Bigg Boss Marathi : बिग बॉस मराठीचा सहावा सीजन सध्या चांगलाच चर्चेत आहे. या सीजनमधील प्रत्येक कलाकाराची चर्चा होताना दिसतेय. या सीजनसह सध्या बिग बॉसच्या मागील सीजन मधील कलाकारांचीही एकच चर्चा आहे. बिग बॉसच्या घरातील कटकारस्थान, भांडण आणि टीव्ही मागे दिसणारी अनेक गुपिते कलाकारांनी एका मुलाखतीत बाहेर काढली आहेत. बिग बॉसच्या घरातील किस्से प्रेक्षकांना कायमच ऐकायला आवडतात. 'अभिजात मराठी'ला दिलेल्या मुलाखतीत बिग बॉसच्या मागील सीजनमधील एकेक कलाकार या मुलाखतीत सामील झाले होते. यावेळी अभिनेता आस्ताद काळे याने बिग बॉसच्या सीझनमध्ये सहकलाकार व स्पर्धक रेशम टिपणीससोबत झालेला एक धक्कादायक प्रकार उघड केला.

Continues below advertisement

रेशम चिटणीसला झोपेत रोज भिंतीवर टकटक आवाज यायचा. दोन-तीन वेळा हा आवाज आल्यानंतर ती घाबरली होती. नंतर तिने आस्तादला सगळा प्रकार सांगितलेला. नंतर भिंतीच्या मागून टकटक कोण करतय हे कळलं आणि त्या व्यक्तीला कामावरून काढून टाकण्यात आलं होतं असंही त्यानं सांगितलं.

रेशमताईच्या बेडजवळ रात्री टकटक आवाज अन् ..

आस्ताद म्हणाला," मी जिथे झोपायचो ना तिथे हेडबोर्डच्या खाली असलेल्या प्लायला एक भोक पडलेलं होतं. गेल्या गेल्याच मला ते दिसलं होतं . तिथून मला डेनिम घातलेल्या एका माणसाचा पायाही दिसला होता. ऑपरेट करायला एक जिवंत माणूस तिथे बसला होता .संपूर्ण सेटवर 7 Dop होते. आमच्या सेटवर 250 माणसांचं युनिट होतं .

Continues below advertisement

ज्या ठिकाणी रेशम ताई झोपायची तिथे तिच्या बेडच्या वरती एक काच होती. आमच्या सेटवर 250 माणसांचा युनिट होतं. तिला रात्री टकटक ऐकायला आली. ती घाबरली आणि हॉलमध्ये जाऊन बसली. रेशमने हे आस्तादला सांगितलं होतं. 'तू पण टकटक कर' तिला म्हणाला.' पण याची परवानगी नाही 'असं रेशम म्हणाली. त्यावर 'मग जो कोणी टकटक करतोय, त्यालाही हे करण्याची परवानगी नाही' असा आस्तादने तिला सांगितलं. नंतर रेशम बेडजवळ गेली. तिथून टकटक आवाज आल्यानंतर तिनेही प्रतिक्रिया म्हणून तिथे टकटक केलं आणि तिथून पळून गेली. नंतर कळलं की भिंतीच्या मागे कॅमेरामन होता. या कॅमेरामनला नंतर काढून टाकण्यात आलं. कारण कॅमेरामनची कृती ही स्पर्धकाशी संपर्क साधण्यासाठीची होती असं लक्षात आलं .असं आस्तादने सांगितलं.