एक्स्प्लोर

Actor Bharath Kanth Dies: प्रसिद्ध अभिनेता आणि सिनेमेटोग्राफरचा भीषण अपघातात मृत्यू; फोन अन् गाडीच्या नंबर प्लेटवरुन पटली ओळख, गाडीचा चक्काचूर

Actor Bharath Kanth Dies: सुप्रसिद्ध अभिनेता आणि YouTuber भारत कांत याचा भीषण अपघातात मृत्यू झाला आहे.

Actor Bharath Kanth Dies: दिग्गज निर्माते आर. बी. चौधरी (RB Choudary Death) यांच्या निधनाच्या धक्क्यातून सिनेसृष्टी सावरते न सावरते, तोच आाता आणखी एक धक्का सिनेसृष्टीला बसला आहे. सुप्रसिद्ध अभिनेता आणि YouTuber भारत कांत (Bharath Kanth) आणि प्रसिद्ध सिनेमेटोग्राफर साई त्रिलोक (Cinematographer Sai Trilok) यांचं भीषण अपघातात निधन झालंय. दोघेही एकमेकांचे घट्ट मित्र होते. अपघात इतका भीषण होता की, दोघेही ज्या गाडीतून प्रवास करत होते, त्या गाडीचा पुरता चक्काचूर झाला आहे. 

रविवारी पहाटे शहराच्या 'आउटर रिंग रोड'वरील (ORR) 'एक्झिट क्रमांक 12' जवळ असलेल्या 'बंगळुरू' इथे घडलेल्या एका रस्ते अपघातात दोन जणांना आपला जीव गमवावा लागला. मृतांमध्ये प्रसिद्ध टॉलीवूड अभिनेता आणि त्याच्या सिनेमेटोग्राफर असलेल्या मित्राचा समावेश आहे. दोघेही ज्या कारमधून प्रवास करत होते, त्या भरधाव कारनं एका ट्रकला मागून धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, कारचा पूर्णपणे चक्काचूर झालाय. आदिबातला पोलिसांच्या माहितीनुसार, 31 वर्षीय भारत कांत आणि त्याचा सिनेमेटोग्राफ मित्र साई त्रिलोक, यांचा जागीच मृत्यू झाला आहे.

घटनास्थळावरून समोर येत असलेले फोटो आणि व्हिडीओ मन हेलावून टाकणारे आहेत. ट्रक आणि कार यांच्यातील ही धडक अत्यंत भीषण होती. भारत कांत आणि साई त्रिलोक हे आंध्र प्रदेशातील नेल्लोर जिल्ह्यातून हैदराबादला परतत असताना हा अपघात घडला. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या दोघांनी शनिवारी रात्री आपला प्रवास सुरू केला होता. पहाटे 3:20 च्या सुमारास, त्यांनी पेड्डा अंबरपेट इथे 'ओआरआर' (ORR) वर प्रवेश केला आणि ते शमशाबादच्या दिशेनं निघाले होते. हे दोघेही नानकरामगुडा इथे वास्तव्यास होते.

नेमकं काय घडलं? (Actor Bharath Kanth)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा अपघात पहाटे 3:20 वाजता घडला. या अपघातात मृत्यूमुखी पडलेला सुप्रसिद्ध अभिनेता भारत कांत आणि सिनेमेटोग्राफर त्रिलोक, हे नेल्लोरहून हैदराबादच्या दिशेनं प्रवास करत होते. प्राथमिक तपासावरून असं सूचित होतं की, हा अपघात प्रामुख्यानं वाहनाचा अतिवेग आणि कदाचित चालकाच्या थकव्यामुळे घडला असावा. बंगळुरू आणि थुक्कूगुडा यांच्या दरम्यान, 111.5 किलोमीटरच्या टप्प्याजवळ या कारनं एका ट्रकला मागच्या बाजूनं धडक दिल्याचं सांगण्यात येतंय. या धडकेची तीव्रता इतकी भीषण होती की, वाहनाचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आणि त्यातील दोन्ही प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला. आदिबाटला पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून, मृतदेहांचं शवविच्छेदन करण्यासाठी ते रुग्णालयात पाठवले आहेत. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर, मृतदेह त्यांच्या कुटुंबीयांच्या स्वाधीन केले जातील.

