Aamir Khan and Salman Khan Viral Video: मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानचा (Aamir khan) सिनेमा 'लगान'चा (lagaan) चाहतावर्ग खूप मोठा आहे.  या सिनेमाला 25 वर्षे पूर्ण झाली आहेत.  या सिनेमानं भारतीय चित्रपटसृष्टीत एक नवा इतिहास रचला होता. दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर आणि आमिर खान (Lagaan Film) यांच्या या सिनेमानं जागतिक स्तरावर भारतीय सिनेसृष्टीची मान उंचावली होती. तसेच आमिर खानच्या प्रोडक्शन हाऊसलाही (Aamir Khan production house) 25 वर्ष पूर्ण झाली आहेत. आमिर खानच्या लगान सिनेमाच्या आणि आमिर खानच्या प्रॉडक्शन हाऊसच्या 25 व्या वर्धापन दिनानिमित्त मुंबईत एका सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या  इव्हेंटमध्ये दिग्गज कलाकारांची मांदियाळी पाहायला मिळाली. 

Continues below advertisement

आमिर खानच्या इव्हेंटमध्ये सलमान खानची हटके एन्ट्री (Salman Khan Bald latest Look)

या इव्हेंटमध्ये सलमान खान (Salman Khan), करिना कपूर,  रेखा यांच्यासह अनेक बॉलिवूड कलाकार उपस्थित होते. या इव्हेंटमध्ये सलमान खान आपल्या हटके अंदाजात पोहोचला. त्याने अल्ट्रा - शॉर्ट हेअर लूकमध्ये एन्ट्री घेतल्यानंतर पापाराझींची नजर आपोआप सलमान खानकडे वळली.  सलमान खानचा हा खास लूक सोशल मीडियात तुफान व्हायरल झाला. उपस्थित सेलिब्रिटी आणि पापाराझींनाही शॉक बसला. 

 

Continues below advertisement

सोशल मीडियावर चाहते सलमान खानच्या लूकची तुलना, 'तेरे नाम' सिनेमातील त्याच्या 'राधे' या पात्राच्या हेअरस्टाईलशी करत आहेत.  सेलिब्रेशन दरम्यान, जेव्हा आमिर आणि सलमान खान पोज देत होते,  तेव्हा पापाराझी त्यांना  कॅमेऱ्याकडे पाहायला सांगत होते. यावेळी पापाराझींना त्यानं मजेशीर रिअॅक्शन दिली. सलमान खानची रिअॅक्शन पाहून आमिर खानलाही हसू आवरता आलं नाही.

आमिर खानच्या इव्हेंटमध्ये दिग्गज कलाकारांची मांदियाळी (Aamir Khan Event)

या इव्हेंटमध्ये सलमान खान लगान सिनेमाच्या टीमसोबत उपस्थित होता. या खास इव्हेंटमध्ये काजोल, जूही चावला, रेखा,  किरण राव, आमिर खान, आमिर खानची मुलगी इरा खान आणि त्याचा जावई यांच्यासह अनेक सेलिब्रिटी उपस्थित होते.  यावेळी  सगळ्यांच्या नजरा सलमान खानकडे वळल्या. 

महत्त्वाच्या इतर बातम्या:

'देऊळ बंद 2' सिनेमाचा नाद करायचा नाय; चौथ्या आठवड्यातही जबरदस्त कमाई, रविवारचं कलेक्शन किती?