Aaishvary Thackeray Finalised To Play Villain: गेल्या दिवसांपासून ऐश्वर्य ठाकरे (Aaishvary Thackeray) हे नाव इंडस्ट्रीत चर्चेत आलं आहे. ऐश्वर्य ठाकरे म्हणजे, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (Shiv Sena Chief Balasaheb Thackeray) यांचा नातू. नुकताच ऐश्वर्याचा 'निशांची' सिनेमा रिलीज झालेला. अनुराग कश्यप (Anurag Kashyap) दिग्दर्शित हा सिनेमा फारसा चालला नसला तरी, या सिनेमातील ऐश्वर्य ठाकरेच्या अभिनयाचं जोरदार कौतुक केलं गेलं. अनुराग कश्यपच्या 'निशांची'मध्ये त्याच्या प्रभावी अभिनयानं त्यांना सर्वत्र कौतुक मिळालं. त्याचा स्क्रीन प्रेझेन्स आणि आत्मविश्वास असलेला परफॉर्मन्सनं सर्वांची मनं जिंकून घेतली. आता ऐश्वर्य ठाकरे नव्या सिनेमात दिसणार आहे. 

Continues below advertisement

'सैयारा' फेम अभिनेता अहान पांडे सध्या त्याच्या आगामी चित्रपटामुळे चर्चेत आहे, ज्याचं दिग्दर्शन अली अब्बास जफर करत आहेत. मीडिया रिपोर्टनुसार, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा नातू ऐश्वर्य ठाकरे देखील या चित्रपटात व्हिलन साकारणार आहे. या सिनेमाकडे अहान आणि ऐश्वर्य यांच्यातील स्पर्धा म्हणून पाहिलं जातंय, जे खऱ्या आयुष्यातही चांगले मित्र आहेत.

YRF च्या अॅक्शन-रोमान्स सिनेमात साकारणार निगेटिव्ह रोल

प्रसिद्ध दिग्दर्शक अली अब्बास जफर यांनी YRF च्या अॅक्शन-रोमान्स चित्रपटात व्हिलन म्हणून ऐश्वर्यला साइन केलं आहे. तो 'सैय्यारा' स्टार अहान पांडेसोबत भिडताना दिसणार आहे. अशा चर्चा रंगल्यात की, ही बॉलिवूडमधली एक जबरदस्त हिरो-व्हिलनची जोडी ठरू शकते.

Continues below advertisement

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, "अली अब्बास जफर हे 'सुल्तान' आणि 'टायगर जिंदा है' सारख्या मेगा ब्लॉकबस्टर्ससाठी ओळखले जातात. त्यावरून असं बोललं जातंय की, अहान आणि ऐश्वर्य यांची भिडत मोठ्या पडद्यावर जबरदस्त, धडकी भरवणाऱ्या अ‍ॅक्शन सिक्वेन्ससारखी असेल, ही एक बिग जेट फिल्म आहे, ज्यात रोमॅन्स असून अ‍ॅक्शन प्रेक्षकांना थरार आणि आश्चर्याचा अनुभव देईल. अली ही फिल्म प्रेक्षकांसाठी रोलरकोस्टर राईड ठरावी यासाठी कोणतीही कसर सोडणार नाही..."