एक्स्प्लोर

Aamir Khan Rejected Amazon Prime OTT Deal: 'सितारे जमीन पर'मार्फत आमिरला करायचं महत्त्वाचं काम; त्यासाठी धुडकावली प्राईम व्हिडीओची 120 कोटींची डील, कारण काय?

Aamir Khan Rejected Amazon Prime OTT Deal: आमिर खाननं 'सितारे जमीन पर' ओटीटीवर रिलीज न करता थिएटरमध्ये रिलीज करण्याच्या नादात तब्बल 120 कोटींची डील रिजेक्ट केल्याची माहिती मिळत आहे. 

Aamir Khan Rejected Amazon Prime OTT Deal: बॉलिवूडचा 'मिस्टर परफेक्शनिस्ट' (Bollywood Mr. Perfectionist) म्हणून ओळखला जाणारा आमिर खान (Aamir Khan) लवकरच त्याचा 'सितारे जमीन पर' (Sitaare Zameen Par) सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येत आहे. आमिरच्या आगामी चित्रपटाची सगळीकडे चर्चा रंगली असून 20 जून रोजी सिनेमा थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. पण, त्यापूर्वी आमिर हा सिनेमा ओटीटीवर रिलीज (OTT Released) करणार असल्याच्या चर्चा रंगलेल्या. ज्यावेळी आमिरला याबाबत विचारलं गेलं, त्यावेळी सर्वांनी स्पष्ट नकार दिला. तसेच, सिनेमा थिएटरमध्येच रिलीज केला जाणार असल्याचं त्यानं वारंवार ठणकावून सांगितलं. पण, आता आमिर खाननं 'सितारे जमीन पर' ओटीटीवर रिलीज न करता थिएटरमध्ये रिलीज करण्याच्या नादात तब्बल 120 कोटींची डील रिजेक्ट केल्याची माहिती मिळत आहे. 

ट्रेड एनालिस्ट कोमल नाहटा यांनी दिलेल्या माहितीनुसार, "आमिर खानला हे पाहायचंय की, जर एखादा चित्रपट थिएटरमध्ये रिलीज होत असेल आणि तो आठ आठवड्यांनीही ओटीटी प्लॅटफॉर्मवर येत नसेल, तर प्रेक्षकांना तो थिएटरमध्ये पाहण्यासाठी मजबूर होतील की, नाही. अभिनेता 'सितारे जमीन पर' हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित झाल्यानंतर थेट यूट्यूबवर अपलोड करेल, पण काही काळानंतर. दरम्यान, हा सिनेमा फ्रीमध्ये उपलब्ध नसेल. यासाठी प्रेक्षकांना पैसे भरावे लागतील. त्यानंतरच ते पाहू शकतील."     

आमिरनं नाकारली प्राईम व्हिडीओची मोठी डील 

आर.एस. प्रसन्ना दिग्दर्शित 'सितारे जमीन पर' सिनेमाचे हक्क खरेदी करण्यासाठी अमेझॉन प्राईम व्हिडीओनं आमिर खानला 120 कोटी रुपयांची ऑफर दिली होती. पण त्यानं ही ऑफर नाकारली. कारण चित्रपटगृहांमध्ये 8 आठवडे पूर्ण झाल्यानंतर लगेचच हा चित्रपट डिजिटल पद्धतीनं प्रदर्शित होणार होता. पण अभिनेता आता वेगळा विचार करत आहे. त्याला प्रेक्षकांना पुन्हा थिएटरशी जोडायचं आहे.

आमिर खानच्या चित्रपटात 10 नवख्या कलाकारांना संधी 

'सितारे जमीन पर' हा 2007 मध्ये प्रदर्शित झालेल्या आमिर खानच्या 'तारे जमीन पर' चित्रपटाचं दुसरं रूप आहे. यात 10 नवे कलाकार आहेत आणि ते सर्व दिव्यांग आहेत. ऑडिशननंतर या चित्रपटासाठी अरुष दत्ता, गोपी कृष्ण वर्मा, संवित देसाई, वेदांत शर्मा, आयुष भन्साळी, आशिष पेंडसे, ऋषी शहानी, ऋषभ जैन, नमन मिश्रा आणि सिमरन मंगेशकर यांची निवड करण्यात आली आहे. या चित्रपटात जेनेलिया देशमुख देखील मुख्य भूमिकेत आहे. CBFC नं कोणत्याही कटशिवाय हा चित्रपट पास केला आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Amol Bawdekar Suffers Heart Attack: 'डॉक्टर, मला तीन तास द्या... मी प्रयोग करून येतो, मग ऑपरेशन करा'; हार्ट अ‍टॅकनंतही अभिनेत्याची डॉक्टरांकडे मागणी, अन्...

महत्त्वाच्या बातम्या

DEool Band Child Actress:'देऊळ बंद' नंतर डोक्यात हवा गेली, 'त्या' आगाऊ कमेंटनंतर आईने व्हॅनिटीत नेऊन अक्षरशः तुडवलं; अभिनेत्रीची कबुली
'देऊळ बंद' नंतर डोक्यात हवा गेली, 'त्या' आगाऊ कमेंटनंतर आईने व्हॅनिटीत नेऊन अक्षरशः तुडवलं; अभिनेत्रीची कबुली
Paresh Raval on Exit Politics:भाजपच्या तिकिटावर निवडून आले, खासदार बनले, पण 5 वर्षात सगळं सोडलं; परेश रावल यांनी 12 वर्षांनी सांगितलं राज'कारण'
भाजपच्या तिकिटावर निवडून आले, खासदार बनले, पण 5 वर्षात सगळं सोडलं; परेश रावल यांनी 12 वर्षांनी सांगितलं राज'कारण'
दत्तभक्तांसाठी खास पर्वणी! 12 वर्षांनंतर पंडित अजित कडकडे यांचं दमदार पुनरागमन! नवं भक्तिगीत प्रदर्शित
दत्तभक्तांसाठी खास पर्वणी! 12 वर्षांनंतर पंडित अजित कडकडे यांचं दमदार पुनरागमन! नवं भक्तिगीत प्रदर्शित
Vishal Dadlani on Sonam Wangchuk: 'हा VIDEO सोनम वांगचूक यांच्यापर्यंत पोहोचवा', विशाल दादलानीनं मागितली माफी; म्हणाले, 'त्यांना काहीही होऊ नये...'
'हा VIDEO सोनम वांगचूक यांच्यापर्यंत पोहोचवा', विशाल दादलानीनं मागितली माफी; म्हणाले, 'त्यांना काहीही होऊ नये...'

व्हिडीओ

NCP Inside Story : राष्ट्रवादीचे बडे नेते-फडणवीसांच्या भेटीबाबत सुनेत्रा पवार अंधारात?
Zero Hour Full : मतदार पुनर्रचवेवरुन देशात नवं राजकारण, झीरो अवरमध्ये सविस्तर चर्चा
NCP Merger News : राष्ट्रवादीचं विलिनीकरण की पवारांच्या पक्षात फूट? Special Report
Sanjay Raut On Chandrashekhar Bawankule : चंद्रशेखर बावनकुळे संवाद साधण्यासाठी चांगला माणूस; ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांना संजय राऊत काय म्हणाले?
Sachin Ahir UNCUT Speech : वरळीकरांकडून जंगी सत्कार, ठाकरे पिता-पुत्रांवर टीका, सचिन अहिरांचं भाषण!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जुलै 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जुलै 2026 | गुरुवार
Maharashtra Dam Water Storage: राज्यभरात पावसाची प्रतीक्षा कायम! धरणसाठा खालावला, खडकवासला ते जायकवाडी कुठे किती पाणीसाठा शिल्लक? वाचा सविस्तर
राज्यभरात पावसाची प्रतीक्षा कायम! धरणसाठा खालावला, खडकवासला ते जायकवाडी कुठे किती पाणीसाठा शिल्लक? वाचा सविस्तर
तू ऊसात चल... सुनेचा विनयभंग करणाऱ्याला जाब विचारला; 70 वर्षीय सासऱ्यालाच संपवलं, परप्रांतीय मजुराला अटक
तू ऊसात चल... सुनेचा विनयभंग करणाऱ्याला जाब विचारला; 70 वर्षीय सासऱ्यालाच संपवलं, परप्रांतीय मजुराला अटक
Sonam Wangchuk: सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला गोकुळ कामगार संघटनेचा जाहीर पाठिंबा; 'गेट मीटिंग' घेत केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी
सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला गोकुळ कामगार संघटनेचा जाहीर पाठिंबा; 'गेट मीटिंग' घेत केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी
'तर मग तिसऱ्या भाषेची काय गरज? नववीच्या विद्यार्थ्यांवर तिसऱ्या भाषेचं ओझं टाकू नका, पाचवी किंवा सहावीपासून सुरुवात करा..' सुप्रीम कोर्टाची थेट फटकार
'तर मग तिसऱ्या भाषेची काय गरज? नववीच्या विद्यार्थ्यांवर तिसऱ्या भाषेचं ओझं टाकू नका, पाचवी किंवा सहावीपासून सुरुवात करा..' सुप्रीम कोर्टाची थेट फटकार
100 ISRO Scientists Quit Their Jobs: अवघ्या 10 महिन्यात इस्रोच्या तब्बल 100 शास्त्रज्ञांचा नोकरीला रामराम! महत्वाकांक्षी गगनयान आणि इतर मोहिमांमध्ये सहभागी असलेल्या शास्त्रज्ञांचा सुद्धा समावेश
अवघ्या 10 महिन्यात इस्रोच्या तब्बल 100 शास्त्रज्ञांचा नोकरीला रामराम! महत्वाकांक्षी गगनयान आणि इतर मोहिमांमध्ये सहभागी असलेल्या शास्त्रज्ञांचा सुद्धा समावेश
कंपनीवर आरोप करत तरुणाची तापी नदीत उडी, दोन दिवसांनी सापडला मृतदेह; नातेवाईकांचा पोलिस स्टेशनबाहेर ठिय्या
कंपनीवर आरोप करत तरुणाची तापी नदीत उडी, दोन दिवसांनी सापडला मृतदेह; नातेवाईकांचा पोलिस स्टेशनबाहेर ठिय्या
Koel Mallick: तृणमूलच्या आणखी एका राज्यसभा खासदाराचा राजीनामा; चार महिन्यांपूर्वीच नियुक्ती, भाजप नेत्याची सुद्धा घेतली भेट
तृणमूलच्या आणखी एका राज्यसभा खासदाराचा राजीनामा; चार महिन्यांपूर्वीच नियुक्ती, भाजप नेत्याची सुद्धा घेतली भेट
Embed widget