Rajinikanth on CM Vijay: तमिळ चित्रपटसृष्टीचे सुपरस्टार रजनीकांत यांनी चेन्नईतील त्यांच्या पोएस गार्डन निवासस्थानी एक अनपेक्षित पत्रकार परिषद बोलावली. तमिळनाडू निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यापासून, रजनीकांत यांच्या मौनाबद्दल प्रसारमाध्यमे आणि राजकीय वर्तुळात विविध चर्चा शिगेला पोहोचल्या होत्या. आता खुद्द सुपरस्टार रजनीकांत यांनी खुलासा केला आहे. दक्षिण भारतातील स्टार सी. जोसेफ विजय यांच्या तमिळनाडू वेत्री कळघम (TVK) या पक्षाने या निवडणुकीत ऐतिहासिक विजय मिळवला. रजनीकांत यांचे मौन पाहून, काहींनी असा दावा केला की ते निवडणुकीच्या निकालांवर नाराज आहेत, तर काहींनी ते पक्ष विलीन करण्याचा प्रयत्न करत असल्याच्या अफवा पसरवल्या. आता, खुद्द थलायवा पुढे आले आहेत आणि त्यांनी सडेतोड उत्तर दिले आहे.

एम. के. स्टॅलिन यांच्यासोबतच्या भेटीबद्दल स्पष्टीकरण दिले

पत्रकार परिषदेच्या सुरुवातीला रजनीकांत यांनी स्पष्टपणे सांगितले की, आज गप्प राहिलो असतो, तर त्यांच्या खोट्या बोलण्यालाच सत्य मानले गेले असते.ते म्हणाले, "निवडणुकीच्या संदर्भात सोशल मीडियावर आणि माध्यमांमध्ये माझ्याबद्दल अनेक खोट्या बातम्या पसरवल्या जात असल्यामुळे मी ही पत्रकार परिषद घेत आहे. निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर मी एम.के. स्टॅलिन यांना भेटायला गेलो होतो, ज्यावर विनाकारण टीका झाली. लोकांनी हे समजून घेतले पाहिजे की आमची मैत्री राजकारणाच्या पलीकडची आहे. कुलाथूर मतदारसंघात एम.के. स्टॅलिन यांच्या पराभवाने मला वैयक्तिकरित्या खूप दुःख झाले. रजनीकांत हे असे क्षुद्र किंवा खालच्या दर्जाचे व्यक्ती नाही जे कोणत्याही गोष्टीचे राजकारण करतील किंवा विनाकारण दावे करतील. मुख्यमंत्री जिंकताच मी त्यांचे लगेच अभिनंदन केले."

विजय यांच्या विजयाबद्दल थलायवा काय म्हणाले?

रजनीकांत यांनी सुपरस्टार विजय यांच्या राजकारणातील प्रवेशाबद्दल आणि थेट मुख्यमंत्रीपद स्वीकारण्याबद्दलही उघडपणे भाष्य केले. ते म्हणाले, "जेव्हा मी पहिल्यांदा ऐकले की विजय मुख्यमंत्री झाले आहेत, तेव्हा मला खरंच आश्चर्य वाटले. मी आता राजकारणात नाही आणि राजकारण सोडून बराच काळ लोटला आहे." माझ्या आणि विजयच्या वयात 28  वर्षांचे अंतर आहे. विजयने तामिळनाडूमध्ये राज्यातील दोन सर्वात मोठ्या आणि प्रस्थापित पक्षांविरुद्ध एकट्याने निवडणूक जिंकली आहे आणि स्वतःच्या बळावर स्वतःचे स्थान निर्माण केले आहे, जे कौतुकास्पद आहे.

जेव्हा रजनीकांत यांनी विजयसाठी ट्विट केले

जेव्हा विजय यांचा शेवटचा चित्रपट, "जना नायक," 9 एप्रिल रोजी एचडी प्रिंटमध्ये ऑनलाइन लीक झाला, तेव्हा रजनीकांत यांनी 10 एप्रिल रोजी याचा निषेध करत लिहिले, "कोणीतरी 'जना नायक' हा चित्रपट ऑनलाइन प्रदर्शित केला हे धक्कादायक आणि दुःखद आहे. चित्रपट प्रदर्शन संघटनांनी याविरोधात आवाज उठवला पाहिजे आणि सरकारने जबाबदार लोकांना ओळखून त्यांना कठोर शिक्षा दिली पाहिजे. भविष्यात असे गुन्हे घडू नयेत."

इतर महत्वाच्या बातम्या