Abhishek Bachchan Broke Silence On Divorce Rumors With Wife Aishwarya Rai: बॉलिवूडच्या (Bollywood) स्टार कपल्सपैकी (Bollywood Star Couple) एक असलेलं, पॉवरफुल कपल म्हणजे, अभिषेक बच्चन (Abhishek Bachchan) आणि ऐश्वर्या राय-बच्चन (Aishwarya Rai Bachchan). पण, गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूडच्या मोस्ट फेवरेट कपलमध्ये फारसं काही ठीक नसल्याच्या चर्चांना उधाण आलेलं. एवढंच नाहीतर, दोघंही लवकरच घटस्फोट (Abhishek Bachchan Aishwarya Rai Divorce Rumors) घेणार असल्याचंही बोललं जात होतं. गेल्या बऱ्याच काळापासून अभिषेक आणि ऐश्वर्या त्यांच्या प्रोफेशनल लाईफमुळे कमी आणि पर्सनल लाईफमुळे जास्त चर्चेत होते. पण, असं असूनही दोघेही याबाबत कधीचा काहीच बोलले नाहीत. एकीकडे दोघांच्या विभक्त होण्याच्या बातम्या सोशल मीडियावर ट्रेंड होत होत्या. तर, दुसरीकडे हे जोडपं काहीही न बोलता सार्वजनिक ठिकाणी एकत्र येऊन या अफवा खोट्या असल्याचं वारंवार सांगत होते.
अभिषेक बच्चन घटस्फोटाच्या चर्चांवर पहिल्यांदाच बोलला
बऱ्याच काळ सुरू असलेल्या घटस्फोटाच्या अफवा ऐकून अभिषेक बच्चन हैराण झाला आहे. अलिकडेच, ई टाईम्सशी बोलताना, अभिषेक बच्चननं त्याच्या नुकत्याच आलेल्या 'कालिधर लापता' सिनेमाबाबत बोलताना घटस्फोटाच्या अफवांवर मौन सोडलं आहे. अभिषेक बच्चन म्हणाला की, तो बहुतेकदा त्याच्याबद्दल पसरणाऱ्या अफवांकडे दुर्लक्ष करतो, पण आता ही बाब त्याच्यासाठी अत्यंत चिंतादायक ठरतेय. कारण, जेव्हा तुम्ही बराच काळ एखाद्या गोष्टीकडे दुर्लक्ष करता, तेव्हा लोकांचा तुमच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलू लागतो.
अशा अफवा खूप वेदनादायी असतात : अभिषेक बच्चन
अभिषेक बच्चन पुढे म्हणाला की, "अशा अफवा तुम्हाला खूप त्रास देतात. तुम्ही मला ओळखत नाही, तुम्हाला माझ्या आयुष्याबद्दल काहीच माहिती नाही, पण तरीही तुम्ही एका कम्प्युटरच्या मागे बसून एखाद्यासाठी काहीही वाईट लिहिणं योग्य नाही, त्यामुळे समोरच्या व्यक्तीला त्रास होऊ शकतो. अफवा लहान असो वा मोठी, त्याचा तुमच्या आयुष्यावर परिणाम होतो. अभिनेता म्हणतो की, अशा बातम्यांचा फक्त माझ्यावरच नाही तर माझ्या कुटुंबावरही परिणाम झाला आहे." तसेच, पुढे बोलताना अभिषेक बच्चननं प्रश्न विचारला आहे. अभिषेक म्हणतो की, जर कोणी तुमच्यासोबत असं केलं तर तुम्हाला कसं वाटेल?
17 वर्षांपासून एकमेकांसोबत... : अभिषेक बच्चन
अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या रायला बराच काळ एकमेकांना डेट केल्यानंतर लग्न करण्याचा निर्णय घेतला. अभिषेक बच्चननं ऐश्वर्याला लग्नाची मागणी घातली होती. त्यानंतर दोघांनी 2007 मध्ये लग्न केलं आणि 2011 मध्ये आराध्या बच्चनचा जन्म झाला. त्यांच्या लग्नाला 17 वर्ष झालीत आणि आजही हे जोडपं बॉलिवूडमधील सर्वात शक्तीशाली जोडपं म्हणून ओळखलं जातं.
दरम्यान, लग्नापूर्वी अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय अनेक चित्रपटांमध्ये एकत्र दिसलेत. दोघांचा 'गुरु' हा चित्रपट अजूनही चर्चेत आहे. याशिवाय 'ढाई अखर प्रेम के', 'धूम 2', 'कुछ ना कहो' अशा अनेक चित्रपटांमध्ये या जोडप्यानं धमाल केली आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :