Colors Marathi: कलर्स मराठीवरील आई तुळजाभवानी (Aai Tuljabhavani) या मालिकेत एक अद्भुत आजवर कधीही न पाहिलेला अलौकिक सोहळा प्रेक्षकांना अनुभवता येईल. महादेव आणि तुळजाभवानीच्या अलौकिक विवाहाचा अद्भुत महिना येत्या सोमवारी 20 एप्रिल पासून सुरू होणार असून विशेष म्हणजे आता ही मालिका प्रेक्षकांना त्यांच्या नेहमीच्या वेळत दररोज  रात्री नऊ वाजता पाहता येणार आहे.  (Marathi Serial)

Continues below advertisement

या अलौकिक विवाहाच्या अद्भुत महिन्यात पंचदेवींतर्फे ओवाळणी, मायेचे केळवण, सौभाग्याचा चुडा, पंचमहाभूतांतर्फे  देवक, प्रकाश-ऊर्जेचा दैवी मांडव, शक्तिरूपाची तेजस्वी हळद, महादेवांचे अद्भुत वऱ्हाड आणि अलौकिक लग्न विधी रंगणार असून महादेव आणि तुळजाभवानीच्या या दैवी विवाहसोहळ्याची त्यामुळेच प्रेक्षकांना विशेष उत्सुकता आहे. 20 एप्रिल ते 20 मे दररोज रात्री 09 वाजता हा दैवी सोहळा कलर्स मराठीवर पाहता येईल. 

नाट्यमय रोमहर्षक पट उलगडणार

असुरी शक्तिंचा नाश आणि महिषासुराचा नायनाट या एकमेव ध्येयाने प्रेरित आई तुळजाभवानीच्या आयुष्यातले हे नाजूक भावनिक क्षण आणि महादेवांशी असलेला तिचा हळवा बंध कसे उलगडत जातात, तुळजाभवानी या लग्नाला कशी तयार होते, त्यासाठी महादेवांची कोणती गूढ रचना असते यांची उत्तरे या महिन्याभराच्या अलौकिक विवाह सोहळा विशेषमध्ये मिळणार आहेत, याकाळात आदिशक्तीने दिलेलें सावधानतेच्या इशाऱ्याचे संकेत, महादेवांनी आदिशक्तिच्या रचनेत केलेले परस्पर बदल, देवीच्या आश्रयाला आलेली एक मोठी असुरी शक्ति, तिच्याविरुद्ध महिषासुर आणि शुक्राचार्यांनी रचलेले मायावी कट, तुळजाभवानीच्या विवाहात उभे राहणारे अडथळे असा एकूण अत्यंत नाट्यमय रोमहर्षक पट याकाळात उलगडणार आहेत.

Continues below advertisement

विशेष म्हणजे आई तुळजाभवानीच्या या लग्नासाठी महादेवांनी तिच्या अवतारकार्यातील मानवी नात्याची घेतलेली मदत प्रेक्षकांसाठी आश्चर्याचा धक्का ठरणार आहे. तेव्हा आवर्जून पहा महादेव आणि तुळजाभवानीच्या अलौकिक विवाहाचा अद्भुत महिना येत्या सोमवारी 20 एप्रिल दररोज रात्री नऊ वाजता फक्त आपल्या कलर्स मराठीवर.