Uttarakhand Election 2022 : उत्तराखंडमधील भाजपाचा निवडणूक प्रचाराच्या अभियानाला एक फेब्रुवारीपासून सुरुवात होणार आहे. प्रचारासाठी राज्यात केद्रीय मंत्री आणि भाजपचे अनेक दिग्गज नेते मैदानात उतरणार आहेत. भाजपने रविवारी उत्तराखंडचे निवडणूक प्रभारी म्हणून केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांची नियुक्ती केली आहे. सोमवार, एक फेब्रुवारीपासून उत्तराखंडमध्ये भाजपच्या मेगा निवडणूक प्रचाराला सुरुवात होणार असल्याचे जोशी यांनी सांगितले. मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी, हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर आणि हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री जय राम ठाकुर एक फेब्रुवारी रोजी 500 जणांच्या रॅलीला संबोधित करणार असल्याचे, जोशी यांनी सांगितले.
अमित शाह, राजनाथ सिंह आणि जेपी नड्डा करणार प्रचार
केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी म्हणाले की, उत्तराखंडधील सर्व 70 मतदारसंघात 10-15 ठिकाणी एलईडी लावण्यात येतील. जेणेकरुन लोकांपर्यंत पोहचता येईल.केंद्रीय गृह मंत्री अमित शाह, रक्षा मंत्री राजनाथ सिंह आणि भाजपा अध्यक्ष जेपी नड्डा उत्तरखंडच्या प्रचारामध्ये उतरणार आहेत.
पंतप्रधानही उत्तराखंडमध्ये करणार प्रचार?
जोशी म्हणाले की, उत्तराखंडमधील प्रचारासाठी आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वेळ मागितला आहे. त्यासाठी मोदींनी सहमतीही दर्शवली आहे. पण निवडणूक आयोगाच्या निमयांनुसार प्रचारसभा ठरवण्यात येतील. 31 जानेवारी रोजी निवडणूक आयोग प्रचार आणि रॅलीला परवानगी देण्याची शक्यात आहे. त्यानंतर रणनिती ठरवण्यात येईल.
14 फेब्रुवारीला मदतान -
उत्तराखंडमध्ये यावेळी एकाच टप्यात मतदान होणार आहे. निवडणूक आयोगाने जाहीर केल्यानुसार 14 फेब्रुवारी 2022 रोजी उत्तराखंड विधानसभेसाठी मतदान होईल तर 10 मार्च रोजी मतमोजणी होणार आहे.
उत्तराखंडमध्ये कोणाचे सरकार येईल?
उत्तराखंडमध्ये कोणत्या पक्षाचे सरकार येणार यावरून बरेच तर्क-वितर्क लढवले जात आहेत. या राज्यात आजपर्यंज भाजप आणि काँग्रेस सत्तेत राहिले आहेत. तर बीएसपी या पक्षाची उत्तराखंडमध्ये महत्वाची भूमिका राहिली आहे. उत्तराखंच्या निर्मितीनंतर पहिल्या तीन विधानसभेत बीएसपी हा तिसरा मोठा पक्ष ठरला होता. परंतु, 2017 च्या निडणुकीत या पक्षाला एकही जागा जिंकता आली नाही. उत्तराखंडच्या हरिद्वार आणि नैनीतालमध्ये अनेक जागांचा निकाल हा शेतकऱ्यांच्या मतांवर ठरतो. या भागांत शेतकऱ्यांची संख्या जास्त आहे.