Actor Brahmanandam Appeared In 1000 Films And Become Number One Comedian: बॉलिवूड (Bollywood News) असो वा टॉलिवूड (Tollywood Movies) सिनेमात एक हिरो (Hero), एक हिरोईन (Heroin) आणि एक व्हिलन (Villain) असतोच, पण काही सिनेमांत या त्रिकुटासोबत आणखी एकाची भर घातली जाते आणि हाच व्यक्ती कधीकधी सिनेमाचा प्राण होऊन जातो, तो म्हणजे, कॉमेडियन (Comedian). तुम्हाला माहितीय का आपल्या देशातला सर्वात श्रीमंत कॉमेडियन कोण? (Who Is The Richest Comedian In The Country?) अनेकांच्या तोंड चटकन कपिल शर्माचं (Kapil Sharma) नाव येईल, सध्याची त्याची लोकप्रियता आणि बॉलिवूडमधला (Bollywood Movies) त्याचा वावर पाहता, त्याचं नाव अनेकांकडून घेतलं जाणं, अगदी स्वाभाविक आहे. पण, खरं काहीतरी वेगळंच आहे. तुम्हाला कदाचित ऐकून आश्चर्य वाटेल की, भारतातील सर्वात श्रीमंत कॉमेडियन हा कोणताही टीव्ही स्टार नसून साऊथ सिनेमातला (South Movies) एक स्टार आहे. यानं हिरो न होता वर्षानुवर्ष प्रेक्षकांना खळखळून हसवलं आणि स्वतःचं वेगळं स्थान निर्माण केलं. आम्ही ज्या सुपरस्टार कॉमेडियनबाबत बोलतोय, ते दुसरा-तिसरा कुणीच नसून ब्रह्मानंदम (Actor Brahmanandam) आहेत. खरं सांगायचं तर यांची ओळख आता केवळ साऊथ सिनेमांपुरती मर्यादित राहिलेली नाही.
1000 सिनेमांचा विक्रम, गिनीजमध्ये नोंद (Brahmanandam Record Of 1000 Films)
सुपरस्टार कॉमेडियन ब्रह्मानंदम यांनी केवळ प्रेक्षकांना खळखळून हसवलं नाही, तर ते विक्रमवीरही आहेत. त्यांनी थोड्या थोडक्या नाहीतर तब्बल 1000 हून अधिक सिनेमांमध्ये काम केलंय, जे त्यांच्या कारकीर्दीतलं सर्वात मोठं यश आहे. याच कारणामुळे त्यांचं नाव गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदवण्यात आलंय. इतक्या मोठ्या प्रमाणात सिनेमांमधून सातत्यानं प्रेक्षकांना हसवणं सोपं काम नाही, पण त्यांनी हा विक्रम रचून सिद्ध केलंय की, खरंच ते देशातले सुपरस्टार कॉमेडियन आहेत.
प्राध्यापक ते 'कॉमेडीचे सुपरस्टार' (Superstars of Comedy Actor Brahmanandam)
अभिनेते ब्रह्मानंदम यांच्या आयुष्याची कहाणी एखाद्या सिनेमाच्या कथानकालाही लाजवेल. आंध्र प्रदेशातील एका सामान्य कुटुंबातून आलेले ब्रह्मानंदम सुरुवातीला कॉलेजमध्ये संस्कृत शिकवायचे. मात्र त्यांचा अभिनय आणि विनोदी शैलीच्या आवडीमुळे त्यांनी सिनेसृष्टीत पाऊल ठेवलं. 1980 च्या दशकात त्यांनी पहिला सिनेमा केला आणि हळूहळू इंडस्ट्रीतील सर्वात विश्वासार्ह कॉमेडियन बनले.
एक्सप्रेशन्स हीच त्यांची खरी ओळख (Expressions Are Brahmanandams True Identity)
ब्रह्मानंदम यांची खासियत केवळ त्यांच्या डायलॉग्जमुळे नाही, तर त्यांच्या चेहऱ्यावरील हावभावांमुळे मिळाली. एक्सप्रेशन्सच त्यांच्या अभिनयाची, विनोदीशैलीची खरी ओळख बनली. अनेकदा एक शब्दही न बोलता ते संपूर्ण सीन मजेदार बनवतात. त्यामुळेच त्यांनी साऊथमधील जवळपास सर्व मोठ्या स्टार्ससोबत काम केलं आणि प्रत्येक काळात स्वतःला सुसंगत ठेवलं. आजही त्यांच्या एक्सप्रेशन्सवर आधारित मीम्स सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.
500 कोटींहून अधिक संपत्ती (Brahmanandam Net Worth)
कमाईच्या बाबतीतही ब्रह्मानंदम कुणापेक्षा कमी नाहीत. त्यांची एकूण संपत्ती 500 कोटी रुपयांहून अधिक असल्याचं मानलं जातं. सिनेमांव्यतिरिक्त त्यांनी टीव्ही आणि जाहिरातींमधूनही चांगली कमाई केलीय. केवळ कॉमेडीच्या जोरावर त्यांनी हा मोठा टप्पा गाठलाय.
हिरो न होता बनला 'सुपरस्टार कॉमेडियन' (Brahmanandam Is Superstar Comedian)
ब्रह्मानंदम यांनी हे सिद्ध केलं की, सिनेमात मुख्य भूमिका करणं हेच सर्वकाही नसतं. जर टॅलेंट दमदार असेल, तर केवळ कॉमेडीच्या जोरावरही सुपरस्टारसारखं स्थान मिळवता येतं.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
