इंदापूर : इंदापूरचे आमदार भरणेंसाठी आता जागाच शिल्लक नाही, ते तरी काय करणार, मात्र भरणेंवर देवेंद्र फडणवीस आणि गिरीश बापट यांचं प्रेम असल्यामुळे अडचण यायची नाही, असं सूचक वक्तव्य सहकारमंत्री सुभाष देसाई यांनी केलं. इंदापूरमधील मानकरवाडी इथे एका खासगी कार्यक्रमात सहकारमंत्री सुभाष देशमुख आणि आमदार दत्तात्रय भरणे यांच्यात जुगलबंदी रंगली. यावेळी बोलताना सुभाष देशमुख यांनी इंदापूर विधानसभेच्या जागा वाटपाबद्दलच्या दुखऱ्या विषयावर बोट ठेवत, आमदार भरणे यांना भाजपची दारे खुली असल्याचं सूचित केलं.
इंदापूरची विधानसभेची जागा कॉंग्रेसला की राष्ट्रवादी काँग्रेसला यावर अद्याप निर्णय झालेला नाही. याबाबत सर्वत्र संभ्रम असतानाच, सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी इंदापूरचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार दत्तात्रय भरणे यांना जागेबाबत टोमणा मारला. ते म्हणाले की, "भरणे मामांसाठी सध्या जागाच शिल्लक नाही. त्यामुळे ते तरी का करणार. पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पालकमंत्री गिरीश बापट यांच्यासह अन्य मंत्र्यांशी आमदार भरणे यांचे चांगले संबंध आहेत. त्यामुळे त्यांना काहीच अडचण येणार नाही."
दरम्यान, सोलापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजय शिंदे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतल्याबाबत विचारणा केली असता, सुभाष देशमुख यांना आपली नाराजी लपवता आली नाही. "ते का भेटले, कधी भेटले हे त्यांनाच विचारा, मला माहिती व्हायला मी काही अंतर्यामी नाही," असं म्हणत त्यांनी आपली प्रतिक्रिया संपवली.
आमदार भरणेंसाठी आता जागाच शिल्लक नाही; ते तरी काय करणार? : सुभाष देशमुख
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
22 Feb 2019 07:36 AM (IST)
इंदापूरची विधानसभेची जागा कॉंग्रेसला की राष्ट्रवादी काँग्रेसला यावर अद्याप निर्णय झालेला नाही. याबाबत सर्वत्र संभ्रम असतानाच, सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी इंदापूरचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार दत्तात्रय भरणे यांना जागेबाबत टोमणा मारला.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -