मुंबई : लोकसभा निवडणुकांच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदान काल (गुरुवारी) पार पडलं. या टप्प्यात इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रातील मतदानाची टक्केवारी कमी दिसून आली. दुसऱ्या टप्प्यात महाराष्ट्रात सरासरी 62.91 टक्के मतदानाची नोंद झाली. राज्यात हिंगोलीमध्ये मतदानाला सर्वाधिक प्रतिसाद मिळाला. शुक्रवार 19 एप्रिल 2019 रोजी दुपारी 12 वाजेपर्यंत निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार ही आकडेवारी आहे.
मराठवाड्यातील नांदेड, हिंगोली, परभणी, उस्मानाबाद, बीड, लातूर या सहा, विदर्भातील अकोला, अमरावती, बुलडाणा या तीन आणि पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर, अशा दहा मतदारसंघात मतदान झालं. हिंगोलीमध्ये सर्वाधिक (66.60 टक्के) मतदानाची नोंद झाली, तर सोलापूरवासियांनी मतदानाला सर्वात कमी (58.45 टक्के) प्रतिसाद दिला.
हिंगोली - 66.60 टक्के
बीड - 66.08टक्के
उस्मानाबाद- 63.42 टक्के
नांदेड- 65.16 टक्के
परभणी- 63.16 टक्के
लातूर- 62.20 टक्के
बुलडाणा- 63.68 टक्के
अमरावती - 63.86 टक्के
अकोला- 60 टक्के
सोलापूर- 58.45 टक्के
दुसऱ्या टप्प्यासाठी राज्यात दहा मतदारसंघात 1 कोटी 85 लाख 46 हजार 501 मतदार होते. त्यापैकी 1 कोटी 16 लाख 67 हजार 603 मतदारांनी आपला हक्क बजावला.
हिंगोली मतदारसंघात सर्वाधिक म्हणजे 66.60 टक्के मतदान झालं. तिथे 17 लाख 32 हजार 540 मतदारांपैकी 11 लाख 53 हजार 798 मतदारांनी आपला हक्क बजावला.
बीड मतदारसंघात 20 लाख 41 हजार 190 मतदार होते त्यातल्या 66.08 टक्के म्हणजे 13 लाख 48 हजार 856 मतदारांनी मतदान केलं.
उस्मानाबाद मतदारसंघात 18 लाख 76 हजार 238 मतदार होते, तिथे 63.42 टक्के मतदान झालं म्हणजे 11 लाख 96 हजार 169 मतदारांनी मतदान केलं.
नांदेड मतदारसंघात 65.16 टक्के मतदान झालं. तिथे 17 लाख 17 हजार 830 मतदारांपैकी 11 लाख 19 हजार 116 मतदारांनी आपला हक्क बजावला.
परभणी मतदारसंघात 63.19 टक्के मतदान झालं. तिथे 19 लाख 83 हजार 903 मतदारांपैकी 12 लाख 53 हजार 612 मतदारांनी आपला हक्क बजावला.
लातूर मतदारसंघात 62.20 टक्के मतदान झालं. तिथे 18 लाख 83 हजार 535 मतदारांपैकी 11 लाख 71 हजार 480 मतदारांनी आपला हक्क बजावला.
बुलडाणा मतदारसंघात 17 लाख 58 हजार 943 मतदार होते, तिथे 63.68 टक्के मतदान झालं. म्हणजे 11 लाख 20 हजार 162 मतदारांनी मतदान केलं.
अमरावती मतदारसंघात 18 लाख 30 हजार 561 मतदार होते, तिथे 63.86 टक्के मतदान झालं म्हणजे 11 लाख 5 हजार 947 मतदारांनी मतदान केलं.
अकोला मतदारसंघात 18 लाख 61 हजार 759 मतदार होते, तिथे 60 टक्के मतदान झालं, म्हणजे 11 लाख 16 हजार 980 मतदारांनी मतदान केलं.
