2 hour 38 minute Film Kara Beat Dhurandhar: 2025 मधील सर्वाधिक चर्चेत राहिलेल्या सिनेमांपैकी आदित्य धर (Director Aditya Dhar) दिग्दर्शित आणि रणवीर सिंह (Actor Ranveer Singh) स्टारर 'धुरंधर' (Dhurandhar) हा एक ठरला. बॉक्स ऑफिसवर (Dhurandhar Box Office Collection) दमदार कामगिरी केल्यानंतर या सिनेमाला ओटीटीवरही (OTT Platform) प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला. 'धुरंधर' बराच काळ नेटफ्लिक्सच्या टॉप ट्रेंडिंग यादीत अव्वल स्थानावर होता. पण, आता 'धुरंधर'ला आपलं अव्वल स्थान सोडावं लागणार आहे. साऊथ सुपरस्टार धनुष (South Superstar Dhanush) स्टारर 'कारा' (South Movie Kara) या नव्या सिनेमानं 'धुरंधर'ला मागे टाकल्याची चर्चा सुरू झाली आहे. 28 मे 2026 रोजी नेटफ्लिक्सवर (Netflix) प्रदर्शित झालेल्या या तमिळ अॅक्शन-थ्रिलर सिनेमाला (Tamil Action-Thriller Movie) प्रेक्षकांकडून मोठा प्रतिसाद मिळतोय. त्यामुळे 2 तास 38 मिनिटांच्या या सिनेमानं प्रदर्शित झाल्यानंतर अवघ्या चारच दिवसांत नेटफ्लिक्सच्या (Netflix Top Trending) ट्रेंडिंग चार्टमध्ये पहिलं स्थान मिळवलं आहे.

सध्या 'कारा' पहिल्या क्रमांकावर असताना, 'धुरंधर' नवव्या स्थानावर घसरल्याचं सांगितलं जात आहे. तर 'धुरंधर: रॉ अँड अनदेखा' हा ट्रेंडिंग यादीत तिसऱ्या क्रमांकावर असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे ओटीटीवर धनुषच्या 'कारा'ची जोरदार चर्चा रंगली आहे. 

'कारा'ची कहाणी काय? (Kara Movie Storyline)

'कारा' सिनेमा एका चोरीवर आधारित अॅक्शन थ्रिलर फिल्म आहे. यामध्ये धनुष मुख्य भूमिकेत आहे. फिल्मची कहाणी, स्क्रीनप्ले आणि डायलॉग्समध्ये थ्रील आणि सस्पेन्स यांचं चांगलं मिश्रण आहे. दिग्दर्शक विग्नेश राजानं हे सादर केलं आहे. त्यांनी अल्फ्रेड प्रकाश यांच्यासोबत एकत्र येत फिल्मची स्क्रिप्ट लिहिली आहे. 

फिल्ममध्ये धनुष व्यतिरिक्त ममिता बैजू, केएस रविकुमार आणि सूरज वेंजारामूडु यांसारखे कलाकापही खास भूमिकेत दिसले आहेत. वेल्स फिल्म इंटरनॅशनल आणि थिंक स्टूडियोजच्या बॅनरखाली बनलेल्या या फिल्मला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळतोय. 

'कारा'ची IMDb रेटिंग (Kara Movie IMDb Rating)

'कारा'ला IMDb वर 10 पैकी 7.3 रेटिंग मिळालं आहे. धनुष म्हणजे, साऊथ सिनेमांचा सुपरस्टार अभिनेता. त्यानं यापूर्वीही अनेक हिट फिल्म्स दिल्या आहेत. 'कारा' त्याच्या करिअरचा आणखी एक दमदार सिनेमा ठरला आहे. निर्माता विग्नेश राजानंही या फिल्ममार्फत प्रेक्षकांना रोमांचक अनुभव दिला आहे. 

'कारा' का पाहावी? (Kara Movie On OTT)

जर तुम्हाला अॅक्शन, थ्रिलर आणि स्मार्ट चोरीचे सिनेमे पाहायला आवडत असतील, तर 'कारा' तुमच्यासाठी योग्य पर्याय आहे. फिल्ममध्ये ट्विस्ट आणि टर्न्सची अजिबात कमी नाही. फिल्म पूर्ण वेळ तुम्हाला खिळवून ठेवते.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Munna Bhai MBBS Short Circuit: 'मुन्नाभाई MBBS'मधला 'शॉर्ट सर्किट' आठवतोय? आता दिसतोय 'हँडसम हंक', लवकरच करतोय OTT डेब्यू

ABP माझाच्या बातम्या LIVE...