शेफाली जरीवालापूर्वी बिग बॉसच्या 6 माजी स्पर्धकांच्या निधनाने सिनेसृष्टी हळहळली होती, दोघांचा अशाच पद्धतीने मृत्यू
6 ex contestants of Bigg Boss whose sudden demise : शेफाली जरीवालापूर्वी बिग बॉसच्या 6 माजी स्पर्धकांच्या निधनाने सिनेसृष्टी हळहळली होती, दोघांचा अशाच पद्धतीने मृत्यू

6 ex contestants of Bigg Boss whose sudden demise : मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय रिअॅलिटी शो ‘बिग बॉस’ने अनेक स्पर्धकांना ओळख मिळवून दिली. मात्र काही असे कलाकार होते, ज्यांचा अकस्मात मृत्यू चाहत्यांसाठी मोठा धक्का देणारा ठरला. आता अभिनेत्री शेफाली जारीवाला हिचं नावसुद्धा अशाच कलाकारांच्या यादीत सामील झालं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शेफाली जारीवाला हिचं शुक्रवारी रात्री निधन झालं. रिपोर्ट्सनुसार त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि लगेचच पती आणि जवळच्या व्यक्तींनी त्यांना रुग्णालयात नेलं, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. शेफाली जरीवालांचं अवघ्या 42 व्या वर्षी निधन झाल्यानं सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
मात्र शेफाली जरीवालापूर्वी देखील असे 6 माजी ‘बिग बॉस’ स्पर्धक होते, ज्यांचा अचानक मृत्यू चाहत्यांसाठी धक्कादायक ठरला.
बिग बॉसचे 6 माजी स्पर्धक ज्यांचा अचानक मृत्यू झाला
1. सिद्धार्थ शुक्ला
बिग बॉस 13 चा विजेता सिद्धार्थ शुक्ला यांचं 2021 मध्ये वयाच्या अवघ्या 40 व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाने प्रेक्षकांमध्ये एक वेगळी छाप सोडली होती. त्यांच्या मृत्यूमुळे फक्त मनोरंजन क्षेत्रच नव्हे, तर चाहत्यांनाही मोठा धक्का बसला.
2. प्रत्युषा बनर्जी
बिग बॉस 7 मधील स्पर्धक प्रत्युषा बनर्जी हिनं 2016 मध्ये वयाच्या 24 व्या वर्षी आत्महत्या केली. तिचं चंचल आणि उत्साही व्यक्तिमत्त्व प्रेक्षकांच्या मनात घर करुन गेलं होतं. तिच्या दुःखद निधनानं संपूर्ण टेलिव्हिजन क्षेत्र हादरून गेलं.
3. स्वामी ओम
बिग बॉस 10 मध्ये सहभागी झालेले स्वामी ओम यांचं दीर्घ आजारपणानंतर निधन झालं. त्यांच्या वादग्रस्त वागणुकीमुळे ते शोदरम्यान सतत चर्चेत राहिले होते.
4. सोनाली फोगाट
बिग बॉस 14 मधील स्पर्धक आणि भाजप नेत्या सोनाली फोगाट यांचं 2023 मध्ये 42 व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं. त्यांची उर्जावान व ठाम प्रतिमा अनेकांसाठी प्रेरणादायी ठरली होती. त्यांच्या अचानक निधनाने सर्वांनाच धक्का बसला.
5. सोमदास चट्टन्नूर
बिग बॉस मलयाळम सिझन 1 मधील स्पर्धक सोमदास चट्टन्नूर यांचं 2021 मध्ये कोविड-19 मुळे निधन झालं. त्यांच्या मनमिळावूपणामुळे आणि हसऱ्या चेहऱ्यामुळे ते प्रेक्षकांचे लाडके होते. त्यांचा मृत्यू ही महामारीच्या परिणामांची जाणीव करून देणारी घटना ठरली.
6. जयश्री रमैया
बिग बॉस कन्नड सिझन 3 मधील स्पर्धक जयश्री रमैया हिनं 2020 मध्ये आत्महत्या केली. तिचं प्रसन्न हास्य आणि उत्साही स्वभाव प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय झाला होता. तिच्या निधनानं सर्वांनाच धक्का बसला.
या सर्व कलाकारांची अनुपस्थिती नेहमीच जाणवत राहील. त्यांचं योगदान आणि आठवणी चाहत्यांच्या मनात कायम जिवंत राहतील.
इतर महत्त्वाच्या बातम्या
शेफाली जरीवालाच्या मृत्यूनंतर हिंदूस्तानी भाऊ हळहळला, डोळ्यात पाणी, म्हणाला..VIDEO
























