Abhijeet Bhattacharya Get Legal Notice: प्रसिद्ध बॉलीवूड गायक अभिजीत भट्टाचार्य (Abhijeet Bhattacharya) यांनी अनेक चित्रपटांमधील गाण्यांसाठी आपला आवाजा दिला आहे. त्यांनी गायलेली गाणी आजही लोकांच्या काळजाचा ठाव घेतात. आपल्या आवाजासाठी प्रसिद्ध असलेले अभिजीत भट्टाचार्य आपलं मत उघडपणे मांडण्यासाठी देखील ओळखले जातात. अनेकदा ते वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेतही आले आहेत. नुकतंच एका मुलाखतीत बोलताना अभिजीत भट्टाचार्य यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. आता हेच वक्तव्य अभिजीत भट्टाचार्य यांना चांगलंच भोवल्याचं पाहायला मिळत आहे."महात्मा गांधी पाकिस्तानचे राष्ट्रपिता होते.", असं वक्तव्य अभिजीत भट्टाचार्य यांनी केलं आहे. आता याप्रकरणी पुण्यातील वकिलांनी त्यांना नोटीस धाडली आहे.

Continues below advertisement

अभिजीत भट्टाचार्य यांना पाठवली लीगल नोटीस 

अभिजीत भट्टाचार्य यांनी महात्मा गांधींबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुशे चर्चांना उधाण आलं आहे. अभिजीत भट्टाचार्य यांना कायदेशीर नोटीस धाडली आहे. वकील असीम सरोदे यांनी ही नोटीस पाठवली असून त्याबाबत बोलताना ते म्हणाले की, जर त्यांनी त्यांच्या वक्तव्यांसाठी तात्काळ माफी मागितली नाही, तर त्यांच्याविरुद्ध फौजदारी खटला सुरू केला जाईल. अशा कमेंट करुन गायकानं आपल्या मर्यादा ओलांडल्याचंही नोटीसमध्ये म्हटलं आहे. वकिलांनी सांगितलं की, गायकानं आपली वस्तुस्थिती तपासावी कारण 150 हून अधिक देशांनी त्यांच्या (महात्मा गांधी) नावाने पोस्टल स्टॅम्प जारी केले आहेत.

अभिजीत भट्टाचार्य नेमकं काय म्हणाले होते? 

एका पॉडकास्टमध्ये बोलताना अभिजीत भट्टाचार्य म्हणाले होते की, त्यांनी महात्मा गांधींबद्दल एक वक्तव्य केलं. ज्यामुळे ते अडचणीत आले आहेत. अभिजित भट्टाचार्य म्हणाले की, "महात्मा गांधी हे भारताचे नव्हे, तर पाकिस्तानचे राष्ट्रपिता होते. भारत आधीच भारत होता. पाकिस्तानची निर्मिती झाली आहे. महात्मा गांधींचं इथे राष्ट्रपिता असं चुकीचं वर्णन करण्यात आलं. तेच जन्मदाता होते, तेच पिता होते, तेच आजोबा होते आणि तेच सर्वकाही होते." 

Continues below advertisement

दरम्यान, अभिजीत भट्टाचार्य यांनी मिथुन चक्रवर्ती, विजय आनंद, आमिर खान, शाहरुख खान, सलमान खान, सैफ अली खान, सनी देओल, संजय दत्त, अक्षय खन्ना, अक्षय कुमार, हृतिक रोशन, बॉबी देओल आणि रणबीर कपूर यांसारख्या बॉलिवूड कलाकारांना रुपेरी पडद्यावर आपला आवाज दिला आहे. या कलाकारांसाठी त्यांनी लोकप्रिय गाणी गायली आहेत. 

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Rasha Thadani Dance On Uyi Amma : रविना टंडनची लेक म्हणतेय, "उई अम्मा, हाय हाय मैं तो मर गयी"; राशा थडानीच्या डान्सनं सर्वांना लावलं वेड