Vijay Wadettiwar on Ashok Chavan : चंद्रपुरात काँग्रेसच्या प्रचाराची धुरा सांभाळणारे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी भाजप खासदार अशोक चव्हाण यांचा जोरदार समाचार घेतला. चंद्रपुरातील छोटा बाजार परिसरात त्यांची सभा ही झाली. कुणाचेही मटण खा आणि कमळाचे बटण दाबा , असे वक्तव्य अशोक चव्हाण यांनी केले होते. त्यांच्या या वक्तव्यावर वडेट्टीवार यांनी जोरदार टीका केली आहे. अशोक चव्हाण यांनी आयुष्यभर काँग्रेसचे मटण खाल्ले आणि आता कमळाचे बटण दाबायला सांगत आहेत अशी टीका विजय वडेट्टीवार यांनी केली.

Continues below advertisement

14 तारखेला नोटांचा वर्षाव होणार

याच सभेत त्यांनी 14 तारखेला मोठा पाऊस पडण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. ढग दाटून येतील आणि जोरदार वर्षाव होणार आहे. हा वर्षाव नोटांचा असणार आहे. या नोटा घ्यायच्या की नाही, ते तुम्ही ठरवा, असेही वडेट्टीवार म्हणाले.

नेमकं काय म्हणाले होते अशोक चव्हाण?

रोज खा मटन आणि दाबा भाजपचे बटन असं अशोक चव्हाण म्हणाले होते. एकाचं मटन खाऊन दुसऱ्याला मतदान अशी भानगड करु नका, मी काही मटन देणार नाही असं अशोक चव्हाण म्हणाले. तुम्ही सगळ्यांचा अनुभव घेतला. सगळ्यात मोठा नगरसेवक अशोक चव्हाण तुमच्यासमोर उभा आहे. मला आणि माझ्या पक्षाला सत्ता द्या यांचे कान मी पकडू शकतो. तुमची कामे आमच्या नगरसेवकांनी केलीच पाहिजे ही माझी गॅरंटी आहे.असेही अशोक चव्हाण म्हणाले. यावेळी अशोक चव्हाण यांनी शिवसेनेवर देखील टीका केली होती. शिवसेनेचे तीन आमदार अनाधिकृत उमेदवाराचा प्रचार करतात. एक आमदार अधिकृत उमेदवाराचा प्रचार करतो. नेमकं उमेदवार कोण हेच कळत नाही. आधी आम्हाला शिव्या घालत होते. आता एकमेकांना शिव्या देत आहेत, अशा शब्दात अशोक चव्हाण यांनी शिवसेनेवर टीका केली. तीन-तीन चार-चार आमदारांची भूमिका वेगळी असेल आणि असे उमेदवार तुम्ही निवडून दिले तर नांदेडचा खेळ खंडोबा झाल्याशिवाय राहणार नाही असं अशोक चव्हाण म्हणाले.

Continues below advertisement

महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय वातावरण चांगलच तापल्याचं पाहायला मिळत आहे. सर्वच राजकीय पक्षांचे नेते मोठ्या संख्येनं प्रचार करत असल्याचं पाहायला मिळत आहे. यावेळी राजकीय नेते एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करताना दिसत आहेत.

महत्वाच्या बातम्या:

कुणी पक्ष देतं का पक्ष! जयंत पाटलांची अवस्था नटसम्राट सारखी झालीय, चंद्रकांत पाटलांचा टोला