Kolhapur Mayor Post: कोल्हापूर आणि इचरकंजी महानगरपालिकेसाठी ओबीसी प्रवर्गातून आरक्षण निश्चित झालं आहे. त्यामुळे त्या प्रवर्गातून कोणाला संधी मिळणार याकडे लक्ष असेल. कोल्हापूर आणि इचलकरंजी महानगरपालिकेमध्ये महायुतीला यश मिळालं आहे. इचलकरंजीमध्ये महायुतीने एकहाती सत्ता मिळवली आहे. कोल्हापूरमध्ये महायुतीला काठावरचं बहुमत आहे. त्यामुळे आता महापौर पदावरून कोल्हापूरमध्ये भाजप आणि शिवसेना शिंदे गटामध्ये रस्सीखेच होणार की महापौरपद भाजपला दिलं जाणार याकडे लक्ष असेल. दुसरीकडे आमदार राजेश क्षीरसागर यांनी 15 नगरसेवक असूनही शिवसेनेचा महापौर होणार म्हणत कोल्हापूरमध्ये बॅनरबाजी केली आहे. त्यामुळे आता यामध्ये काही वेगळी समीकरणे सुद्धा आकाराला येणार का याकडे सुद्धा लक्ष असेल.
कोल्हापुरात दोन नावे चर्चेत
दुसरीकडे, इचलकरंजी महानगरपालिकेमध्ये महायुतीला एकहाती सत्ता असल्याने कोणाला संधी मिळणार याकडे लक्ष असेल. संभाव्य नावांमध्ये तानाजी पवार यांचे नाव चर्चेमध्ये समोर येत आहे. दुसरीकडे कोल्हापूर मधून शिवसेनेचे अश्किन आजरेकर आणि भाजपचे विजयसिंह खाडे अशी दोन नावे प्रमुख दावेदारांपैकी आहेत. त्यामुळे आता महायुतीच्या कारभाऱ्यांकडून कोणाला संधी दिली जाणार? याची उत्सुकता आहे. दुसरीकडे, कोल्हापुरात पदांची खांडोळी हा सर्वात चर्चिला गेलेला विषय आहे. त्यामुळे महापौर पाच वर्षांसाठी नेमला जाणार की फिरता चषक करून खांडोळी केली जाणार याचं उत्तर सुद्धा अवघ्या काही दिवसांमध्ये मिळणार आहे. आता आरक्षण निश्चित झाल्याने सत्तास्थापनेसह महापौरपदाचा पेच महायुतीच्या नेत्यांसमोर असेल.
कोल्हापुरातील ओबीसी प्रवर्गातील विजयी उमेदवार
- माधवी प्रकाश गवळी
- विशाल किरण शिराळे
- अनुराधा सचिन खेडकर
- विजयसिंह वसंतराव देसाई
- अजय इंगवले
- अश्किन गणी आजरेकर
- रेखा रामचंद्र उगवे
- कौसर बागवान
- मानसी लोळगे
- प्रमोद देसाई
- विजयसिंह खाडे
- वैभव कुंभार
29 महापालिकांचं महापौर पदाचं आरक्षण
1. छत्रपती संभाजीनगर: सर्वसाधारण2. नवी मुंबई: सर्वसाधारण (महिला)3. वसई- विरार: सर्वसाधारण4. कल्याण- डोंबिवली: अनुसूचित जमाती5. कोल्हापूर: ओबीसी6. नागपूर: सर्वसाधारण (महिला)7. बृहन्मुंबई: सर्वसाधारण (महिला)8. सोलापूर: सर्वसाधारण9. अमरावती: सर्वसाधारण10. अकोला: ओबीसी (महिला)11. नाशिक: सर्वसाधारण (महिला)12. पिंपरी- चिंचवड: सर्वसाधारण (महिला)13. पुणे: सर्वसाधारण (महिला)14. उल्हासनगर: ओबीसी15. ठाणे: अनुसूचित जाती16. चंद्रपूर: ओबीसी (महिला)17. परभणी: सर्वसाधारण (महिला ) (आक्षेप)18. लातूर: अनुसूचित जाती (महिला )19. भिवंडी- निजामपूर: सर्वसाधारण (महिला)20. मालेगाव: सर्वसाधारण21. पनवेल: ओबीसी22. मीरा- भाईंदर: सर्वसाधारण (महिला)23. नांदेड- वाघाळा: सर्वसाधारण (महिला)24. सांगली- मिरज- कुपवाड: सर्वसाधारण25. जळगाव: ओबीसी (महिला)26. अहिल्यानगर: ओबीसी (महिला)27. धुळे: सर्वसाधारण (महिला)28. जालना: अनसूचित जाती (महिला)29. इचलकरंजी: ओबीसी
इतर महत्वाच्या बातम्या