सोलापूर मतदारसंघात 18 लाख 50 हजार 2 मतदार होते त्यापैकी 58.45 टक्के म्हणजेच 10 लाख 81 हजार 386 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला
2014 साली मराठवाड्यातील इतर मतदारसंघांच्या तुलनेत बीडमध्ये सर्वाधिक मतदान (68.75 टक्के) झालं होतं. त्या तुलनेत बीडमध्ये यंदा टक्केवारी काहीशी घसरली.
2014 मधील मतदानाची टक्केवारी
2014 मध्ये हिंगोली (66.29 %), अमरावती (62.29%), नांदेड (60.11%), उस्मानाबाद (63.65%), परभणी (64.44%), लातूर (62.69%), अकोला (58.51%), सोलापूर (55.58%), बुलडाणा (61.35%) अशी टक्केवारी होती. म्हणजे गेल्या लोकसभा निवडणुकांच्या तुलनेत यंदा बीड, अमरावती, परभणी या तीन मतदारसंघांमध्ये टक्केवारी घसरली आहे, हिंगोली, उस्मानाबाद, लातूर, या तीन मतदारसंघांमध्ये मतदानाची टक्केवारी जवळपास सारखीच आहे, तर नांदेड, अकोला, सोलापूर, बुलडाण्यामध्ये टक्केवारी सुधारली आहे.
देशात यंदा काय स्थिती?
दुसऱ्या टप्प्यात देशभरात सरासरी 69.02 टक्के मतदान झालं. यापैकी मणिपूरमध्ये सर्वाधिक म्हणजेच 81.09 टक्के मतदान झालं. तर जम्मू काश्मिरमध्ये सर्वात कमी म्हणजेच 45.64 टक्के मतदानाची नोंद झाली. ज्या बारा राज्यांमध्ये काल मतदान झालं, त्यात मतदानामध्ये महाराष्ट्राचा क्रमांक नववा म्हणजेच शेवटून चौथा लागतो.
मणिपूर - 81.09 टक्के
पश्चिम बंगाल - 80.57 टक्के
आसाम - 78.74 टक्के
पुदुच्चेरी - 78.69 टक्के
छत्तीसगड - 74.20 टक्के
ओदिशा - 71.93 टक्के
तामिळनाडू - 71.87 टक्के
कर्नाटक - 68.56 टक्के
महाराष्ट्र - 62.91 टक्के
उत्तर प्रदेश - 62.12 टक्के
बिहार - 61.92 टक्के
जम्मू काश्मिर - 45.64 टक्के
संबंधित बातम्या :
दुसऱ्या टप्प्यात देशभर 66.63 टक्के मतदान, 95 मतदारसंघातील उमेदवारांंचं नशीब मतपेटीत कैद
Loksabha Election 2019 : दुसऱ्या टप्प्यातील मतदारसंघांचा आढावा
Loksabha Election 2019 LIVE BLOG | राज्यातील दहा मतसंघातील मतदानाची अंतिम टक्केवारी
Loksabha Election 2019 : चौथ्या टप्प्यामधील लढतींचे चित्र स्पष्ट, अनेक ठिकाणी चुरस
दुसऱ्या टप्प्यातील उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस, कोणकोणत्या प्रमुख लढती?
विदर्भातील रंगतदार लढती, पहिल्या टप्प्यातील सात मतदारसंघांचा आढावा
शिवसेनेचे उमेदवार काँग्रेस-राष्ट्रवादीच्या 'या' उमेदवारांना भिडणार
गडकरी वि. पटोले, पूनम महाजन वि. प्रिया दत्त, महाराष्ट्रातील बिग फाईट्स
लोकसभा निवडणूक 2019 | महाराष्ट्रात चार टप्प्यात मतदान, मतमोजणी 23 मे रोजी
दुसऱ्या टप्प्यातील मतदानाच्या टक्केवारीत महाराष्ट्र बारा राज्यांमध्ये तळाला
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
19 Apr 2019 08:12 AM (IST)
हिंगोलीमध्ये सर्वाधिक (66.60 टक्के) मतदानाची नोंद झाली, तर सोलापूरवासियांनी मतदानाला सर्वात कमी (58.45 टक्के) प्रतिसाद दिला.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -