दुसरी संधी फक्त कथांमध्ये मिळते, खऱ्या आयुष्यात नाही' असं म्हणतात...पण बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानने ही म्हण खोटी ठरवली.... वयाच्या ६१ व्या वर्षी आमिर खानने आपल्या आयुष्याला एक नवी संधी दिलीये आणि त्याने प्रेयसी गौरीसोबत लग्न केलंय.. रविवारी दुपारी सव्वा बाराच्या सुमारास आमिरच्या वांद्रे येथील घरी अत्यंत साधेपणाने हा विवाह सोहळा पार  पडला. या कोर्ट मॅरेजला गौरीचा पहिल्या लग्नाचा मुलगा आणि आमिरचा मुलगा आझाद दोघेही हजर होते. इतकंच नाही तर मुकेश अंबानी, आशुतोष गोवारीकर, आमिरचा मोठा मुलगा जुनैद आणि मुलगी आयरा खान यांनीही या लग्नाला हजेरी लावली होती.

Continues below advertisement

पण आमिर खानच्या आयुष्याची ही कहाणी आजची नाही. आमिर जेव्हा फक्त २० वर्षांचा होता, तेव्हा त्याचं शेजारी राहणाऱ्या रीना दत्तावर प्रेम जडलं. खिडकीतून सुरू झालेलं हे प्रेम इतकं वाढलं की, १८ एप्रिल १९८६ ला दोघांनी घरच्यांपासून लपून कोर्टात अवघ्या १० रुपयांत लग्न केलं! लग्न झाल्यावर दोघेही ८ महिने आपापल्या घरी राहत होते.

जेव्हा रीनाच्या घरच्यांना हे समजलं, तेव्हा मोठा गदारोळ झाला. पण नंतर रीनाच्या वडिलांनी आमिरला स्वीकारलं. लग्न झाल्यावर आमिरचा 'कयामत से कयामत तक' रिलीज झाला आणि तो स्टार बनला. पण स्टारडम वाढलं तसं कुटुंबाला वेळ देणं कठीण झालं. अखेर १५ वर्षांनंतर, म्हणजेच २००१ मध्ये रीनाने आमिरचं घर सोडलं.

Continues below advertisement

या घटस्फोटाने आमिर इतका तुटला की, तो प्रचंड दारू पिऊ लागला. जवळपास दीड वर्ष तो नैराश्यात होता. जुही चावला आणि अनिल कपूरसारख्या मित्रांनी त्याला सावरलं. त्यानंतर २००२ मध्ये त्यांचा अधिकृत घटस्फोट झाला...

यानंतर आमिरच्या आयुष्यात आली किरण राव. 'लगान'च्या सेटवर किरण असिस्टंट डायरेक्टर होती. सुरुवातीला त्यांच्यात काही नव्हतं. पण २००४ मध्ये 'मंगल पांडे'च्या शूटिंगदरम्यान त्यांची जवळीक वाढली. एकदा किरणने आमिरला फोन केला, ती अर्ध्या तासाची चर्चा आमिरला एक नवा आनंद देऊन गेली. दोघांनी लिव्ह-इनमध्ये राहण्याचा निर्णय घेतला.

किरणचे घरचे या लग्नाच्या विरोधात होते, कारण आमिर तिच्यापेक्षा ८ वर्षांनी मोठा होता आणि घटस्फोटित होता. पण २८ डिसेंबर २००५ ला त्यांनी  लग्न केलं. त्यानंतर त्यांना 'आझाद' हा मुलगा झाला. पण २०२१ मध्ये, १६ वर्षांनंतर या दोघांनीही परस्पर संमतीने घटस्फोट घेतला. मात्र, आजही आमिर आपल्या दोन्ही माजी पत्नींना तितकाच मान देतो... त्यानंतर आज 5 जुलै रोजी अमिर तिसऱ्यांदा विवाहबंधनात अडकला आहे..

तिसरं लग्न करणं कायदेशीर आहे का? 

भारतीय कायद्यानुसार, जर आधीच्या पत्नींसोबत कायदेशीररित्या घटस्फोट झाला असेल किंवा पती/पत्नीचे निधन झाले असेल, तर तिसरे लग्न पूर्णपणे वैध मानले जाते. जर घटस्फोट न घेता कोणी दुसरं किंवा तिसरं लग्न केलं, तर भारतीय न्याय संहितेच्या कलम ८२ नुसार तो गुन्हा ठरतो आणि ७ वर्षांची जेल होऊ शकते.

तर मित्रांनो, आमिर खानच्या या तिसऱ्या लग्नाबद्दल आणि त्याच्या या रंजक आयुष्याबद्दल तुम्हाला काय वाटतं?