Uddhav Thackeray Raj Thackeray Mumbai Sabha : अवघ्या महाराष्ट्राला उत्सुकता असलेल्या ठाकरे बंधूंची संयुक्त सभा आज शिवतीर्थावर पारपडली. तब्बल 20 वर्षानंतर अवघ्या महाराष्ट्राला हे सुखद चित्र बघायला मिळालंय. या सभेस्थळी (Mumbai) मनसैनिकांनी आणि शिवसैनिकांनी मोठ्या संख्येने गर्दी केल्याचे चित्र बघायला मिळालं. महाराष्ट्र धर्माची पताका गाजवत उत्साहात शिवतीर्थावर या, असं आवाहन राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी केलं होतं. या आवाहनाला मनसैनिकांनी आणि शिवसैनिकांनी मोठ्या संख्येने प्रतिसाद देत शिवतीर्थावर गर्दी केल्याचे दिसून आलं. दरम्यान यावेळी बोलताना दोन्ही ठाकरे बंधूनी भाजप, शिवसेनेसह महायुतीवर चौफेर फटकेबाजी केली. यावेळीउद्धवठाकरेंनीपंतप्रधान मोदींपासूनतेदेवेंद्रफडणवीसांवर (Devendra Fadnavis)जोरदारहल्लाबोलकेलाय.(BMC Election 2026)
राज ठाकरेभाषणाच्यासुरवातीला मराठी बांधवानो म्हणाले. तर उद्धव ठाकरेजमलेल्या हिंदू बांधवानो म्हणाले, यावरून उद्याचीचर्चाहोईल. भाजप महापौर हिंदू होणार बोलले. आम्ही महापौर मराठी होणार म्हणालोय. आत्ता तुम्ही फडणवीस हिंदू आहेत ना? हेतपासलंपाहजे. राज यांनी पोट तिडकीने विषय मांडला, उत्तम मांडणी केली. एवढं पोट तिडकीने सांगितलं, मात्र नुसतं पोटला तड लागून होणार नाही, तर डोक्याला तिडक गेली पाहजे. आणि जर ती जाणार नसेल तर आपल्याला शिवरायांचे नाव घेण्याचा अधिकार नाही. असेही उद्धव ठाकरे म्हणाले. (BMC Election 2026)
Uddhav Thackeray : संयुक्त महाराष्ट्रच्या लढ्यात पहिल्या 5 मध्ये माझे आजोबा
संयुक्त महाराष्ट्रच्या लढ्यात पहिल्या 5 मध्ये माझे आजोबा होते. आत्ता परत तेच सूरु आहे. निवडणूक महापालिकेची कोणती निवडूक आली की रोम्बासोम्बा डान्स भाजप खेळायला लागतात. देवेंद्र फडणवीस यांनी एक आवाहन दिलं की, उद्धव ठाकरेंचं विकासाचं एक भाषण दाखवा त्यांना मी हजार रुपये देतो. मात्र मला त्यांचा चोरीचा पैसा नकोच. पण देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) मी तुम्हाला आवाहन देतो की, मोदींपासून ते तुमचं आणि तुमच्या खालच्या चेल्या-चंपाट्यांचं अगदी वर्गातल्या मॉनिटरची निवडणूक असली तरी हिंदू-मुस्लिम नं करता केलेलं भाषण दाखवा आम्ही सर्व मिळून तुम्हाला एक लाख रुपये देतो. अशी बोचारी टीका शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरेंनी केलीय. अहो मेवाभाऊ तुम्ही आम्हाला काय शिकवताय, हे सगळं अडानीकरण चाललंय. आमच्या मुंबादेवीवरुन मुंबईचं नाव ठेवलं आता त्या मुंबईचं नाव बॉम्बे करण्याचा डाव चालला आहे. असेही उद्धव ठाकरे म्हणाले.
Uddhav Thackeray : रक्तसांडून मुंबई मिळवलीय, आमचा कर्तव्य म्हणून बोलतोय
आज ही सगळी परिस्थिती बघतोय. आपण प्रदूषण बघतोय, हे भ्रष्टाचारचं प्रदूषण आहे..३ लाख कोटींचा घोटाळा या लोकांनी केला आहे 25 वर्षात शिवसेनेनी केलेली काम आणि 3 वर्षात यांनी धुतलेली मुंबई, विचारा लोकांना, आम्ही काय केलं? सिमेंट 50 टक्के पेक्ष जास्त अदानीकडून दिलं जातय. रक्त सांडून मुंबई मिळवली आहे. आमचा कर्तव्य म्हणून हे आक्रमन परतवून लावण्यासाठी आम्ही तुमच्यासारख्या सैनिकांप्रमाणे लढत आहोत. तुम्ही साथ देणार कीं नाही, हे तुम्ही ठरवा असंआवाहनदेखील उद्धव ठाकरे यांनीशिवसैनिकांनाकेलाय.
