Actor Pradeep Rawat Passes Away : भारतीय चित्रपटसृष्टीतून एक दुख:द बातमी समोर येत आहे. प्रसिद्ध अभिनेते आणि ‘गजनी’ चित्रपटातील मुख्य खलनायक प्रदीप रावत यांचे निधन झाले आहे. वयाच्या 74 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून ते कर्करोगासारख्या गंभीर आजाराशी झुंज देत होते. उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला. प्रदीप रावत यांनी मुंबईतील कोकिळाबेन रुग्णालयात उपचारादरम्यान अखेरचा श्वास घेतला.मिळालेल्या माहितीनुसार त्यांची कर्करोगाशी सुरू झुंज सुरू होती. रक्ताचा कर्करोग झाल्यानंतर त्यांच्यावर उपचार सुरू होते.उपचारादरम्यान त्यांची प्रकृती चिंताजनक झाली आणि रुग्णालयातच त्यांची प्राणज्योत मालवली.
‘लगान’ चित्रपटातील त्यांचे सहकलाकार यशपाल शर्मा यांनी इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत त्यांच्या निधनाची दुःखद माहिती दिली. ‘महाभारत’ मधील ‘अश्वत्थामा’ ते ‘गजनी’ मधील व्हिलेन अशा विविध भूमिकांमधून त्यांनी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले होते. मिळालेल्या माहितीनुसार,प्रदिप रावत यांनी कर्करोग झाला होता आणि तो पुन्हा बळावला होता. काही तासांपूर्वीच त्यांचे निधन झाले.ते 74 वर्षांचे होते आणि त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी व मुलगा विक्रमादित्य असा परिवार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ते गेल्या एका महिन्याहून अधिक काळापासून रुग्णालयात दाखल होते.
गजनी' चित्रपटातील दमदार खलनायकाच्या भूमिकेमुळे विशेष ओळख
'गजनी' चित्रपटातील खलनायक प्रदीप सिंह रावत यांचे निधन धाले आहे. ज्येष्ठ अभिनेते प्रदीप सिंह रावत यांचे वयाच्या 74 व्या वर्षी निधन. मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात आज सायंकाळी अखेरचा श्वास घेतला आहे. रक्ताच्या कर्करोगावर (ब्लड कन्सर) उपचार सुरू असताना निधन झालं आहे. गजनी' चित्रपटातील दमदार खलनायकाच्या भूमिकेमुळे विशेष ओळख झाली होती. लगान' आणि 'सरफरोश'मधील अभिनयालाही प्रेक्षकांची मोठी पसंती मिळाली आहे, 'महाभारत' मालिकेतील अश्वत्थामा ही भूमिका आजही प्रेक्षकांच्या स्मरणात.हिंदी, तेलुगू आणि तमिळ चित्रपटसृष्टीतील प्रदीर्घ कारकीर्द आहे. प्रदीप सिंह रावत यांच्या निधनाने चित्रपटसृष्टीवर शोककळा. परसरली आहे.
प्रसिद्ध अभिनेते आणि ‘गजनी’ चित्रपटातील मुख्य खलनायक प्रदीप रावत?
दरम्यान, प्रदीप रावत यांनी आपल्या करिअरची सुरुवात बी. आर. चोप्रा यांच्या ‘महाभारत’ मालिकेतून केली होती. या मालिकेत त्यांनी ‘अश्वत्थामा’ची भूमिका साकारली होती. प्रदीप रावत यांनी राज बब्बर यांच्या ‘ऐतबार’ या चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केलं होतं. यानंतर त्यांनी ‘अग्निपथ’, ‘पत्थर के फूल’, ‘संगदिल सनम’, ‘कोयला’, ‘सरफरोश’ आणि ‘लगान’ यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केलं, मात्र त्यांना खरी ओळख ‘गजनी’ चित्रपटातून मिळाली.