राहुल गांधी पंतप्रधान हवे का ते आधी शरद पवारांना विचारा, विनोद तावडेंचा राज ठाकरेंना टोला
एबीपी माझा वेब टीम | 07 Apr 2019 12:45 PM (IST)
बाळासाहेबांचा आदर्श घेऊन चालणाऱ्याने हा नको म्हणून त्याला निवडून द्या हे सांगण बरोबर नाही. एवढाच अभ्यास पक्षासाठी केला असता तर फायदा झाला असता. आधी कष्ट घेतले असते तर दुसऱ्याला मदत करायची वेळ आली नसती असा टोला विनोद तावडेंनी राज ठाकरेंना लगावला.
मुंबई : राहुल गांधी पंतप्रधान हवे का ते आधी शरद पवारांना विचारा, नाहीतर पुढच्या स्क्रिप्ट मिळणार नाही अशी टीका शिक्षण मंत्री विनोद तावडेंनी राज ठाकरेंवर केली आहे. शिवाजी पार्क येथे गुढीपाडव्यानिमित्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे आयोजित पाडवा मेळाव्यात राज ठाकरे यानी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्यावर हल्लाबोल केला. राज ठाकरेंनी केलेल्या या हल्लाबोलचा तावडेंनी समाचार केला. राज ठाकरे देश खड्ड्यात घालायला राहुल गांधींना द्या म्हणाले तो काय मनसे पक्ष आहे का?, स्वतःचं इंजिन बंद पडले आणि हे दुसऱ्यांना मदत करत आहेत अशी टीका विनोद तावडेंनी केली आहे. जे निरुपम राज ठाकरे यांना लुख्खा म्हणाले होते तेच आता मनसैनिकाना सांगणार निरुपम याना मतदान करा. हा तर मनसैनिकांवर होणारा अन्याय असल्याचंही तावडे म्हणाले. VIDEO | राज ठाकरेंच्या भाषणाचा विनोद तावडेंकडून समाचार | मुंबई | एबीपी माझा बाळासाहेबांचा आदर्श घेऊन चालणाऱ्याने हा नको म्हणून त्याला निवडून द्या हे सांगण बरोबर नाही. एवढाच अभ्यास पक्षासाठी केला असता तर फायदा झाला असता. आधी कष्ट घेतले असते तर दुसऱ्याला मदत करायची वेळ आली नसती असा टोला विनोद तावडेंनी राज ठाकरेंना लगावला. तसेच मनसेने सभेत शिवसेना किंवा उद्धव ठाकरे यांचा भाषणात उल्लेख केला नाही, यावर मला वाटत काही नाही. सभेतील भाषणाला राजकीय संदर्भ आहेत, जशी स्क्रिप्ट अली तसे ते बोलले असल्याचेही तावडे म्हणाले. संबंधित बातम्या सीमेवर कर्तव्य बजावणाऱ्या सैनिकांवर खटले दाखल करुन मोदींनी मतांचं राजकारण केलं : राज ठाकरे आमच्या पंतप्रधानाची जगात 'फेकू' अशी ओळख असणे ही लाजिरवाणी बाब : राज ठाकरे