Vasai Virar Municipal Corporation Elections 2026 वसई : वसई–विरार शहर महानगरपालिका (Vasai Virar Elections 2026) निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ईव्हीएम (EVM) मशिनबाबत गंभीर आरोप समोर आले आहेत. ईव्हीएममध्ये उमेदवारांचे नाव आणि चिन्ह दर्शवणाऱ्या कागदावर (बॅलेट युनिट/प्रिंट स्लिप) काही विशिष्ट पक्षांची चिन्हे ठळकपणे दिसत असून इतर पक्षांची चिन्हे फिकी (डल) दिसत असल्याचा आरोप विविध पक्षांच्या उमेदवारांनी केला आहे. विशेषतः ‘कमळ’ (BJP) आणि ‘धनुष्यबाण’ (Shivsena) ही चिन्हे गडद दिसत असताना उर्वरित पक्षांची चिन्हे अस्पष्ट असल्याचे उमेदवारांचे म्हणणे आहे.

Continues below advertisement

 202च्या मुख्य स्ट्रॉंगरूममधून निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या स्ट्रॉंगरूममध्ये हलवण्यात आल्या आहेत. यानंतर आज काही ठिकाणी उमेदवार व त्यांच्या प्रतिनिधींसमोर ईव्हीएम मशिनची प्रत्यक्षिक दाखवून सिलिंगची प्रक्रिया पार पडत आहे. मात्र याच प्रक्रियेदरम्यान संबंधित कागदावर चिन्हांच्या छपाईत तफावत दिसून आल्याने अनेक उमेदवारांनी आक्षेप नोंदवला.

Vasai Virar Elections 2026 : ....तर केवळ कमळ आणि धनुष्यबाण हीच चिन्हे ठळक कशी?

Continues below advertisement

“जर छपाईसाठी एकाच मशिनचा वापर करण्यात आला असेल, तर केवळ कमळ आणि धनुष्यबाण हीच चिन्हे ठळक कशी?” असा सवाल उपस्थित करत उमेदवारांनी निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर संशय व्यक्त केला आहे. याप्रकरणी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी अद्याप कोणताही अधिकृत अभिप्राय दिलेला नाही. या प्रकारामुळे निवडणूक प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून उमेदवारांनी तीव्र निषेध व्यक्त केला आहे.

Vasai Virar Elections 2026 : वसई विरार शहर महानगरपालिका

एकूण प्रभाग - 95 एकूण जागा - 115एकूण उमेदवार - 547

पक्षनिहाय उमेदवार संख्या

बहुजन विकास आघाडी - 105भाजप - 87शिवसेना (शिंदे) - 27राष्ट्रवादी (अजित पवार) - 15मनसे -2 (बविआ सोबत, शिटी चिन्हावर निवडणूक लढणार)काँग्रेस - 10शिवसेना (उद्धव ठाकरे) - 89राष्ट्रवादी (शरद पवार) -00वंचित बहुजन आघाडी -  11बसपा - 15MIM -  ०३श्रमजीवी संघटना - ०५ (भाजपासोबत)आगरी सेना - ०१ (भाजपासोबत)अपक्ष  - १७७

Mira-Bhayandar Municipal Corporation: मिरा भाईंदर महानगरपालिका

एकूण प्रभाग - २४एकूण जागा  -  ९५एकूण उमेदवार - ४३५

पक्षनिहाय उमेदवार संख्या

भाजप - ८७ शिवसेना (शिंदे) - ८१राष्ट्रवादी (अजित पवार) - ३३मनसे - ११काँग्रेस - ३२शिवसेना (उद्धव ठाकरे) - ५६राष्ट्रवादी (शरद पवार)  -  १४वंचित बहुजन आघाडी -  ०२बहुजन विकास आघाडी - ०२ (कॅांग्रेस सोबत)रिपाई - ०१ (भाजपासोबत)अपक्ष  - ११६