Aadesh Bandekar daughter in law Pooja Birari : अभिनेते आदेश बांदेकर (Aadesh Bandekar) आणि अभिनेत्री सुचित्रा बांदेकर (Suchitra Bandekar) यांचा एकुलता एक मुलगा सोहम बांदेकर गेल्या काही दिवसांपासून चर्चेचा विषय ठरला आहे. कारण सोहम बांदेकर (Soham Bandekar) याच लग्न ठरल्याची माहिती गेल्या काही दिवसांपासून व्हायरल होत आहे. शिवाय सोहमची होणारी पत्नी म्हणजेच बांदेकर कुटुंबाची भावी सून अभिनेत्री पूजा बिरारी (Pooja Birari) असल्याच्या बातम्याही व्हायरल झाल्या होत्या. या बातमीला सोहमने नकारही दिला नाही आणि होकार देखील दिला नाही. बाप्पाच्या आशीर्वादाने होईल ते योग्य होईल, असं त्याने सांगितलं होतं. मात्र, सुचित्रा बांदेकर यांनी एका मुलाखतीत पूजा बिरारी हिच त्यांची सून होणार असल्याचं जवळपास स्पष्ट केलं.
दरम्यान, दरवर्षी आदेश बांदेकर घरच्या बाप्पाच्या आरतीचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करतात. यंदाही संपूर्ण बांदेकर परिवार आरतीला एकत्र जमला होता. विशेष म्हणजे, यावेळी आरतीला त्यांची होणारी सून अभिनेत्री पूजा बिरारीही उपस्थित होती. आरतीचा व्हिडीओ पाहताच चाहत्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला. सुचित्रा बांदेकर यांच्याबरोबर पूजा बिरारी आरतीसाठी उभी असल्याचे पाहून नेटकरी म्हणाले – “भावी सुनबाई आरतीला दिसल्या... गणपती बाप्पा मोरया”, “यंदा गणपतीबरोबर भावी सुनबाईंचं दर्शनही झालं... सासू-सून एकत्र खूप छान दिसतायत”, “सोहम आणि पूजाच्या लग्नाच्या चर्चा खरी ठरल्या”.
सध्या सोहम बांदेकर ‘ठरलं तर मग’ आणि ‘घरोघरी मातीच्या चुली’ या दोन मालिकांचा निर्माता म्हणून काम पाहतोय. याआधी सोहम ‘नवे लक्ष्य’ या मालिकेतही झळकला होता. काही दिवसांपूर्वीच त्याच्या लवकरच होणाऱ्या लग्नाबद्दलच्या चर्चा सोशल मीडियावर रंगल्या होत्या.
सध्या पूजा बिरारी ‘येड लागलं प्रेमाचं’ मालिकेत मंजिरी ही भूमिका साकारत आहे. याआधी ती ‘स्वाभिमान – शोध अस्तित्वाचा’ या मालिकेत दिसली होती. दुसरीकडे सोहमने ‘नवे लक्ष्य’ मालिकेतून अभिनयात पाऊल ठेवले आणि ‘बाईपण भारी देवा’ या चित्रपटातही पाहुण्या कलाकाराची भूमिका केली आहे.
जरी सोहम आणि पूजा यांनी यावर काहीच भाष्य केले नव्हते, तरी सुचित्रा बांदेकर यांनी ‘राजश्री मराठी’ला दिलेल्या मुलाखतीत मुलाच्या लग्नाबाबत भाष्य केलं होतं. आता, सोशल मीडियावर आलेल्या एका व्हिडीओमुळे पूजा बिरारीच बांदेकरांची सून होणार असल्याचं अधिक स्पष्ट झालं आहे. या व्हिडीओवर चाहत्यांनी अशाच प्रतिक्रिया दिल्या आहेत.
इतर महत्त्वाच्या बातम्या
अभिनेत्री पूनम पांडेचा मराठमोळा लूक, बाप्पाच्या दर्शनासाठी आल्यानंतर मराठीत संवाद साधला; व्हिडीओ व्हायरल
