एक्स्प्लोर

गोकुळच्या निवडणुकीत ठरावधारकांना यल्लमाचा भंडारा हातात देऊन शपथा घ्यायला लावण्याचा प्रकार? बेळगावात अंधश्रद्धा निर्मूलन समितीची तक्रार, ठरावधारकांना धाक दाखवल्याचा आरोप

अंधश्रद्धा निर्मूलन समितीने केलेल्या तक्रारीनुसार सौंदत्ती रोडवरील निकम कल्याण मंडपमध्ये ठरावधारकांना यल्लम्मा देवीचा भंडारा हातात देऊन शप्पथ घ्यायला लावण्यात येणार असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

Gokul Election: कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळच्या निवडणुकीसाठी संघर्ष अखेरच्या टप्प्यामध्ये पोहोचला आहे. कोणत्याही स्थितीत ठरावधारक आपल्याच बाजूने राहण्यासाठी महायुतीकडून प्रयत्नांची पराकाष्ठा केली जात आहे. दुसरीकडे, राजर्षी शाहू शेतकरी समविचार आघाडीतून सतेज पाटील यांनी सुद्धा महायुतीला चांगलाच घामटा फोडला आहे. या सर्व पार्श्वभूमीवर ठरावधारकांना आता धमकावणे सुद्धा सत्र सुरू झालं आहे का? असा सुद्धा प्रश्न उपस्थित झाला आहे. महायुतीकडून ठरावधारकांना दक्षिण भारतामध्ये सहलीसाठी पाठवण्यात आल्यानंतर सुद्धा राजकीय भूवया उंचावल्या आहेत.

अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडून गुन्हा दाखल करण्याची मागणी

या पार्श्वभूमीवर बेळगावमध्ये आता महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडून तक्रार दाखल करण्यात आली आहे. बेळगावचे जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांकडे महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने तक्रार दाखल करत या संदर्भात कारवाईची मागणी केली. अंधश्रद्धा निर्मूलन समितीने केलेल्या तक्रारीनुसार सौंदत्ती रोडवरील निकम कल्याण मंडपमध्ये ठरावधारकांना यल्लम्मा देवीचा भंडारा हातात देऊन शप्पथ घ्यायला लावण्यात येणार असल्याचा आरोप अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडून करण्यात आला आहे. त्यामुळे या मतदारांवर दबाव टाकणे, धाक दाखवणे व गैरवाजवी प्रभाव टाकण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे मतदारांवर अशा पद्धतीने प्रभाव टाकण्याविरोधात तातडीने प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात यावी व गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी या तक्रारीत करण्यात आली आहे.

सतेज पाटलांचा हल्लाबोल 

दरम्यान, सतेज पाटील यांनी महायुतीवर कडाडून हल्लाबोल केला आहे. गोकुळसाठी एकमुखी नेतृत्वाची का गरज आहे हे सातत्याने सांगण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांनी म्हटलं आहे की, गोकुळाला एकच दार असले पाहिजे, गोकुळला चार दारं असून उपयोग नाही. सहा जणांना विचारून निर्णय होईपर्यंत म्हशीचे दूध आटेल, अशी अवस्था होईल; त्यामुळे निर्णय प्रक्रियेत स्थिरता व एकमुखी निर्णय महत्त्वाचा आहे.  साडेपाच लाख शेतकरी पक्षीय विचार बाजूला ठेवून गोकुळला दूध घालतात; दर दहाव्या दिवशी कष्टाचे पैसे देणारी ही एकमेव संस्था आहे, म्हणून राजकीय ‘पैताण’ बाहेर काढूनच सहकारात काम झाले पाहिजे. महायुतीतील सर्व नेते (कोरे, मुश्रीफ, नरके, मंडलिक, आबिटकर, यड्रावकर) आपापल्या साखर कारखान्यांत, संस्थांमध्ये सक्षमपणे निर्णय घेतात; मात्र गोकुळच्या बाबतीत ते पूर्णपणे हतबल आहेत.

अदृश्य शक्ती एवढी मोठी आहे का? 

