Abhijeet Khandkekar: 'माझ्या नवऱ्याची बायको' मालिकेतून घराघरात लोकप्रिय ठरलेला अभिनेता अभिजीत खांडकेकर (Abhijeet Khandkekar) सध्या चर्चेत आहे, त्याच्या नव्या सिनेमामुळं. त्याच्या मर्दिनी चित्रपटातील भूमिकेचा सध्या कौतुक होतंय. या सिनेमाच्या निमित्ताने मुंठाशी संवाद साधताना तो सोशल मीडिया मालिकांमध्ये काम करण्याचा अनुभव आणि सिनेमातल्या भूमिकेविषयी तो बोललाय.  या सिनेमामुळे 'चॉकलेट बॉय म्हणून किती हँडसम आणि छान दिसतो' या पलीकडे माझा अभिनय कौशल्याचं कौतुक झाल्याचं तो म्हणाला. तुझेच मी गीत गात आहे ही मालिका संपून दोन वर्ष झाली.आता अभिनेता अभिजीत खांडकेकर कोणत्या मालिकेत दिसणार ?असा प्रश्न त्याच्या चाहत्यांना पडला आहे. तो पुन्हा मालिकेत दिसणार का असा प्रश्न विचारला असता, टीव्हीत काम करणं रोजंदारी नोकरी केल्यासारखा आहे. आणि एखादा चित्रपटात काम करणं हे व्यवसाय सांभाळण्यासारखा आहे.दोन्ही एकत्र करणं म्हणजे तारेवरची कसरत असल्याचं तो म्हणाला.

Continues below advertisement

काय म्हणाला अभिजीत खांडकेकर?

'मर्दिनी' चित्रपटासंदर्भात अभिजीत खांडेकर म्हणाला 'एखाद्या गणवेशातला अधिकाऱ्याची भूमिका करावी असं फार वाटत होतं.मर्दिनीच्या निमित्ताने ती पूर्ण झाली.माझ्या कामाला आणि चित्रपटाला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिलाय.मी एका वेगळ्या भूमिकेत या सिनेमात दिसलो आहे.अनेक कलाकार आणि दिग्दर्शकांकडून मला कामाची पोचपावती मिळाली. मी हेही करू शकतो आणि तेही हा विश्वास निर्माण होणं फार महत्त्वाचं असतं.तरच तुमच्यावर लोकविश्वास ठेवू शकतात.त्यासाठी कलाकाराचं वैविध्यपूर्ण काम दिसणं महत्त्वाचं असतं.या चित्रपटामुळे ते दाखवता आलं.या सिनेमाच्या निमित्ताने चॉकलेट बॉय म्हणून मी किती छान दिसतो हँडसम दिसतो या पलीकडे जाऊन माझ्या अभिनय कौशल्याचेही कौतुक झालं .जे मला कधीपासून हवं होतं!असं अभिजीत म्हणाला.

मालिके विषयी बोलताना अभिजीत पुढे म्हणाला 'आतापर्यंत केलेल्या मालिका ह्या मी माझ्या मनासारख्याच केल्या.आजवर जे जे काम केलं त्याबद्दल मी समाधानी आहे.मात्र मालिका करताना वेळ दिवसासंदर्भाची बांदिलकी असते. त्यामुळे इच्छा असूनही इतर कलाकृतींसाठी मी सलग 10 -20 दिवस देऊ शकत नाही. माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेच्या काळात वेळेअभावी मी इतर काम करू शकलो नाही.करिअरच्या या टप्प्यावर चित्रपटांमध्ये मनासारख्या भूमिका मिळत आहेत.हे खरं आहे.पण या आधी केलेल्या मालिकांमधल्या भूमिकांसाठीही मी समाधानी आहे. कोणत्याही कलाकाराला त्याची ओळख निर्माण करण्यासाठी मालिकेसारखं दुसरं सशक्त माध्यम नाही.मालिका करणे हे फार आव्हानात्मक आहे.वैयक्तिक आयुष्य विसरवं लागतं .विशिष्ट वेळ द्यावा लागतो.तेवढ्याच पटीनं आर्थिक फायदा होऊ शकतो .ओळख कमावता येते.आज प्रेक्षकांमध्ये माझी ओळख आहे ती मालिकांमुळे.त्यामुळे मालिका या माध्यमाविषयी माझ्या मनात प्रचंड आदर आहे.आर्थिकदृष्ट्या स्थिर करणारे माध्यम आहे.'असं अभिजीत खांडकेकर म्हणाला.

Continues below advertisement

टीव्हीत काम करणं रोजंदारी नोकरी केल्यासारखं...

माझ्या नवऱ्याची बायको या मालिके नंतर तुझेच मी गीत गात आहे ही मालिका अभिजीतने केली होती. या मालिके नंतर तो पुन्हा कोणत्या मालिकेचा झळकणार याकडे प्रेक्षकांचं लक्ष आहे. तो पुन्हा मालिकेत दिसणार का ?असा प्रश्न विचारला असता तो म्हणाला 'तुझेच मी गीत गात आहे'ही मालिका संपून दोन वर्ष झाली.तेव्हापासून विविध वाहिन्या मला सतत विचारत आहेत.वाहिन्या प्रेक्षक यांना आपण हवे आहोत याचा आनंदच आहे.पण टीव्हीत काम करणं रोजंदारी नोकरी केल्यासारखे आहे.आणि एखादं चित्रपटात काम करणं व्यवसाय सांभाळण्यासारखं.त्यामुळे हे दोन्ही एकत्र करणं म्हणजे तारेवरची कसरतच आहे.सध्या काही चित्रपटांच काम सुरू आहे.मर्यादित वेळ देता येईल आहे तू नवीन मालिकांपेक्षा कथाबाह्य कार्यक्रम करणाला प्राधान्य देतो.पण मला मालिका करायची नाही असं अजिबात नाही.असेही त्याने स्पष्ट केलं.