aamir khan big announcement : बॉलिवूड अभिनेता आमीर खान याने त्याच्या 60 व्या वर्षी मोठी घोषणा केलीये. अंदाज अपना अपना 2 मध्ये आमीर आणि सलमान पुन्हा एकदा झळकणार आहेत. आमीर खानचा 60 वा वाढदिवस साजरा करत असताना त्याने मीडियाशी बातचीत केली. यावेळी त्याने ही घोषणा केलीये.
माझी काल शारुख आणि सलमानसोबत घरी भेट झाली - आमीर खान
आमीर खान म्हणाला, प्रत्येक वर्षी माझा वाढदिवस उत्साहात साजरा करतात त्याबद्दल मीडियाचे खूप खूप धन्यवाद...आता मी 16 वर्षांचा झालोय. माझी काल शारुख आणि सलमानसोबत घरी भेट झाली होती. अनेक दिवसांनी आम्ही भेटलोय. आम्ही बरीच चर्चा देखील केली. शाहरुख, सलमान आणि माझा जन्म 1965 मधला आहे. मी 60 वर्षांपूर्वी रंगपंचमीच्या दिवशी जन्मलो होतो. सलमान आणि मी अंदाज अपना अपना 2 मध्ये काम करु इच्छित आहोत. दरवर्षी आम्ही नवं काहीतरी शिकत असतो. मी शाहरुख आणि सलमान तिघेही एकत्रित काम करु इच्छित आहोत.
मी या वर्षी कोणताही संकल्प केला नव्हता - आमीर खान
पुढे बोलताना आमीर खान म्हणाला, मी मागील दोन वर्षांपासून मी गाणे म्हणायला शिकत आहे. मला गाणे गायला आवडतं. गुरु सुचेता भट्टाचार्य टीचर म्हणून कमाल आहेत. त्यांच्या अंडर शिकायला मजा येत आहे. मी या वर्षी कोणताही संकल्प केला नव्हता. तुम्ही ड्रीम 11 टीम पाहिली असेल. ड्रीम 11 नेहमी चांगल्या जाहिराती बनवते. मला आणि रणवीरला फार मजा आली होती. सितारे जमीन पर हा सिनेमा तारे जमीन परचा सिक्वेल आहे. मात्र, हा सिनेमा 10 पाऊले पुढे आहे. हा सिनेमा हसवतो आणि रडवतो देखील...याशिवाय आम्ही महाभारत या सिनेमाचं देखील काम सुरु केलं आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या