Aasif Sheikh On Salman Khan: 'भाभी जी घर पर है' (Bhabhi Ji Ghar Par Hai ) या मालिकेतून प्रसिद्धीझोतात आलेला अभिनेता आसिफ शेखनं (Aasif Sheikh) 'करण अर्जुन' सिनेमात सलमान खानसोबत (Salman Khan) काम केलेलं. या चित्रपटात त्यानं निगेटिव्ह भूमिका साकारलेली आणि अलिकडच्याच एका मुलाखतीत त्यानं सलमान खान आणि त्याचे वडील, दिग्गज लेखक सलीम खान यांच्याशी असलेल्या त्याच्या नात्याबद्दल उघडपणे सांगितलं आहे. तसेच, आसिफनं सलमानच्या फार्महाऊसवर जाऊन तो सलीम खान यांच्यासोबत वेळ कसा घालवायचा? हे सांगितलं. ते वैचारिकदृष्ट्या एवढे समृद्ध आहेत की, त्यांच्यासोबत वेळ घालवण्यास मी नेहमीच उत्सुक असतो, असंही तो म्हणाला. 

Continues below advertisement

आसिफ शेखनं असंही नमूद केलं की, सलमान खानचा मेहुणा अतुल अग्निहोत्री हा त्याचा खूप चांगला मित्र आहे. हिंदी रशशी बोलताना आसिफ शेख म्हणाला की, "सलीम काका खूप शांत व्यक्ती आहेत. कधीकधी मी सलमान खानच्या फार्मवर जायचो आणि त्याच्यासोबत वेळ घालवायचो. त्यांच्याशी संवाद साधणं खूप मनोरंजक आणि खरं असायचं. त्यांची विनोदबुद्धी अद्भूत आहे. ते आम्हाला ज्या गोष्टी सांगायचे आणि ते जे अनुभव शेअर करायचे, ते खूप काही शिकवणारे आहेत."

"अतुल अग्निहोत्री माझा खूप चांगला मित्र..."

"अतुल अग्निहोत्री आणि मी खूप चांगले मित्र आहोत. आम्ही एकत्र बराच वेळ घालवायचो, विशेषतः सलीम अंकल. मी त्यांच्याकडून खूप काही शिकलो. त्यांनी मला सांगितलं की, अमिताभ बच्चन यांना त्यांच्या पहिल्या चित्रपटात कसं कास्ट केलं गेलं आणि इतर अनेक गोष्टी... या काळात त्यांनी सांगितलेले किस्से आणि आठवणी खूप उपयुक्त ठरली आहेत. त्यांनी मला सांगितलेलं की, एखाद्याला काहीतरी देण्याचे दोन मार्ग आहेत. एकतर तुम्ही ते सगळ्यांसमोर द्या किंवा ते गुप्तपणे द्या... त्यांचं हेच वाक्य त्यांच्याबाबत खूप काही सांगून जातं...", असं आसिफ शेख म्हणाला. 

Continues below advertisement

"सलमान खानमध्ये हिंमत नाही..." 

आसिफ शेख म्हणाले की, "सलमान खान आपल्या वडिलांच्या शब्दापुढे अजिबात जात नाही... त्यांचा तो खूप सन्मान करतो. सलमानचे वडिलच त्याचे खूप मोठे टीकाकार आहेत. ते थेट तोंडावर सगळं सांगतात, खरं खोटं करतात, त्यांना उगाच गोड बोलणं अजिबात जमत नाही. कारण त्यांचा मुलगा एक स्टार आहे. पण, सलीम काका स्वतःच एक मोठे स्टार आहेत. मला अजूनही आठवतंय की, जेव्हा सलमान खान नवनवा स्टार बनलेला, त्यावेळीही वडिलांसमोर बोलायलाही तो घाबरायचा. सलमान खानमध्ये आजही त्याच्या वडिलांसमोर बोलायची हिंमत नाही. सलमान आपल्या वडिलांचा खूप सन्मान करतो..."

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Sameer Choughule Read His Own Death News: 'समीर चौघुले गेले, अशी बातमी आली अन्...', एकदा नाहीतर, दोनदा ऐकलेली स्वतःच्याच मृत्यूची बातमी; नेमकं काय घडलेलं?