Uddhav Thackeray : शिवसेना मोदींना नको, दुहीच्या शापाला तुम्ही आज गाडून टाका
शिवसेना मोदींना नको कारण मुंबईला गिळता येणार नाही. तुम्ही मोदींचे बँडवाले आहात तुमचा कसला ब्रँड. ठाकरे आणि पवार नावं पुसून टाकायचे आहेत. बाळासाहेब ठाकरे यांची शिकवण आहे, कोणी अंगावर हात टाकला तर हात उखडून टाका. दुहीच्या शापाला तुम्ही आज गाडून टाका. असेही उद्धव ठाकरे म्हणाले.
Uddhav Thackeray on Devendra Fadnavis : मी काँग्रेससोबत गेलो तर हिंदुत्व सोडलं, अंबरनाथमध्ये फडणवीस तुम्ही काय केलं?
तुम्ही वडिलांकडून काय शिकलात, असा मला मुलाखतीत प्रश्न विचारला. मी म्हटलं ढोंगावरती लाथ मारा. नीट ऐका मी काय म्हणतोय. ढोंगा वरती. यांच्या ढोंगी हिंदुत्ववर लाथ मारा. मी काँग्रेससोबत गेलो तर हिंदुत्व सोडलं, मग अंबरनाथमध्ये फडणवीस तुम्ही काय केलं? भाजप जे करतय ते अमर प्रेम आणि आम्ही जे करतॊय लव्ह जिहाद? मी अजूनही सांगतो फडणवीस स्टेजवर या मी बाजूला राहतो, आदित्य येईल मुद्याचा बोला. आम्ही काय केलं? सांगतो. या मिंदेला विधानसभामध्ये पाठवलं हे पाप मी केलं. संभाजीनगरमध्ये 44 दिवस वर्षातून पाणी येतं, कसं सहन करतात? ४ वर्ष सत्ता तुमच्याकडे आहे. डबल इंजिन म्हणतात. आत्ता ट्रिपल इंजिन आहे. आमच्याकडे मनसे इंजिन आला आणि तुमचा इंजिन वाफा सोडताय असेही उद्धव ठाकरे म्हणाले.
Uddhav Thackeray : .....तर अजित पवारांना लाथ मारून मंत्रीमंडळातून बाहेर काढा, नाहीतर जाहीर माफी मागा
3100 कोटी रुपये निधी भाजपला मिळाला. 11 हजार कोटीची निधी येणं मुंबईला बाकी आहे. तुम्ही मुद्याचं बोला. अदानीच्या थैल्या यांना भरायच्या आहेत. तुषार आपटेला नगरसेवक केलाय. अक्षय शिंदे जिवंत असता आणि तुषार आपटेवर बोलला असता तर आपटे फासावर गेला आसता. आत्ता तुम्हाला वाटताय ना हा एनकाउंटर संशयस्पद आहे. अजित पवार बद्दल 70 हजार कोटीचे पुरावे तुम्ही दिले होते. आता ते खरे असतील तर त्यांना लाथ मारून मंत्रीमंडळातून बाहेर काढा, नाहीतर त्यांची जाहीर माफी मागा. असेही उद्धव ठाकरे म्हणाले.
तब्बल 20 वर्षानी शिवतीर्थावर संयुक्त शिवगर्जना, ठाकरे बंधूंचीचौफेरफटकेबाजी
शिवसेनाआणिठाकरेकुटुंबासाठीशिवतीर्थअर्थातछत्रपतीशिवाजीपार्कशीएकभावनिकनातंआहे. सोबतचहेकेवळएकमैदाननव्हेतरया शिवतीर्थांशीठाकरेंचंमोठंभावनिकआणिऐतिहासिकनातंआहे. मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या (BMC Election 2026) पार्श्वभूमीवर तब्बल 20 वर्षांनीठाकरेबंधूएकत्रआलेआहे. त्यानिमित्याने मनसैनिकांचे आणि शिवसैनिकांचेएकप्रकारे कधीकाळचंस्वप्नसत्यातउतरलंआहे. अशातचआताआगामी महापालिकेतपुन्हाठाकरेबंधूंचीसत्ताप्रस्थापितकरण्यासाठीठाकरेबंधूनीमराठीमतदारांनाभावनिकसादघातलीआहे. तब्बल 75 हजारकोटींचंअर्थसंकल्प 2025 च्यासालातजाहीरकरण्यातआलंहोतं. त्यावरूनयामाहापालिकेचेकेवळदेशातचनव्हेतरआशियाखंडातवेगळंमहत्वआहे. त्यामुळेआतामतदारठाकरेबंधूंच्यायाआवाहनालामतदानातूनकौलदातातका, हेपाहणेमहत्वाचाहीठरणारआहे.
हेही वाचा