अदृश्य शक्ती एवढी मोठी आहे का, की जिल्ह्यातील कॅबिनेट मंत्री सुद्धा तिचे नाव घेऊ शकत नाहीत. अशा अदृश्य शक्तीच्या स्वाधीन गोकुळ करणे म्हणजे ते थेट सरदार पटेल फेडरेशनच्या हवाली करण्यासारखे आहे, असा थेट आरोप त्यांनी केला. जागावाटपापासून ते चेअरमन कोण होणार इथपर्यंत सर्व निर्णय मुंबईतून मुख्यमंत्री ठरवणार असतील, तर हे दुर्दैवी आहे. आमच्या हातून चांगले झाले तर पाठ थोपटायला आणि चुकले तर जाब विचारायला मी जिल्ह्यात हजर आहे; पण मुंबईत निर्णय घेणाऱ्यांना शेतकरी कुठे विचारणार, असा सवाल त्यांनी केला आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या

एबीपी माझामध्ये कोल्हापूर ब्युरो म्हणून गेल्या साडे तीन वर्षांपासून कार्यरत. तसेच टीव्ही 9 मराठी कोल्हापूर ब्युरो म्हणूनही कामाचा अनुभव. 
Read More
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Chandrakant Patil : बावड्यातील डी वाय पाटील महाविद्यालय कोणाच्या जागेवर उभे? आकुर्डीच्या जमिनीची माहिती काढा, सगळं समोर येईल; चंद्रकांत पाटलांचा सतेज पाटलांना इशारा
बावड्यातील डी वाय पाटील महाविद्यालय कोणाच्या जागेवर उभे? आकुर्डीच्या जमिनीची माहिती काढा, सगळं समोर येईल; चंद्रकांत पाटलांचा सतेज पाटलांना इशारा
Rinku Singh : 43 कोटी वाचवण्यासाठी दोन खेळाडूंना रिलीज करा,रिंकू सिंगला केकेआरचा कॅप्टन करा, माजी क्रिकेटपटूनं फॉर्म्युला सांगितला...
केकेआरनं 'त्या' दोघांना रिलीज करावे, 43 कोटी वाचवावे, रिंकूला कॅप्टन बनवा, सल्ला कोणी दिला?
Mantralaya Clerk Protest : मंत्रालयीन लिपिक संवर्गाचा शासनाविरोधात एल्गार, S-10 वेतनश्रेणीसाठी 18 नोव्हेंबरला निदर्शने, तर 25 नोव्हेंबरपासून बेमुदत कामबंद आंदोलनाचा इशारा
मंत्रालयीन लिपिक संवर्गाचा शासनाविरोधात एल्गार, S-10 वेतनश्रेणीसाठी 18 नोव्हेंबरला निदर्शने, तर 25 नोव्हेंबरपासून बेमुदत कामबंद आंदोलनाचा इशारा
दोन्ही शिवसेना एकत्र आल्यास सर्वाधिक आनंदी मीच असेन; ओमराजेंचं वक्तव्य, आदित्य ठाकरेंची एका वाक्यात प्रतिक्रिया
दोन्ही शिवसेना एकत्र आल्यास सर्वाधिक आनंदी मीच असेन; ओमराजेंचं वक्तव्य, आदित्य ठाकरेंची एका वाक्यात प्रतिक्रिया
Advertisement

