40 Years Old Divorced Actress Confirms Relationship With Co Star: 16 वर्षांपासून इंडस्ट्रीमध्ये (Entertainment Industry) आपल्या अभिनयाच्या जोरावर आपली जागा निर्माण केलेली ही अभिनेत्री (Actress) सध्या तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. आजवरही ही अभिनेत्री अनेक सिनेमे (Movies) आणि सीरिजमध्येही (Web Series) दिसलीय. तरुणांच्या गळ्यातील ताईत असलेल्या या अभिनेत्रीनं 2016 मध्ये लग्न केलं आणि कित्येक तरुणांच्या हृदयाचा चक्काचूर झाला. पण, शेवटी तिच्या संसाराला कुणाचीतरी दृष्ट लागली आणि 2021 मध्ये तिचा घटस्फोट झाला. तेव्हापासून अभिनेत्री सिंगल होती. चाहत्यांमध्ये नेहमीच चर्चा होत्या, आता ही कोणासोबत मिंगल होणार, पण तेवढ्यात अभिनेत्रीनं चाहत्यांना गोड सरप्राईज दिलं आहे.

आम्ही ज्या अभिनेत्रीबाबत बोलतोय, तिचं नाव कीर्ती कुल्हारी (Kirti Kulhari). गाजलेली वेब सीरिज 'फोर मोअर शॉर्ट्स प्लीज'मध्ये (Four More Shots Please!) झळकलेली कीर्ती कुल्हारीनं त्याच सीरिजमध्ये तिच्यासोबत झळकलेल्या को-स्टार राजीव सिद्धार्थसोबत (Rajeev Siddhartha) रिलेशनशिपमध्ये असल्याचं जाहीर केलं आहे. अभिनेत्रीनं एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये तिचे सिद्धार्थसोबतचे काही सुंदर फोटो तिनं एकत्र केलेत.  

घटस्फोटित अभिनेत्री दुसऱ्यांदा पडली प्रेमात 

किर्ती कुल्हारीचे अनेक फोटो आणि व्हिडीओ असलेली पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तिनं व्हिडीओला कॅप्शन दिलं आहे, "एक फोटो हजार शब्दांच्या किमतीचा असतो... #happynewyear happy2026 to all..." नव्या वर्षाच्या निमित्तानं, दोघांनी इंस्टाग्रामवर एकत्र रोमँटिक फोटो शेअर करून त्यांच्या नात्याची पुष्टी केली. कीर्ती कुल्हारी आणि राजीव सिद्धार्थ यांनी त्यांचं नातं अधिकृत केलं आहे. 

कीर्ती कुल्हारीनं दिलीय प्रेमाची कबुली

कीर्ती कुल्हारी आणि राजीव सिद्धार्थ यांच्या डेटिंगच्या चर्चा गेल्या काही काळापासून सुरुच होत्या. कृतीनं 7 नोव्हेंबर 2025 रोजी सोशल मीडियावर राजीव सिद्धार्थसोबतचा एक फोटो शेअर केला आहे. ज्यामुळे या अफवांना आणखी बळकटी मिळाली. फोटोमध्ये ती राजीवच्या खांद्यावर डोकं ठेवून आहे. अभिनेत्रीनं फोटोला कॅप्शन दिलं आहे, "#paininmyneck and my #icepack with @rajeevsiddhartha." दुसऱ्या फोटोमध्ये, कृती कुल्हारी दोघांचे हात घट्ट धरलेले दिसत आहेत. तिनं फोटोला कॅप्शन दिलंय की, "चांगला वेळ घालवा, प्रेम. आपण पुन्हा भेटू तोपर्यंत..."

लग्नाच्या 5 वर्षांनंतर घटस्फोटाचं दुःख

कीर्ती कुल्हारीनं 2016 मध्ये अभिनेता साहिल सहगलशी लग्न केलेलं, परंतु 2021 मध्ये या जोडप्यानं घटस्फोट घेतला. त्यावेळी कीर्तीनं सोशल मीडियावर सांगितलं होतं की, या अनुभवामुळे ती भावनिकदृष्ट्या अधिक मजबूत झाली आणि तिला पुढे जाण्यास प्रोत्साहन मिळालंय.

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Dhurandhar Actor Danish Pandor Girlfriend: 'धुरंधर'मध्ये रणवीरला टक्कर देणाऱ्या हँडसम हंकची गर्लफ्रेंड कोण? रोमँटिक फोटो व्हायरल, नेटकरी म्हणाले, 'अगदी लक्ष्मी नारायणाचा जोडा...'