कंगना रणौत ते अनिल कपूर, ABP नेटवर्कच्या 'आयडियाज ऑफ इंडियाच्या' कार्यक्रमात कोण कोण सहभागी होणार? यादी पहा
Full speaker list of Ideas of India 2026 Mumbai summit: आयडियाज ऑफ इंडिया 2026 27-28 फेब्रुवारी रोजी मुंबईत होणार. या कार्यक्रमात दिग्गज कलाकार उपस्थित राहतील.

Ideas of India 2026 Mumbai summit: एबीपी नेटवर्क कायम भारतातील दिग्गजांच्या कारकिर्दीचे कौतुक करते. या वर्षीही आयडियाज ऑफ इंडिया हा भव्य दिव्य कार्यक्रम पार पडणार आहे. भारतातील कानाकोपऱ्यातील दिग्गजांना एकत्र आणणारा 'Ideas of India' समिट 27 आणि 28 रोजी पार पडणार आहे. हा मुख्य सोहळा मुंबईतील ग्रँड हयात या हॉटेलमध्ये होणार असल्याची माहिती आहे. या समिटमध्ये खास दिग्गजांना आमंत्रित करण्यात आले आहे. राजकारणी, कलाकार, तंत्रज्ञान आणि पॉलिसी क्षेत्रातील मान्यवर राष्ट्रीय मुद्द्यांवर चर्चा करतील. या वर्षीच्या समिटमध्ये चित्रपट, संगीत उद्योगातील प्रमुख कलाकार उपस्थित राहतील, अशी माहिती आहे.
नीरज घायवान आणि ईशान खट्टर
आयडियाज ऑफ इंडिया या कार्यक्रमात सिनेमा ऑफ एम्पॅथी - लोकल स्टोरीज, ग्लोबल अपील या सत्रात दिग्गज कलाकार उपस्थित राहतील. या सत्रात खास चित्रपट निर्माते नीरज घायवान आणि अभिनेता ईशान खट्टर सहभागी होतील. चित्रपट निर्माते घायवान यांनी होमबाउंडचे दिग्दर्शन केले होते. तर, ईशान खट्टर याने या चित्रपटात शोएबची भूमिका साकारली होती. त्यांचे हे सत्र 27 फेब्रुवारी रोजी दुपारी 1 च्या दरम्यान सुरु होईल.
श्रेया घोषाल
सिंगर श्रेया घोषालनं आतापर्यंत अनेक चार्टबस्टर गाणी गायली आहेत. ती पहिल्या दिवशी आयडियाज ऑफ इंडियाच्या समिटमध्ये उपस्थित राहणार आहे. 27 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 6:40 ते 7:20 या वेळेत तिचा सत्र पार पडेल. या वेळेत ती गोइंग ग्लोबल - म्युझिक मॅजिक या सत्रात ती उपस्थितांना संबोधित करेल.
अरण्य सहाय आणि क्रिस्टो टॉमी
28 फेब्रुवारी रोजी ह्यूमन्स इन द लूप या चित्रपटाचे निर्माते अरण्य सहाय आणि अंडरकरंटचे दिग्दर्शक क्रिस्टो टॉमी एका सत्रात उपस्थितांना संबोधित करतील. ते दुपारी 2:30 ते 3 वाजेपर्यंत हाऊ टू विन व्ह्युअर्स - द डायरेक्टर व्हिजन या विषयावर भाषण देतील.
अदनान सामी
गायक आणि पद्मश्री विजेते अदनान सामी हे म्युझिक दॅट हील्स - द मॅजिकल वर्ल्ड ऑफ रिदम या सत्रात सहभागी होतील. त्याचे सत्र सायंकाळी 6:10 ते 6:40 या वेळेत होणार आहे.
मृणाल ठाकूर
अभिनेत्री मृणाल ठाकूर तिच्या आगामी चित्रपटासाठी चर्चेत आहे. 'दो दीवाने शहर में' या चित्रपटात अभिनेत्री प्रमुख भूमिका साकारत आहे. हा चित्रपट 20 फेब्रुवारी रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होईल. ती आयडियाज ऑफ इंडिया या कार्यक्रमात सहभागी होणार आहे. 28 फेब्रुवारी रोजी ती या कार्यक्रमात बोलणार आहे. दुपारी 1 ते 1:30 या वेळेत ती सिनेमा अॅक्रॉस लँग्वेजेस - फ्रंटियर्स ऑफ आर्ट या सत्रात सहभागी होईल.
मुंबईत होणाऱ्या आयडियाज ऑफ इंडिया या कार्यक्रमाच्या दुसऱ्या दिवशी बॉलिवूड अभिनेत्री मोना सिंह, पंकज त्रिपाठी, अनिल कपूर आणि लोकसभा खासदार कंगना रणौत देखील उपस्थित राहणार आहे.
आयडियाज ऑफ इंडिया 2026 या कार्यक्रमात उपस्थित असणार्यांची यादी
मेघना मिश्रा
नीरज घायवान
विशाल जेठवा
ईशान खट्टर
अरमान मलिक
सुनील शेट्टी
अहान शेट्टी
श्रेया घोषाल
अरण्य सहाय
क्रिस्टो टॉमी
अदनान सामी
मृणाल ठाकूर
मोना सिंह
कंगना रणौत
पंकज त्रिपाठी
अनिल कपूर
