व्हिडीओ

Rahul Gandhi Phone Tapping Case : वादविवादाचं आवतण 'फोन टॅपिंग'चा बाण | Special Report ABP Majha
Microsoft Outage Today : मायक्रोसॉफ्ट गंडलं, कामकाज कोलमडलं | Special Report ABP Majha
Satej Patil Coffee With Kaushik: शांत झालेल्या गोकुळमध्ये पवारांची एन्ट्री, सतेज पाटलांचे गौप्यस्फोट
Sanjay Raut PC : शरद पवार गट चर्चेलाच तयार नाही, मग सुनेत्रा पवार विलीनीकरण कोणासोबत करणार?
Hasan Mushrif PC Kolhapur : संजय राऊतांनी आमच्यापक्षात नाक खुपसू नये, हसन मुश्रीफांचा इशारा
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Chandrakant Patil : बावड्यातील डी वाय पाटील महाविद्यालय कोणाच्या जागेवर उभे? आकुर्डीच्या जमिनीची माहिती काढा, सगळं समोर येईल; चंद्रकांत पाटलांचा सतेज पाटलांना इशारा
बावड्यातील डी वाय पाटील महाविद्यालय कोणाच्या जागेवर उभे? आकुर्डीच्या जमिनीची माहिती काढा, सगळं समोर येईल; चंद्रकांत पाटलांचा सतेज पाटलांना इशारा
Rinku Singh : 43 कोटी वाचवण्यासाठी दोन खेळाडूंना रिलीज करा,रिंकू सिंगला केकेआरचा कॅप्टन करा, माजी क्रिकेटपटूनं फॉर्म्युला सांगितला...
केकेआरनं 'त्या' दोघांना रिलीज करावे, 43 कोटी वाचवावे, रिंकूला कॅप्टन बनवा, सल्ला कोणी दिला?
Mantralaya Clerk Protest : मंत्रालयीन लिपिक संवर्गाचा शासनाविरोधात एल्गार, S-10 वेतनश्रेणीसाठी 18 नोव्हेंबरला निदर्शने, तर 25 नोव्हेंबरपासून बेमुदत कामबंद आंदोलनाचा इशारा
मंत्रालयीन लिपिक संवर्गाचा शासनाविरोधात एल्गार, S-10 वेतनश्रेणीसाठी 18 नोव्हेंबरला निदर्शने, तर 25 नोव्हेंबरपासून बेमुदत कामबंद आंदोलनाचा इशारा
दोन्ही शिवसेना एकत्र आल्यास सर्वाधिक आनंदी मीच असेन; ओमराजेंचं वक्तव्य, आदित्य ठाकरेंची एका वाक्यात प्रतिक्रिया
दोन्ही शिवसेना एकत्र आल्यास सर्वाधिक आनंदी मीच असेन; ओमराजेंचं वक्तव्य, आदित्य ठाकरेंची एका वाक्यात प्रतिक्रिया
NCP Merger : मोदींना डिलिमिटेशन विधेयक मंजूर करायचंय,15-16 मतांची त्यांना गरज, कदाचित त्यासाठी शरद पवारांच्या 8 खासदारांवर डोळा : पृथ्वीराज चव्हाण
मोदींना डिलिमिटेशन विधेयक मंजूर करायचंय,कदाचित त्यासाठी शरद पवारांच्या 8 खासदारांवर डोळा : पृथ्वीराज चव्हाण
MPSC पेपरफुटीसंदर्भात तक्रार, निवेदनं करण्यास मुदतवाढ; दिवाळीच्या सुट्ट्यांमुळे चौकशी समितीचा निर्णय
MPSC पेपरफुटीसंदर्भात तक्रार, निवेदनं करण्यास मुदतवाढ; दिवाळीच्या सुट्ट्यांमुळे चौकशी समितीचा निर्णय
NCP Merger: मोठी बातमी ! दिल्लीत सुप्रिया सुळे-प्रफुल पटेलांची बैठक; राष्ट्रवादीतील विलीनीकरणाच्या चर्चेला गती, सूत्रांची माहिती
मोठी बातमी ! दिल्लीत सुप्रिया सुळे-प्रफुल पटेलांची बैठक; राष्ट्रवादीतील विलीनीकरणाच्या चर्चेला गती, सूत्रांची माहिती
Gold Rate Weekly Update : सोन्याच्या दरातील घसरणीचा ट्रेंड कायम, पाच दिवसात सोनं 5000 रुपयांनी स्वस्त, 24 आणि 22 कॅरेट सोन्याचे दर IBJA कडून जारी
सोन्याच्या दरातील घसरणीचा ट्रेंड कायम, पाच दिवसात सोनं 5000 रुपयांनी स्वस्त, 24 आणि 22 कॅरेट सोन्याचे दर IBJA कडून जारी
Embed widget