Abhijeet Khandkekar : झी मराठी वाहिनीवरील 'माझिया प्रियाला प्रीत कळेना' (Majhiya Priyala Preet Kalena) या मालिकेतून अभिनेता अभिजीत खांडकेकर (Abhijeet Khandkekar) हा घरोघरी पोहचला. त्याच्या अभिनयाच्या जोरावर त्याने प्रेक्षकांची मनही जिंकलीत. त्यानंतर त्याच्या अभिनय क्षेत्राचा आलेख हा कायमच चढता राहिलाय. पण या मालिकेदरम्यान आलेल्या वाईट अनुभवाविषयी नुकताच खुलासा केला आहे. 


अभिजीतने नुकतच भार्गवी चिरमुलेच्या युट्युब चॅनलला मुलाखत दिली. यामध्ये त्याने अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं आहे. तसेच त्याने इंडस्ट्रीमध्ये आलेल्या वाईट अनुभवाविषयी देखील भावना व्यक्त केल्या आहेत. त्याने केलेल्या या खुलाश्यामुळे त्याच्या चाहत्यांना देखील चांगलाच धक्का बसला आहे. बालाजी फिल्म्स प्रोडक्शन हाऊसकडून आलेल्या वाईट अनुभवाविषयी अभिजीतने सांगितलं आहे. 


'संधी दिली' असं म्हणत खूपच कमी पैशांमध्ये...'


अभिजीतने पहिल्यांदाच त्याच्या या पहिल्या मालिकेदरम्यान आलेल्या अनुभवाविषयी सांगितलं आहे. त्याने म्हटलं की, मी याबद्दल खरंतर बोलणं टाळतो. ही माझी पहिलीच मालिका होती, त्यामुळे यासाठी पूर्णपणे मी प्रोडक्शन हाऊसलाही दोष देणार नाही. यामध्ये अनेक लोकांचा सहभाग असतो. त्यामुळे मागे वळून पाहताना आता असं वाटतं की, तेव्हा काही बाबतीत फारच वाईट वागणूक देण्यात आली होती.  त्यावेळी संधी दिली असं म्हणत खूपच कमी पैश्यांमध्ये आमच्याकडून काम करुन घेण्यात आलं होतं. पण तो व्यवसायाचा एक भाग आहे आणि आता त्याविषयी बोलून काहीही उपयोग नाही. त्या मालिकेने मला खूप प्रसिद्धी मिळवून दिली. पण अगदी लहान लहान गोष्टींवरुन त्रास दिला जायचा. तेव्हा असं वाटायचं की, माणूस म्हणून एक चांगली वागणूक दिली पाहिजे. 


मला माहित होतं की हे चुकीचं आहे - अभिजीत


मी याआधी कॉर्पोरेटमध्ये काम केलंय, त्यामुळे मला माहित होतं की, हे चुकीचं आहे. पण या क्षेत्रांच्या नियमांनुसार जे काही आहे, त्यामध्ये चांगल्या पद्धतीचं जेवण आलं, चांगली वागणूक आली पण या सगळ्या गोष्टी देण्यात आल्याच नाहीत. तुम्ही संधी देता, तुम्ही आमच्याकडून मोठं कामही करुन घेता, जेणेकरुन आमचं करिअर घडेल पण याचा अर्थ असा नाही होत की आम्ही कुणाचे गुलाम आहोत. 






ही बातमी वाचा : 


Govinda : धैर्यशील मानेंच्या निवडणूक प्रचारात गोविंदा उतरला, सभेत केलं हिंदी-मराठीत भाषण