Aarti Solanki On Sai Tamhankar Adkitta Movie: मराठीतल्या सुपरस्टार अभिनेत्रींमध्ये (Marathi Actress) समाविष्ट होणारी अभिनेत्री म्हणजे, सई ताम्हणकर (Sai Tamhankar). सई ताम्हणकर केवळ मराठीपुरतीच (Marathi Films) मर्यादीत नाही, तर तिनं अनेक बॉलिवूड (Bollywood Movies) सिनेमांमध्येही दमदार भूमिका साकारल्या आहेत. ग्लॅमरस आणि बोल्ड अशी सई बऱ्याच सिनेमांमध्ये वेगळ्या भूमिकांमध्येही दिसली आहे. नुकताच सई ताम्हणकरचा 'अडकित्ता' सिनेमा ओटीटीवर रिलीज झालाय. या सिनेमात सई ताम्हणकरनं साकारलेली भूमिका सर्वांचं लक्ष वेधून घेतेय. अशाच एका मराठी अभिनेत्रीला सईच्या अडकित्यामधल्या भूमिकेनं भूरळ घातली आहे. सोशल मीडियावर पोस्ट करुन या अभिनेत्रीनं सई ताम्हणकरचं तोंड भरुन कौतुक केलंय. 

Continues below advertisement

'फू बाई फू'सारख्या कार्यक्रमातून घराघरांत पोहोचलेली आणि आपल्या कॉमेडी अंदाजानं प्रेक्षकांना खळखळून हसवणारी अभिनेत्री आरती सोलंकी (Actress Aarti Solanki) नेहमीच अनेक मुद्द्यांवर व्यक्त होत असते. आता आरती सोलंकीनं सोशल मीडियावर एक पोस्ट करत सई ताम्हणकरचं कौतुक केलंय. तसेच, तिनं प्रेक्षकांनाही सुनावलंय. मराठी प्रेक्षक म्हणून आपण किती छोट्या मनाचे आहोत हे कळतं. आपल्याला कौतुक फक्त बॉलिवूड मधल्या अभिनेत्रींचं आहे, असं आरती सोलंकी म्हणालीय. 

मराठी अभिनेत्री आरती सोलंकी नेमकं काय म्हणाली? (Aarti Solanki On Sai Tamhankar)

Continues below advertisement

मराठी इंडस्ट्रीसोबतच बॉलिवूड गाजवणारी अभिनेत्री सई ताम्हणकर विषयी बोलताना आरती सोलंकी म्हणाली की, "अडकित्ता' सिनेमा पाहिला आणि साईचा 'फू बाई फू' प्रवास डोळ्यांसमोर आला. तिनं केलेल्या बोल्ड भूमिका ते अगदी सरळ साधी बाई, आयटम साँग, निवेदिका, हिंदी चित्रपट हे सगळं पाहिलं आहे..."

मराठी प्रेक्षक म्हणून आपण किती छोट्या मनाचे आहोत... : आरती सोलंकी

आरती सोलंकी पुढे बोलताना म्हणाली की, "मराठी प्रेक्षक म्हणून आपण किती छोट्या मनाचे आहोत हे कळतं. आपल्याला कौतुक फक्त बॉलिवूड मधल्या अभिनेत्रींचं आहे. त्यांना अभिनयातला 'अ' जरी येत नसला तरी आपण त्यांना सुपरस्टार म्हणतो. पण आपल्या मराठी चित्रपटसृष्टीमधल्या मराठी अभिनेत्रींची आपल्याला मात्र किंमत नाही...", असं म्हणत आरती सोलंकी हिनं बॉलिवूडमधल्या अभिनेत्रींचा उदोउदो करणाऱ्या मराठी प्रेक्षकांना चांगलाच टोला लगावला आहे. 

आरती सोलंकी एवढंच बोलून थांबली नाही, तिनं मराठी सिनेसृष्टीतील अभिनेत्रींवरही भाष्य केलंय. आरती सोलंकी म्हणाली की, "मराठी चित्रपटसृष्टीमध्ये सई ताम्हणकर , प्रिया बापट, छाया कदम, अमृता खानविलकर या अशा अभिनेत्री आहेत, ज्यांनी फक्त मराठी सिनेसृष्टीमध्येच नाही तर बॉलिवूड सिनेमे, वेब सीरिज, मराठी नाटक ह्यांत मोलाचं काम करतायेत. खूप वर्षे स्ट्रगल केल्यानंतर त्यांना ही प्रसिद्धी मिळाली आहे. आपण सुद्धा प्रेक्षक म्हणून मन मोठं करुया आणि आपल्या मराठी अभिनेत्रींना सुपरस्टार म्हणुयात..."

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Sonali Kulkarni On South Actor Nani: 'नानी सेटवर स्वतःला मोठा 'स्टार'...', सोनाली कुलकर्णीचं साऊथ सुपरस्टारबाबत मोठं वक्तव्य, स्वतःला आलेला अनुभव सांगताना म्हणाली...