Kaustubh Gawade: पुणे शिक्षक विधानपरिषद मतदारसंघातून भाजपकडून उमेदवारी; स्वामी विवेकानंद शिक्षणसंस्थेचे सीईओ कौस्तुभ गावडे कोण आहेत?
सध्या ते कोल्हापूर येथील 'श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था' येथे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे यांचे ते नातू आहेत.

Kaustubh Gawade: पुणे विभाग विधानपरिषद शिक्षक मतदारसंघातून भाजपकडून स्वामी विवेकानंद शिक्षणसंस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कौस्तुभ मुरलीधर गावडे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. शिक्षकांच्या प्रश्नांची जाण असणारे आणि शिक्षण क्षेत्राशी थेट नाळ जोडलेले व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांची ओळख आहे.
कोण आहेत कौस्तुभ गावडे?
कौस्तुभ गावडे हे उच्चविद्याविभूषित असून त्यांनी 'एम.कॉम' (M.Com) आणि 'एमबीए' (MBA) शिक्षण पूर्ण केले आहे. सध्या ते कोल्हापूर येथील 'श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था' येथे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे यांचे ते नातू असून, आजोबांच्या शैक्षणिक विचारांचा आणि कार्याचा वारसा त्यांना मिळाला आहे. तसेच प्राचार्य अभयकुमार साळुंखे यांच्या मार्गदर्शनातून आणि शैक्षणिक संस्कारातून त्यांची विचारसरणी आकाराला आली आहे.
श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेत मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम करताना कौस्तुभ गावडे यांनी शिक्षक, प्राध्यापक, संस्थाचालक आणि शैक्षणिक प्रशासन यांच्याशी जवळून संवाद साधला आहे. या कार्यकाळात त्यांनी शिक्षकांच्या दैनंदिन अडचणी, शिक्षण संस्थांसमोरील प्रशासकीय व शैक्षणिक आव्हाने यांचा प्रत्यक्ष अनुभव घेतला आहे. त्यांच्या मते, शिक्षकांचे प्रश्न हे केवळ निवडणुकीचे मुद्दे नसून त्यांच्या प्रत्यक्ष अनुभवाचा विषय आहेत. पुणे विभागातील शिक्षक संघटना आणि प्रतिनिधींशी सातत्यपूर्ण संवाद साधून शिक्षकांच्या हितासाठी एकत्र येण्याची भूमिका त्यांनी मांडली आहे.
दोन कोल्हापुरकरांमध्ये पुण्याची लढाई
दरम्यान, पुणे शिक्षक मतदारसंघाची लढाई आता कोल्हापूरमध्येच होणार आहे. काँग्रेसकडून विद्यमान आमदार जयंत आसगावकर यांनाच पुन्हा संधी देण्यात आली आहे. त्यामुळे गेल्या दोन महिन्यांपासून सुरू असलेल्या सीजीपीच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पहिल्यांदाच महायुती विरुद्ध काँग्रेस असा थेट मुकाबला पुणे शिक्षक मतदारसंघ निवडणुकीच्या निमित्ताने होणार आहे.
इतर महत्वाच्या बातम्या
महत्त्वाच्या बातम्या




















