Thane  municipal election : ठाण्यातील शिंदेंच्या शिवसेनेच्यामाजी महापौर मीनाक्षी शिंदे यांच्या व्हायरल झालेल्या कथित ऑडिओ क्लिपनंतर विटाव्याच्या महिला उमेदवार प्रियंका पाटील यांचा वादग्रस्त व्हिडिओ समोर आला आहे. निवडणुकीच्या प्रचारादरम्यान प्रियंका पाटील मतदारांच्या गाठीभेटी घेत होत्या. त्यावेळी तुम्ही 5 वर्षात कधीच फिरकल्या नाहीत, तुमचे काम नाही असा सवाल स्थानिक मतदारांनी केला. त्यावर प्रियंका पाटील जोरदार भडकल्या आणि सर्वांना सांगा नोटा दाबा आम्ही आमच्या जीवावर निवडून येऊ असे नागरिकांना उद्देशून त्यांनी विधान केले आहे. यासंबंधीची एक व्हिडिओ क्लिप सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून प्रियांका पाटील या टीकेच्या धनी ठरत आहेत.

उमेदवार प्रियंका पाटील यांची मतदारांसोबत बाचाबाचा एक व्हिडिओ व्हायरल 

शिवसेनेच्या ठाणे महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 24 च्या उमेदवार प्रियंका पाटील यांची मतदारांसोबत बाचाबाचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. जाणून बुजून काही जणांनी हा व्हिडिओ व्हायरल केला आहे. तो व्हिडिओ अर्धवट आहे. मी त्या प्रभागात काम केले आहेत असे तिथल्या महिलांनी स्वतः सांगितले आहे. हे देखील त्या व्हिडिओमध्ये रेकॉर्ड झाले आहे. मात्र ते व्हायरल केले गेले नाही. आमच्या प्रभागात ज्यांचे तिकिट कापले गेले आहेत ते हे जाणून बुजून करत असल्याचा आरोप देखील यावेळी पाटील यांनी केला आहे. निवडणुकीच्या प्रचारादरम्यान प्रियंका पाटील मतदारांच्या गाठीभेटी घेत होत्या. त्यावेळी तुम्ही 5 वर्षात कधीच फिरकल्या नाहीत असा सवाल काही मतदारांनी केला होता. यावरुन प्रियंका पाटील भडकल्याचं पाहायला मिळालं.

शिवसेनेचे उमेदवार सिद्धार्थ पांडे यांच्या वडिलांनी केलेल्या गुंडगिरीचा व्हिडिओ केला व्हायरल

ठाण्यात शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार सिद्धार्थ पांडे यांच्या वडिलांनी केलेल्या गुंडगिरीचा व्हिडिओ देखील व्हायरल करण्यात आला आहे. ठाण्यातील गांधी नगर परिसरातील मागील अनेक वर्ष अडकलेले पुनर्वसन प्रकल्पातील बाधितांनी घरचे भाडे मागितल्यानंतर माजी नगरसेवक संजय पांडे यांनी धक्काबुकी , धमकावणे आणि शिवीगाळ केल्याचा व्हिडिओ व्हायरल करण्यात आला आहे. या विरोधात समाज माध्यमात संतापाची लाट उसळली आहे. एकीकडे 10 लाखाचे घड्याळ घालून प्रचार करताना सिद्धार्थ पांडे दिसत आहेत तर दुसरीकडे हक्काचे भाडे मिळत नसल्याने हवालदिल झालेल्या पुनर्वसन प्रकल्प बाधितांमध्ये मोठ्या प्रमाणात रोष निर्माण झाला आहे. 

महत्वाच्या बातम्या:

शिंदेंच्या शिवसेनेचा भाजपला दे धक्का; आमदारावर आरोप, भाजपचे तीन माजी नगरसेवक शिवसेनेत