Abhishek Bachchan And Aishwarya Rai: बॉलिवूडमधील (Bollywood) सुंदर कपल अभिषेक बच्चन (Abhishekh Bachchan) आणि ऐश्वर्या राय  (Aishwarya Rai) अनेक कारणांमुळे चर्चेत असतात. मागे त्यांच्या घटस्फोटाच्या (Divorce Rumours) चर्चांना उधाण आलं होतं. दरम्यान, अभिषेकनं अफवा असल्याचं म्हणत फेटाळून लावलं होतं. अलिकडेच अभिषेकनं एक मुलाखत दिली होती. या मुलाखतीत त्यानं ऐश्वर्यासोबतच्या नात्याबाबत तसेच दोघेही मुलगी आराध्याचं पॅरेटिंग कसे करतात, याची माहिती दिली. ऐश्वर्याच्या स्टारडमवरही त्यानं प्रतिक्रिया दिली आहे . 

Continues below advertisement

जेव्हा अभिषेक आणि ऐश्वर्याचे लग्न झाले होते, तेव्हा ऐश्वर्या खूप मोठी स्टार होती. अलिकडेच दिलेल्या मुलाखतीत, जेव्हा अभिषेकला विचारण्यात आले की, त्याला पत्नीच्या स्टारडममुळे अधी असुरक्षित वाटले का?  यावर अभिनेत्यानं उत्तर दिलं आहे. अभिषेकने या मुलाखतीत पत्नी ऐश्वर्या रायच्या स्टारडमबद्दल  वाटणाऱ्या इनसिक्योरिटीबाबत खुलासा केला. यावेळी मुलाखतीत त्यानं आपल्या आई- वडिलांचे उदाहरण दिले आहे. 

'सुरुवातीला माझी आई माझ्या वडिलांपेक्षा मोठी स्टार होती'

अभिषेक म्हणाला, 'जेव्हा माझ्या आई वडिलांचं लग्न झालं.  तेव्हा माझी आई (जय बच्चन) माझ्या वडिलांपेक्षा (अमिताभ बच्चन) मोठी स्टार होती. त्यामुळे यात काही विचित्र वाटण्यासारखं नाही.  वर्चस्व गाजवलं पाहिजे, अशा मानसिकतेने माझं संगोपन झालेलं नाही.  ही एक पार्टनरशिप आहे. मी ऐश्वर्याला  करिअरच्या सुरुवातीपासून ओळखत आहे.   माझी दुसरी फिल्म मी ऐश्वर्यासोबत केली होती.  त्यावेळी आम्ही रिलेशनशिपमध्ये नव्हतो.   आम्ही केवळ चांगले मित्र होतो', असं अभिषेक म्हणाला.

Continues below advertisement

ऐश्वर्या रायसोबतच्या नात्याबद्दल बोलताना अभिषेक मुलाखतीत म्हणाला, 'जेव्हा आम्ही प्रेमसंबंध, एंगेजमेंट आणि नंतर लग्नाच्या माध्यमातून एकत्र आलो, तेव्हा आमच्यात एक पार्टनरशिप तयार झाले.  आमच्यात असं कधी बोलणं नाही झालं की, मी कमवेन आणि तू घराची काळजी घेशील. अशी चर्चा आमच्यात कधीच झालेली नाही. हे खूप नैसर्गिकरित्या घडते. पण माझ्यासाठी हे खूप अहंकारातून येते', असं अभिषेक म्हणाला. 

'मला अशा नात्यात राहायचं नाही, जिथे...'

आपला मुद्दा मांडताना अभिषेक म्हणाला, 'मी इगोबाबत उल्लेख केला कारण,  शर्यत जिंकण्यासाठी समोरच्या व्यक्तीने पराभव पत्कारावा किंवा धावणे थांबवावे, अशी माझी मानसिकता नाही', असं अभिषेकने स्पष्ट केलं. 'मला अशा नात्यात राहायचं नाही, जिथे मला पुरुषी वाटावे म्हणून माझ्या पत्नीला  एखादी गोष्ट करणे सोडावे लागेल.  सुदैवाने माझ्या पत्नीलाही तसे वाटत नाही',  असं अभिषेक म्हणाला.

महत्त्वाच्या इतर बातम्या:

Comedian Sunil Pal: पुष्पगुच्छ देऊन सत्कार अन् स्टेजवरुन हाकलवलं, इव्हेंटमध्ये नेमकं काय घडलं? सुनील पाल म्हणाला, 'मला अपमानित..'