंय की, 9 कोटी रुपये अजूनही थकबाकी आहे.
राजपाल यादवचं आत्मसमर्पण
दिल्ली उच्च न्यायालयानं राजपाल यादव यांना बुधवारी दुपारी 4 वाजेपर्यंत आत्मसमर्पण करण्याचे निर्देश दिले होते, पण त्यांनी बुधवारी आत्मसमर्पण केलं नाही. तिहार तुरुंगातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांनी गुरुवारी आत्मसमर्पण केलं. न्यायालयानं म्हटलं होतं की, "तुम्ही मुंबईत असल्याचं सांगितलं होतं, म्हणून तुम्हाला आत्मसमर्पण करण्यासाठी दोन दिवसांची मुदत देण्यात आली. आता असं दिसतंय की, कोणताही आधार शिल्लक नाही. उदारता दाखवण्याचं कोणतंही कारण नाही..."
न्यायालयानं राजपाल यादवची याचिका फेटाळली
या याचिकेत चेक बाउन्स प्रकरणात तुरुंग अधिकाऱ्यांसमोर आत्मसमर्पण करण्यासाठी वेळ वाढवण्याची मागणी करण्यात आली होती, ज्यामध्ये राजपाल यादव यांना 2024 मध्ये दोषी ठरवण्यात आलं होतं आणि शिक्षा सुनावण्यात आली होती. न्यायमूर्ती स्वरण कांता शर्मा यांच्या खंडपीठानं म्हटलं की, "मी तुमची याचिका आधीच फेटाळली होती आणि तुम्हाला आत्मसमर्पण करण्यासाठी दोन दिवसांची मुदत दिली होती..."
राजपाल यादवच्या वकिलांनी सांगितलं की, जर त्यांना एका आठवड्याची मुदतवाढ मिळाली तर ते पैसे देतील. जर त्यांची याचिका फेटाळली गेली तर ते शरण जातील. त्यांनी 50 लाख रुपयांची व्यवस्था केली होती. त्यांनी मला पुरावेही दिले आहेत. ते पैसे घेऊन येतील.
दरम्यान, राजपाल यादव यांनी एकूण 2.5 कोटी रुपये देण्याचं आश्वासन दिलं होतं, ज्यामध्ये 40 लाख रुपये आणि 2.10 कोटी रुपयांचा हफ्ता समाविष्ट होता. अंतिम मुदत असूनही, ही रक्कम जमा करण्यात आली नाही. राजपाव यादवच्या वर्कफ्रंटबाबत बोलायचं झालं तर, राजपाल यादव 'भूत बांगला' आणि 'वेलकम टू द जंगल' या चित्रपटांमध्ये दिसणार आहे. दोन्ही चित्रपटांचं शूटिंग सुरू आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
























