मुंबई : अष्टपैलू अभिनेते अतुल कुलकर्णी यांनी आपल्या निवृत्तीची घोषणा केली आहे. पण, थांबा लेगच निकर्षापर्यंत पोहचू नका. कारण, ते अभिनयातून नाही तर क्वेस्ट (QUEST) या सामाजिक संस्थेतून निवृत्त होत आहेत. फेसबुकवर पोस्ट लिहीत त्यांनी आपल्या निवृत्तीची घोषणा केली आहे.


अभिनेत अतुल कुलकर्णी यांनी आपल्या सहकाऱ्यांना घेऊन 2007 रोजी शिक्षण क्षेत्रात काम करण्याच्या हेतूने ही संस्था स्थापन केली होती. स्थापनेपासून अतुल कुलकणी या संस्थेचे अध्यक्ष होते. पण आता त्यांनी या संस्थेतून निवृत्त होत असल्याचे जाहिर केले आहे.






‘गणितात एक सिग्मॉइड कर्व्ह नावाचा सिद्धांत आहे. या सिद्धांतानुसार, जेव्हा सर्व काही छान चाललेलं असतं आणि तुम्ही एखाद्या गोष्टीच्या शिखरावर असता, तेव्हाच तुम्ही ‘एक्झिट’ घ्यायला हवी. माझा या सिद्धांतावर विश्वास आहे. शिवाय आपल्या कडच्या ‘आश्रम’ या व्यवस्थेवरही माझा विश्वास आहे. सध्या मी हळूहळू माझ्या आयुष्याच्या वानप्रस्थाकडे प्रवास सुरू केला आहे, असे लिहित अतुल यांनी निवृत्तीची घोषणा केली आहे.




क्वेस्ट मधल्या माझ्या सहकाऱ्यांना मी संस्थेमधून निवृत्त होण्याची माझी मनीषा गेल्या दोन वर्षांत वेळोवेळी बोलून दाखवली होती. अनौपचारिक गप्पा आणि औपचारिक सभांमध्ये सुद्धा. आम्ही विश्वस्त मंडळातील सदस्य गेले काही महिने काटेकोरपणे ह्या हस्तांतरणाचं नियोजन करतो आहोत आणि मंडळाच्या एकमतानुसार QUEST चे एक संस्थापक-विश्वस्त आणि उपाध्यक्ष मनोज कार्येकर हे आता QUEST चं अध्यक्षपद सांभाळतील, असेही त्यांनी जाहीर केलं आहे.