Actor Rajesh Sharma Hospitalised While Shooting: बॉलिवूड आणि साऊथ सिनेमांमधून घराघरात पोहोचलेला अभिनेता राजेश शर्मा (Rajesh Sharma) यांच्याबाबत एक मोठी बातमी समोर येत आहे. त्यांना तातडीने रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं (Entertainment) आहे. सध्या प्रभासच्या आगामी सिनेमाचं शुटिंग सुरू होतं. या चित्रपटाचा राजेश शर्मा हे देखील भाग असल्याची माहिती आहे. शुटिंग दरम्यान, राजेश कुमार यांना एका किड्याने (Prabhas Film) चावा घेतला.  काही तासानंतर त्यांची तब्येत बिघडली.  आरोग्य बिघडत चालल्यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यांना नेमकं काय झालं आहे?  त्यांची तब्येत कशी बिघडली? कोणत्या किड्याने चावा घेतल्यामुळे त्यांची  तब्येत बिघडली? सध्या असे अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहे. 

Continues below advertisement

राजेश शर्मा यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू (Rajesh Sharma Suffers Serious Infection while prabas film shooting)

नुकतंच अभिनेत्री सुदीपा चॅटर्जी  यांनी राजेश शर्मा यांच्या प्रकृतीबाबत एक मोठी अपडेट दिली आहे. त्यांच्या अधिकृत सोशल मीडियावर पोस्ट करुन माहिती दिली आहे. त्यांच्यासोबत नेमकं काय घडलं?  याची देखील माहिती अभिनेत्रीने आपल्या पोस्टद्वारे दिली आहे. अॅक्ट्रेसने आपल्या पोस्टमध्ये म्हटलं की, प्रभास स्टार  'स्पिरिट' सिनेमाचे शूट सुरु होते. या दरम्यान, राजेश शर्मा यांना एका विषारी किड्याने चावा घेतला. यानंतर त्यांची प्रकृती बिघडली. तब्येत बिघडल्यानंतर त्यांना तातडीने पश्चिम बंगालच्या  ढाकुरिया  येथील एका हॉस्पिटलमध्ये  अॅडमिट केले. 

सध्या त्यांच्यावर उपचार सुरु असून,  अभिनेता डॉक्टरांच्या देखरेखेखाली उपचार घेत आहे. सुदीपा चॅटर्जी यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं की, 'प्रभासच्या चित्रपटाचं रामोजी फिल्म सिटीमध्ये शुटिंग सुरु होते. यादरम्यान, राजेश शर्मा यांना एका विषारी किड्याने किंवा एका विषारी कोळ्याने चावा घेतला.  ही घटना तेव्हा घडली जेव्हा, शुटिंग पूर्ण झाल्यानंतर राजेश शर्मा घनदाट जंगलात एक लोकल टेक्नीशिंयनसोबत चर्चा करत होते. या दरम्यान,  त्यांना जाणवलं, कोणत्या तरी किड्याने चावा घेतला आहे.  तेव्हा त्यांनी दुर्लक्ष केलं'.

Continues below advertisement

'त्यांनी सुरुवातील कोणतीही वैद्यकीय मदत घेतली नाही.  आपलं काम चालू ठेवलं. पण साधारण 6 तासांनंतर त्यांच्या डाव्या पायात तीव्र वेदना जाणवू लागली. प्रकृती बिघडत चालल्यानंतर त्यांनी तातडीने फ्लाइटने कोलकाता गाठले. प्रवासादरम्यान, त्यांची अधिक तब्येत बिघडत चालली. त्यांना श्वास घेण्यासही त्रास झाला होता', अशी माहिती अभिनेत्रीने दिली.  'राजेश शर्मा यांच्या पायावरील इन्फेक्शन वाढत चाललं होतं.  हे इन्फेक्शन पायापासून ते गुडघ्यापर्यंत वाढत चाललं होतं.  प्रभावित जागांवर मोठे फोडे तयार झाले होते. सध्या राजेश शर्मा यांच्यावर डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरु आहे. त्यांनी प्रकृती धोक्याबाहेर नाही', अशी माहितीही त्यांनी दिली.

महत्त्वाच्या इतर बातम्या:

राजकुमार ऐवजी सुशांत सिंह राजपुतला 'दादा'मध्ये साकारायचा होता रोल, पण निधनामुळे इच्छा अपूर्णच