Abhijeet Dipke On Kangana Ranaut: भाजप खासदार आणि अभिनेत्री कंगना रणौत (Kangana Ranaut) हिने दिल्लीतील जंतर-मंतर येथे झालेल्या 'कॉकरोच जनता पार्टी' (CJP) च्या Gen Z (तरुणाईच्या) आंदोलनावर जोरदार टीका केली होती. आंदोलक तरुणांना थेट 'गटारछाप पिढी' असं कंगना म्हणाली. तसेच या आंदोलनाचे व्हिडीओ पाहून मानसिक धक्का बसल्यामुळे आता स्वतःला सावरण्यासाठी मला सोशल मीडियापासून दूर राहण्याची गरज असल्याचंही कंगना म्हणाली. 

Continues below advertisement

भारत हा सुसंस्कृत लोकांचा देश आहे. तुम्ही स्वतःला 'कॉकरोच' म्हणता आणि त्यांच्यासारखेच वागता. तुम्ही जगासमोर फक्त घाण आणि विद्रूपता मांडत आहात, असे म्हणत तिने "यांना जन्म कोण देतंय? असा संतप्त सवालही कंगना रणौतने केला. कंगना रणौतच्या या सगळ्या विधानावर आता कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दीपके यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे. कंगना रणौतच्या बोलण्याला कोण गांभीर्याने घेतं? अशी मोजकी प्रतिक्रिया अभिजीत दीपके यांनी दिली.

केंद्र सरकार अपयशी ठरल्यास पुन्हा देशभर आंदोलन करणार- अभिजीत दीपके (Abhijeet Dipke On Modi Goverment)

विद्यार्थी आंदोलकांवरील कारवाई थांबवण्यात केंद्र सरकार अपयशी ठरल्यास पुन्हा देशभर आंदोलन करण्याचा इशारा CJP चे संस्थापक अभिजीत दीपके यांनी दिला. आम्ही याबाबत लवकरच भूमिका जाहीर करू. जर सरकारने आपली कार्यपद्धती सुधारली नाही, तर आम्हाला आंदोलन करावेच लागेल, असं अभिजीत दीपकेंनी स्पष्ट केलं

आम्ही वयाच्या सोळाव्या वर्षांपासूनच स्वतःची कारकीर्द घडवत आहोत- कंगना रणौत (Kangana Ranaut Marathi News)

जंतर मंतर येथील तरुणांच्या आंदोलनाचे व्हिडीओ पाहून मानसिक धक्का बसला. समाजाला देण्यासारखं त्यांच्याकडे काहीही मोलाचं नसतं. तरीही, ड्रग्ज घेणं, दारू पिणं आणि अनेकांसोबत लैंगिक संबंध ठेवणं या गोष्टींमधील आपल्या स्वातंत्र्याचं ते अभिमानानं प्रदर्शन करतात, अशी टीकाही कंगना रणौतने केली. आपल्या 75 वर्षीय पंतप्रधानांना लक्ष्य करण्यात आले आणि त्यांच्या दिवंगत मातेबद्दल अत्यंत घाणेरड्या भाषेत शिवीगाळ केली गेली. आम्हीही विद्यार्थी आंदोलनांमध्ये सहभागी झालो आहोत; पण हे नक्की कोणत्या प्रकारचे विद्यार्थी आहेत आणि ती कसली अश्लील भाषा वापरत आहेत? ते विद्यार्थ्यांसारखे तरी वाटतात का? भविष्यात जर या लोकांना सर्वोच्च न्यायालयातील वकिलांची किंवा कायदेशीर मदतीची गरज भासली, तर त्यांचे पालक त्याचा खर्च पेलू शकतील का? स्वतःकडे तर त्यासाठी पैसे नाहीत. आम्ही वयाच्या सोळाव्या वर्षापासूनच स्वतःची कारकीर्द घडवत आहोत; आम्ही कधीही आमच्या पालकांवर ओझे बनलो नाही... एक समाज म्हणून, हे आम्हाला अजिबात मान्य नाही, असंही कंगना रणौतने सांगितले. 

राज्यासह देश-विदेशातील महत्वाच्या घडामोडी, VIDEO:

संबंधित बातमी:

Kishori Pednekar On Kangana Ranaut: घाणेरडी नटी, थू केलं पाहिजे; कुत्री सोडून भो भो करायला लावायचं; किशोरी पेडणेकर कंगना रणौतवर संतापल्या, काय काय म्हणाल्या?