फोन आणि गाडीच्या नंबर प्लेटवरुन पटली ओळख 

अपघातस्थळी सापडलेला मोबाईल फोन आणि गाडीच्या नंबर प्लेटच्या मदतीनं पोलिसांना अपघातात मृत्यूमुखू पडलेल्या दोघांची ओळख पटली. भारत कांत यानं टॉलीवूड सिनेमांमध्ये मुख्य अभिनेता म्हणून काम केलं होतं. याव्यतिरिक्त, त्यानं इतरही अनेक सिनेमांमध्ये सहाय्यक भूमिका साकारल्या होत्या. अतिवेग आणि बेदरकारपणे वाहन चालवणं हीच या अपघाताची कारणं असावीत, असा पोलिसांना संशय आहे. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून तपासाला सुरुवात केली आहे.

कोण होते भारत कांत? (Actor Bharath Kanth Death)

सुप्रसिद्ध अभिनेता भारत कांत हा एक लोकप्रिय अभिनेता, नर्तक, YouTuber आणि कंटेन्ट क्रिएटर होता. भारत आणि त्रिलोक या दोघांनीही, टॉलीवूडमध्ये आपली कारकीर्द घडवण्यासाठी सुमारे 10 वर्षांपूर्वी हैदराबादला स्थलांतर केलं होतं. 31 वर्षीय भारत कांत सोशल मीडियावर हळूहळू लोकप्रियता मिळवत होता. Instagram वर त्याचे जवळपास 40 हजार फॉलोअर्स आणि YouTube वर अंदाजे 30 हजार सब्स्क्रायबर्स होते. भारत कांतच्या अभिनयाच्या कारकीर्दीनं नुकतीच कुठे गती पकडायला सुरुवात केली होती. कंटेन्ट क्रिएटर म्हणून काम करण्यासोबतच, त्यानं तेलुगू सिनेमांमध्ये आणि लघुपटांमध्येही काम केलं होतं. 

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Vivek Oberoi Shares Post On Sunetra Pawar: 'सूर्य दिसत नसला तरी चंद्राच्या पाठीशी असतो...'; बॉलिवूड अभिनेता विवेक ओबेरॉयची सुनेत्रा पवार यांच्यासाठी मराठीतून पोस्ट

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Peddi: राम चरणच्या 'पेद्दी'ची हवा; सोमवारीही सिनेमा बॉक्स ऑफिसवर सुसाट, 200 कोटींचा आकडा पार करणार?
राम चरणच्या 'पेद्दी'ची हवा; सोमवारीही सिनेमा बॉक्स ऑफिसवर सुसाट, 200 कोटींचा आकडा पार करणार?
Suresh Wadkar On Marriage Rumors With Madhuri Dixit: माधुरी दीक्षित बारीक असल्यानं सुरेश वाडकरांनी लग्नासाठी दिलेला नकार? उत्तर ऐकून पत्नी अन् मुलगीही हैराण
माधुरी दीक्षित बारीक असल्यानं सुरेश वाडकरांनी लग्नासाठी दिलेला नकार? उत्तर ऐकून पत्नी अन् मुलगीही हैराण
Amol Kolhe Post On Me Savitribai Jotirao Phule Serial: 'स्टार प्रवाहवरची मालिका संपली, तरी गोष्ट संपलेली नाही...'; पुन्हा शुटिंग सुरू करणार, अमोल कोल्हेंचा निर्धार, 'मी सावित्रीबाई ज्योतीराव फुले' आता कुठे झळकणार?
'स्टार प्रवाहवरची मालिका संपली, तरी गोष्ट संपलेली नाही...'; पुन्हा शुटिंग सुरू करणार, अमोल कोल्हेंचा निर्धार
Anshuman Vichare On Maharashtrachi Hasyajatra Show: 'माझी एक्सपायरी डेट जवळ आलीय...'; प्रसिद्ध अभिनेत्यानं सांगितलं 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' सोडण्याचं खरं कारण
'माझी एक्सपायरी डेट जवळ आलीय...'; प्रसिद्ध अभिनेत्यानं सांगितलं 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' सोडण्याचं खरं कारण
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Nashik Vidhan Parishad Politics : एकाचं फत्ते काम, दुसऱ्याने फोडला घाम Special Report
Chhagan Bhujbal Upsate On NCP : राज्यसभेची उमेदवारी नाही, भुजबळ नाराज Special Report
Shetkari KarjMafi : शेतकरी कर्जमाफीच्या अटी, मित्रांच्या कपाळावर आठी | Special Report
Eknath Shinde CM : एकनाथ शिंदेंना पुन्हा मुख्यमंत्रिपदाचे वेध लागले आहेत का? | Special Report
India Alliance Meeting : 4 राज्यात बिघाडी, आता आठवली इंडिया आघाडी | Special Report
Advertisement

