Do You Know 3 Idiots Star Centimeter: राजकुमार हिरानींचा (Rajkumar Hirani) सुपरहिट सिनेमा '3 इडियट्स'नं (3 Idiots) प्रेक्षकांच्या मनात आपली मोहर उमटवली आहे. आमिर खान स्टारर हा सिनेमा प्रचंड गाजला. आजही हा सिनेमा लागाल की, सगळा पाहिल्याशिवाय चैन पडत नाही. अनेक विषयांवर या सिनेमातून हसत-खेळत भाष्य केलं गेलेलं. या चित्रपटाला आंतरराष्ट्रीय स्तरावरही चांगला प्रतिसाद मिळाला. आमिर खानसोबतच आर. माधवन आणि शर्मन जोशी सारख्या मोठ्या कलाकारांसोबत, या चित्रपटात एका मराठमोळ्या अभिनेत्यानं स्क्रिन शेअर केलेली. छोटीशी पण अगदी लक्षात राहण्यासारखी भूमिका या अभिनेत्यानं साकारलेली. सिनेमातली त्याची भूमिका एवढी गाजली की, आजही लोक त्याला सेंटिमीटर म्हणूनच ओळखतात. आज 16 वर्षांनी हा मराठमोळा अभिनेता खूपच बदलला असून आज त्याला ओळखणंही कठीण झालं आहे.  

Continues below advertisement

Continues below advertisement

मराठी अभिनेता दुष्यंत वाघच्या ट्रान्सफॉर्मेशनची जबरदस्त चर्चा रंगली आहे. त्याचे सध्याचे काही नवे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. ज्यामुळे अनेकजण आश्चर्य व्यक्त करत आहेत. त्यांच्या नव्या लूकमुळे '3 इडियट्स'मधला निष्पाप आणि खोडकर सेंटीमीटरला ओळखणं कठीण झालं आहे. एका युजरनं त्याच्या इन्स्टाग्रामवर कमेंट केली आहे. कमेंटमध्ये त्यानं म्हटलंय की, "अरे, हा सेंटीमीटर किती बदलला आहे," तर दुसऱ्याने लिहिलंय की, "भाऊ, तू किलर दिसतोस."

'या' चित्रपटातून अभिनय क्षेत्रात केलं पदार्पण

दुष्यंत वाघनं 2000 मध्ये आलेल्या 'तेरा मेरा साथ रहे' या चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं, ज्यामध्ये त्यानं अजय देवगणचा धाकटा भाऊ आणि एका स्पास्टिक मुलाची भूमिका केली होती. त्यानंतर त्यानं अनेक चित्रपट आणि टीव्ही शोमध्ये काम केलं. दरम्यान, त्याची खरी ओळख '3 इडियट्स'मध्ये मिलिमीटर, ज्याला सेंटीमीटर म्हणूनही ओळखलं जातं, या भूमिकेतून मिळाली. खरंतर मिलिमीटरची भूमिका वेगळ्याच अभिनेत्यानं साकारलेली, पण नंतर दुष्यंतनं मोठ्या मिलिमीटरची भूमिका साकारली, ज्यामुळे त्याला सेंटीमीटर असं नवं नाव मिळालं.

'या' चित्रपटासाठी ऑडिशन दिलं

दुष्यंतनं केवळ सिनेमे केले नाही, तो टेलिव्हिजनवरही बराच सक्रिय होता. त्यानं लोकप्रिय टेलिव्हिजन शो 'ना बोले तुम ना मैंने कुछ कहा'मध्ये मुख्य भूमिकेत असलेल्या मोहनचा (कुणाल करण कपूर) मित्राची भूमिका साकारलेली. एका मुलाखतीत बोलताना दुष्यंतनं सांगितलेलं की, "विनोद चोप्रा प्रॉडक्शन हाऊसनं सुरुवातीला 'लगे रहो मुन्नाभाई'साठी माझ्याशी संपर्क साधला होता, पण त्याचं पुढे काही झालं नाही..."

दुष्यंत केवळ चित्रपटांपुरता मर्यादित नाही. तो टेलिव्हिजनमध्येही बराच सक्रिय आहे. त्यानं लोकप्रिय टीव्ही शो 'ना बोले तुम ना मैंने कुछ कहा'मध्ये मुख्य पात्र मोहन (कुणाल करण कपूर) चा मित्र, मार्गदर्शक आणि तत्वज्ञानी गुरुची भूमिका केली. दुष्यंत स्पष्ट करतात, "विनोद चोप्राच्या प्रॉडक्शन हाऊसने सुरुवातीला लगे रहो मुन्नाभाईसाठी माझ्याशी संपर्क साधला होता, पण गोष्टी यशस्वी झाल्या नाहीत. नंतर त्यांनी मला '3 इडियट्स'साठी कास्ट केलं आणि तो माझ्या आयुष्यातील टर्निंग पॉइंट ठरला."