Aarti Solanki On Vidyanand Bapat Dj Controversy: सध्या पुण्यात (Pune News) गणेशोत्सवात (Ganeshotsav) डीजेवर बंदी (Ban DJ) घालण्याच्या मागणीनं जोर धरला आहे. डीजेला बंदी घालण्याची मागणी करणारे विद्यानंद बापट (Vidyanand Bapat) यांच्यामुळे भलतेच चर्चेत आहे. नुकताच त्यांनी लावून धरलेल्या डीजी विरोधातील मागणीमुळे त्यांना मारहाणही करण्यात आली. अनेकांनी त्यांच्या भूमिकेचं समर्थ केलंय, पण काहींनी मात्र त्यांच्या मागणीचा कडाडून विरोध केलाय. आता हे प्रकरण चांगलंच चर्चेत आलं असून अनेकांनी यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत. अशातच मराठी अभिनेत्री आरती सोलंकी (Marathi Actress Aarti Solanki) हिनंही विद्यानंद बापट यांच्यावर एक पोस्ट केलीय.
गणेशोत्सव आणि सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये डीजे, ढोल-ताशे तसेच लाऊडस्पीकरच्या वाढत्या आवाजाविरोधात बापट यांनी भूमिका घेतलीय. त्यांच्या भूमिकेबाबत माध्यमांशी संवाद साधत असतानाच त्यांच्यावर हल्ला झाला. आता या मुद्द्यावर मराठी अभिनेत्री आरती सोलंकी हिनं एक फेसबुक पोस्ट करुन आपलं मत व्यक्त केलं आहे.
'फू बाई फू'सारख्या कार्यक्रमातून घराघरांत पोहोचलेली आणि आपल्या कॉमेडी अंदाजानं प्रेक्षकांना खळखळून हसवणारी अभिनेत्री आरती सोलंकी (Actress Aarti Solanki) नेहमीच अनेक मुद्द्यांवर व्यक्त होत असते. आरतीनं पोस्टमध्ये विद्यानंद बापटांना फार स्पष्ट मराठी न बोलण्याची विनंती केलीय. त्यांनी म्हटलंय की, तुम्ही डीजेबाबत बोलताय, पण अनेकांना वाटतंय तुम्ही गणपती बाप्पा आणि गणेशोत्सवाबद्दल बोलत आहात, असंही आरतीनं म्हटलंय.
अभिनेत्री आरती सोलंकी नेमकं काय म्हणाली? (Aarti Solanki On Vidyanand Bapat)
अभिनेत्री आरती सोलंकी म्हणाली की, "विद्यानंद बापट यांना कळकळीची विनंती आहे की, फार स्पष्ट मराठी बोलू नका. काय आहे की डीजे आणि ध्वनीप्रदूषण याविरोधात तुम्ही बोलत आहात. पण, समोरच्या असुशिक्षित, माजोरड्या, बिनडोक, दीड शहाण्या लोकांना वाटतंय की तुम्ही गणपती बाप्पा आणि गणेशोत्सवाबद्दल बोलत आहात. आज तुमच्यावर ज्याने हल्ला केला त्याच्यावरुन त्याचे शिक्षण आणि त्याच्यावर झालेले संस्कार हे दिसून येतात..."
दरम्यान, विद्यानंद बापट यांच्या शुद्ध आणि अस्खलित मराठीच्या जोरदार चर्चा रंगल्या आहेत. सोशल मीडियावर तर सगळीकडे विद्यानंद बापटांचीच चर्चा रंगली आहे. ते बोलत असलेली शुद्ध मराठी, ते वापरत असलेले शब्द ऐकून तर अनेकजण चक्रावले आहेत. अनेकांनी तर यावर मीम्सही करायला सुरुवात केलीय. काही दिवसांपूर्वीच विद्यानंद बापट यांनी माध्यमांशी बोलताना एक श्लोक वापरला, जो नेटकऱ्यांना प्रचंड आवडलाय. सध्या राजकारणी असो वा नेटकरी सगळीकडे विद्यानंद बापट यांची आणि त्यांच्या मराठीवर असलेल्या प्रभूत्वाचीच चर्चा होताना पाहायला मिळतेय. आरती सोलंकी व्यक्तीरिक्त अनेक मराठी कलकारांनी विद्यानंद बापट करत असलेल्या मागणीवर आपलं मत मांडलं आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
