रत्नागिरी-सिंधुदुर्ग : रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून नारायण राणे यांचा ज्येष्ठ पुत्र निलेश राणे यांचा सलग दुसऱ्यांदा पराभव झाल्यानंतर राणेंनी पत्रकार परिषद घेत निवडणुकीच्या निकालावरचं प्रश्नचिन्ह निर्माण केलं आहे. तळकोकणात आम्ही हरलो असलो तरीही पराभव मान्य नसल्यांची मतं नारायण राणे वक्त केलं आहे. तसेच कोकणात सेनेचा उमेदवार निवडुन येण संशयास्पद असल्याचंही राणे म्हणाले.


कालचा निकाल म्हणजे हेराफेरी असून निकालावर संशयाला जागा निर्माण होत असल्याची टीका नारायण राणे यांनी केली आहे. रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात सर्व फेऱ्यांमध्ये 7000 ते 8000 मतांचा फरक कसा दाखवतो असा सवालही उपस्थित केला. तसेच कणकवलीत आमच्या उमेदवाराच्याच मतदारसंघात आम्हाला लीड नाही हेचं संशयास्पद असल्याचं राणे म्हणाले. या निकालावर निवडणूक आयोगाकडे तक्रार विचार करायचा की नाही यावर विचार करुन निर्णय घेणार असल्याचे राणेंनी सांगितले.

VIDEO | सेना, भाजप, काँग्रेससह सगळ्यांचा हिशेब होणार, आत्मचरित्रावर नारायण राणेंची प्रतिक्रिया | एबीपी माझा



रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून नारायण राणे यांचा ज्येष्ठ पुत्र निलेश राणे यांचा सलग दुसऱ्यांदा पराभव झाला आहे. या पराभवामुळे कोकणात माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांना बसलेला मोठा धक्का आहे. नारायण राणे यांनी महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाची स्थापना करत निलेश राणे यांना लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं.

या निवडणुकीत कोण बाजी मारणार? याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागलं होतं. राणेंच्या राजकीय अस्तित्त्वासाठी देखील ही निवडणूक महत्त्वाची होती. मात्र दुसऱ्यांदा पराभवामुळे नारायण राणेंची पुढील राजकीय कारकीर्द कशी असणार, त्यांच्या पराभवाची कारणं काय, यावर आता चर्चा सुरु झाली आहे.

Narayan Rane | काय सांगतात नारायण राणेंचे ग्रहतारे? | ग्रहताऱ्यांच्या गल्लीतून दिल्ली | ABP Majha



संबंधित बातम्या

तळकोकणात नारायण राणेंना धक्का, बालेकिल्लाही त्यांचा राहिला नसल्याची चर्चा