मुंबई : राज्यातील राजकीय वातावरण आता तापायला लागले असून शिवसेना (Shivsena) विरुद्ध शिवसेना आणि राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असा संघर्ष पाहायला मिळत आहे. एकीकडे अद्यापही उमेदवारी मिळावी म्हणून नेत्यांनी मुंबईत नेत्यांच्या बंगल्यावर रांगा लावल्या आहेत. तर, दुसरीकडे उमेदवार यादीत नाव जाहीर झाल्याचे समजताच, एबी फॉर्म घेऊन उमेदवारांकडून जल्लोष केला जात आहे. तसेच, मतदारसंघात कार्यकर्त्यांसह निवडणूक प्रचाराला वेगही आला आहे. त्यातच शिवसेना एकनाथ शिंदे यांच्या पक्षाकडून 45 उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली होती. त्यानंतर, आज उद्धव ठाकरेंच्या (Uddhav Thackeray) शिवसेनेकडून 65 उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे, शिवसेना विरुद्ध शिवसेना असा सामना आता जोरदार रंगणार आहे. उद्धव ठाकरेंकडून शिंदेंच्या शिवसेनेविरोधात पहिल्या यादीतील 33 मतदारसंघात उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे.
महायुती विरुद्ध महाविकास आघाडी यांच्यात विधानसभा निवडणुकीत काँटे की टक्कर होत असताना, शिवसेना विरुद्ध शिवसेना व राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असाही सामना होत आहे. त्यातच, शिंदेंनी 45 उमेदवारांची यादी जाहीर केल्यानंतर आज ठाकरेंनी 65 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. त्यामध्ये, मुंबईत 13 मतदारसंघात उमेदवार दिले आहेत. तर, वरळी मतदारसंघातून आदित्य ठाकरेंना मैदानात उतरवलंय. तसेच, झिशान सिद्दीकी यांच्या वांद्रे पूर्व मतदारसंघातून वरुण सरदेसाई यांना उमेदवारी जाहीर केली आहे. शिंदेंच्या पहिल्या यादीतील सर्वच 33 उमेदवारांविरुद्ध ठाकरेंनी उमेदवार दिले आहेत. त्यामध्ये, प्रताप सरानाईक विरुद्ध नरेश मणेरा, सदा सरवणकर विरुद्ध महेश सावंत, किरण सामंत यांच्याविरुद्ध राजन साळवी, तानाजी सावंत यांच्याविरुद्ध रणजीत पाटील, संजय शिरसाट यांच्याविरुद्ध राजू शिंदे यांना मैदानात उतरवलं आहे.
ठाकरे विरुद्ध शिंदे 33 मतदारसंघातील लढती
शिंदे विरूद्ध ठाकरेकोण आहे मैदानात.
१) कोपरीपाचपखाडीमुख्यमंत्री विरुद्ध केदार दिघे .
२)ओवळा मजिवाडाप्रताप सरनाईक विरूद्ध नरेश मणेरा
३)मागाठणे प्रकाश सुर्वे विरुद्ध उदेश पाटेकर
४)जोगेश्वरी पूर्वमनीषा वायकर विरुद्ध अनंत ( बाळा) नर
५) चांदिवली दिलीप मामा लांडे विरुद्ध अद्याप दिला नाही.
६) कुर्ला मंगेश कुडाळकर विरूध्द प्रवीणा मोरजकर
७)माहिम सदा सरवणकर विरुद्ध महेश सावंत
८)भायखळायामिनी जाधव विरुद्ध अद्याप दिला नाही
९)अलिबागमहेंद्र दळवी विरुद्ध अद्याप दिला नाही
१०)महाडभरत गोगावले विरुद्ध स्नेहल जगताप
११)खानापुर सुहास बाबर विरुद्ध अद्याप दिला नाही
१२)करवीरचंद्रदीप नरके विरुद्ध अद्याप दिला नाही.
१३)राधानगरीप्रकाश आबिटकर विरुध के पी पाटील
१४)राजापूरकिरण सामंत विरुद्ध राजन साळवी
१५)सावंतवाडीदिपक केसरकर विरुद्ध राजन गेली.
१६)कुडाळ निलेश राणे विरुद्ध वैभव नाईक
१७)रत्नागिरीउदय सामंत विरुद्ध सुरेंद्र नाथ माने
१८)दापोलीयोगेश कदम विरूद्ध संजय कदम
१९)पाटण देसाई विरुद्ध हर्षद कदम
२०)सांगोला शहाजी बापू पाटील विरुद्ध साळुंखे
२१)परांडासावंत विरुद्ध राहुल पाटील.
२२)कर्जतमहेंद्र थोरवे विरुद्ध नितिन सावंत
२३)मालेगाव बाह्य दादा भुसे विरुद्ध अदैव्य हिरे
२४)नांदगावसुहास कांदे विरुद्ध गणेश धात्रक
२५)वैजापूर रमेश बोरणारे विरूद्ध दिनेश परदेशी
२६)पैठण विलास भुमरे विरुद्ध अद्याप दिला नाही
२७)संभाजीनगर पश्चिम संजय शिरसाठ विरुद्ध राजू शिंदे
२८)संभाजीनगर मध्यप्रदीप जयस्वाल विरुद्ध किशनचंद तनवाणी
२९)सिल्लोड अब्दुल सत्तार विरुद्ध सुरेश बनकर
३०)कळमनुरी संतोष बांगर विरुद्ध संतोष टारफे
३१)भंडारा नरेंद्र भोंडेकर विरुद्ध अद्याप दिला नाही.
३२)रामटेक आशिष जयस्वाल विरुद्ध विशाल बरबटे
३३)मेहकर डॉ संजय रायमुलकर विरुद्ध सिद्धार्थ खरात.
३४)बुलढाणा संजय गायकवाड विरुद्ध अद्याप दिला नाही
३५)मुक्ताईनगर चंद्रकांत पाटील विरूद्ध अद्याप दिला नाही.
३६)पाचोरा किशोर धनसिंग पाटील विरुद्ध वैशाली सूर्यवंशी.
३७)एरंडोल अमोल पाटील विरुद्ध अद्याप दिला नाही
३८)जळगाव ग्रामीणगुलाबराव पाटील विरुद्ध अद्याप दिला नाही
३९)चोपडाचंद्रकांत सोनावणे विरुद्ध अद्याप दिला नाही
४०) साक्रीमंजूळा गावित विरुद्ध अद्याप दिला नाही.
४१) दर्यापूर अभिजित अडसूळ विरुद्ध अद्याप दिला नाही
४२) दिग्रस संजय राठोड विरूध्द अद्याप नाही
४३) नांदेड उत्तर बालाजी कल्याणकर विरुद्ध अद्याप नाही
४५) जालनाअर्जुन खोतकर विरुद्ध अद्याप नाही