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Virar Crime News: डोंगराकडे मोबाईल झूम केला अन् तरुणाचे पायच थरथरले; जंगलात झाडाला...; विरारच्या कुलस्वाई माता मंदिर परिसरातील धक्कादायक घटना
डोंगराकडे मोबाईल झूम केला अन् तरुणाचे पायच थरथरले; जंगलात झाडाला...; विरारच्या कुलस्वाई माता मंदिर परिसरातील धक्कादायक घटना
Ashok Kharat Nashik Crime Case: अशोक खरातच्या केबिनमधील व्हिडीओला श्रीलंका, नायजेरिया, फिलिपाईन्समधून मागणी, एका क्लीपचा रेट किती?, पोलिसांच्या तपासात धक्कादायक माहिती उघड
खरातच्या केबिनमधील व्हिडीओला श्रीलंका, नायजेरिया, फिलिपाईन्समधून मागणी, एका क्लीपचा रेट किती?, पोलिसांच्या तपासात धक्कादायक माहिती उघड
Maharashtra Rain Updates: महाराष्ट्रात आज वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा अंदाज; मुंबई, पुणे आणि नाशिक 25 जिल्ह्यांना यलो अलर्ट
महाराष्ट्रात आज वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा अंदाज; मुंबई, पुणे आणि नाशिक 25 जिल्ह्यांना यलो अलर्ट
Lalbaug cha Raja 2026 Muhurat Pujan: चाफ्याच्या फुलांवर अवतरलं लालबागच्या राजाचं पाऊल, मुहूर्त पूजन झालं, पाहा Exclusive फोटो
चाफ्याच्या फुलांवर अवतरलं लालबागच्या राजाचं पाऊल, मुहूर्त पूजन झालं, पाहा Exclusive फोटो
Anshuman Vichare On Maharashtrachi Hasyajatra Show: 'माझी एक्सपायरी डेट जवळ आलीय...'; प्रसिद्ध अभिनेत्यानं सांगितलं 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' सोडण्याचं खरं कारण
'माझी एक्सपायरी डेट जवळ आलीय...'; प्रसिद्ध अभिनेत्यानं सांगितलं 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' सोडण्याचं खरं कारण
TMC Crisis : भाजपच्या तिकिटावर खासदार होऊन दाखवा, बघुया तुम्ही किती हिरो आहात; महुआ मोईत्रांचं फुटीरांना आव्हान, युसूफ पठाणची लाज काढली
भाजपच्या तिकिटावर खासदार होऊन दाखवा, बघुया तुम्ही किती हिरो आहात; महुआ मोईत्रांचं फुटीरांना आव्हान, युसूफ पठाणची लाज काढली
LPG Price Hike : मोठी बातमी! घरगुती गॅस सिलेंडर आणखी महाग होणार; केंद्र सरकारनं सांगितलं त्यामागचं मोठं कारण
मोठी बातमी! घरगुती गॅस सिलेंडर आणखी महाग होणार; केंद्र सरकारनं सांगितलं त्यामागचं मोठं कारण
Maharashtra Live blog updates: नसरापूर प्रकरणात महत्त्वाची साक्ष, सीसीटीव्हीतील व्यक्ती आणि आरोपी एकच
Maharashtra Live blog updates: नसरापूर प्रकरणात महत्त्वाची साक्ष, सीसीटीव्हीतील व्यक्ती आणि आरोपी एकच
Embed widget