Amir Khan on Wedding Date Reveal:बॉलिवूडचा परफेक्शनिस्ट अमीर खान सध्या प्रचंड चर्चेत आहे, तो त्याच्या तिसऱ्या लग्नामुळे. जुलैमध्ये आमिर खान (Amir Khan) तिसऱ्यांदा लग्नबंधनात अडकणार असल्याची सध्या जोरात चर्चा आहे. सध्या अनेक सार्वजनिक ठिकाणी तो गौरीसोबत स्पॉट होताना दिसतोय. काही दिवसांपूर्वी त्याच्या लग्नाची तारीखही लिक झालेली. नुकत्याच एका कार्यक्रमात त्यांच्या लग्नाची तारीख लीक झाल्या प्रकारावर अभिनेता अमीर खानने स्पष्ट शब्दात नाराजी व्यक्त केली. त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल लोकांमध्ये असलेल्या उत्सुकतेवर आश्चर्य व्यक्त करत त्याने “लोकांनी आमच्या कामावर लक्ष द्यावं" असं म्हणत सुनावलंही. लग्नाचा समारंभ खासगी आणि साध्या पद्धतीने पार पडणार असल्याचंही त्याने सांगितलं.
Amir Khan:काय म्हणाला आमीर खान?
आपल्या लग्नाच्या चर्चांवर बोलताना 'लोक त्याच्या खासगी आयुष्याबद्दल इतके उत्सुक का आहेत, हे त्याला समजत नसल्याचं तो म्हणाला.तो म्हणाला, “इतका गदारोळ का होतोय, हे मला समजत नाही. सेलिब्रिटी, विशेषतः क्रिकेटपटू आणि कलाकार यांच्या आयुष्यात लोकांना खूप रस असतो. पण लोकांनी आमच्या कामात रस घ्यायला हवा, वैयक्तिक आयुष्यात नाही.”
लग्नाचा संपूर्ण प्लॅन सांगितला..
आमिर आणि गौरी यांनी आपलं लग्न अतिशय खासगी ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. अभिनेता म्हणाला की, हा एक साधा समारंभ असेल, ज्यात फक्त कुटुंबीय आणि जवळचे मित्र सहभागी होतील.आमिर म्हणाला, “हा खूप प्रायव्हेट समारंभ असेल. घरीच एक साधं रजिस्टर्ड लग्न होईल, ज्यात दोन्ही कुटुंबीय आणि काही अतिशय जवळचे मित्र उपस्थित असतील.”सोशल मीडियाच्या युगात सार्वजनिक व्यक्तींना गोपनीयता राखणं किती कठीण झालं आहे, यावरही आमिर बोलला.अधिकृत घोषणा करण्याआधीच लग्नाची बातमी बाहेर आल्याने त्याला फार आश्चर्य वाटलेलं. तो म्हणाला, “माझ्या लग्नाची माहिती कशी लीक झाली, हे मला अजूनही समजलेलं नाही.”यंदा मार्चमध्ये त्याच्या 60व्या वाढदिवसानिमित्त आमिरने बेंगळुरूमध्ये राहणाऱ्या गौरी स्प्रॅटची मीडियाशी ओळख करून दिली होती. त्यानंतर हे दोघे अनेक सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये एकत्र दिसले. त्यात 'सितारे जमीन पर' च्या प्रीमियरलाही दोघे एकत्र दिसले.
आमिरचं वैयक्तिक आयुष्य
आमिरची पहिली पत्नी रीना दत्ता होती,त्यांना आणि आमिरला जुनैद आणि इरा दोन मुलं आहेत .त्यानंतर त्याने फिल्ममेकर किरण राव हिच्यासोबत लग्न केलं. या दोघांना आजाद नावाचा मुलगा आहे.वेगळे झाल्यानंतरही आमिरने रीना आणि किरण या दोघींशी चांगले आणि मैत्रीपूर्ण संबंध कायम ठेवले आहेत. अनेकदा या तिघांनी एकमेकांबद्दलचा आदर आणि कुटुंब म्हणून एकत्र राहण्याविषयीही बोलताना दिसतात.
