Thane District Assembly Election 2024 : महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीचा निकाल आज 23 नोव्हेंबरला लागणार आहे. महाराष्ट्रातील 288 विधानसभा मतदारसंघात 20 नोव्हेंबरला निवडणूक पार पडली होती. 20 नोव्हेंबरला उमेदवारांचं भविष्य मतपेट्यांमध्ये बंद झालं होतं. महाराष्ट्र विधानसभेच्या निकालाकडे सर्व देशाचं लक्ष लागलं आहे. आज या मतपेट्या उघडल्या जाऊन विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होईल. ठाणे जिल्ह्यातील एकूण 18 विधानसभा मतदारसंघांतही निवडणूक पार पडली, ज्याची मतमोजणी आज होणार आहे. आज सकाळी 8 वाजेपासून मतमोजणीला सुरुवात होईल. 

आज विधानसभा निवडणुकीचा निकाल

आज विधानसभा निवडणुकीचा निकाल हाती आल्यावर राज्यात नवं सरकार कुणाचं येईल, हे स्पष्ट होईल. ठाणे जिल्ह्यातील एकूण 18 विधानसभा मतदारसंघांताही निकाल आज समोर येईल. आज मतमोजणी होणार आहे. ठाणे जिल्ह्यात अंबरनाथ, उल्हासनगर, ऐरोली, ओवळा-माजिवडा, कल्याण ग्रामीण, कल्याण पश्चिम, कल्याण पूर्व, कोपरी-पाचपाखाडी, ठाणे, डोंबिवली, बेलापूर, भिवंडी ग्रामीण, भिवंडी पश्चिम, भिवंडी पूर्व, मीरा-भाईंदर, मुंब्रा-कळवा, मुरबाड आणि शहापूर या विधानसभा मतदारसंघाचा समावेश आहे. या मतदारसंघातील नवा आमदार कोण हे चित्र आज स्पष्ट होईल.

ठाणे जिल्ह्यातील सर्व 18 मतदारसंघातील विजयी उमेदवारांची यादी

कोपरी पाचपाखडी विधानसभा मतदारसंघ - एकनाथ शिंदे, शिवसेना 

ओवळा-माजिवडा विधानसभा मतदारसंघ - प्रताप सरनाईक, शिवसेना 

ठाणे शहर विधानसभा मतदारसंघ - संजय केळकर, भाजप 

ऐरोली विधानसभा मतदारसंघ - गणेश नाईक, भाजप

बेलापूर विधानसभा मतदारसंघ - मंदा म्हात्रे (भाजप)

उल्हासनगर विधानसभा मतदारसंघ - कुमार आयलानी (भाजप)

अंबरनाथ विधानसभा मतदारसंघ - विश्वनाथ भोईर, शिवसेना

मुंब्रा-कळवा विधानसभा मतदारसंघ - जितेंद्र आव्हाड, शरद पवार

भिवंडी ग्रामीण विधानसभा मतदारसंघ - शांताराम मोरे (शिवसेना)

भिवंडी पूर्व विधानसभा मतदारसंघ - अशोक पाटील, शिवसेना

भिवंडी पश्चिम विधानसभा मतदारसंघ - महेश चौगुले, भाजप

डोंबिवली विधानसभा मतदारसंघ - रविंद्र चव्हाण, भाजप

शहापूर विधानसभा मतदारसंघ - दौलत दरोडा, राष्ट्रवादी

मुरबाड विधानसभा मतदारसंघ - किसन कथोरे, भाजप

मीरा-भाईंदर विधानसभा मतदारसंघ - नरेंद्र मेहता, भाजप

कल्याण पूर्व विधानसभा मतदारसंघ - सुलभा गायकवाड, भाजप

कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघ - राजेश मोरे, शिवसेना

कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघ - बालाजी किणीकर, शिवसेना

ठाणे जिल्ह्यातील 18 विधानसभेतील लढती

विधानसभा मतदारसंघ महाविकासश आघाडी उमेदवार महायुती उमेदवार
भिवंडी ग्रामीण महादेव घाटाळ (शिवसेना- यूबीटी) शांताराम मोरे (शिवसेना)
शहापूर पडुरंग बरोरा (राष्ट्रवादी – एसपी) दौलत दरोडा (राष्ट्रवादी कॉँग्रेस)
भिवंडी पश्चिम दयानंद चोरगे (काँग्रेस) महेश चौघुले (भाजप)
भिवंडी पूर्व रईस शेख (सप) संतोष शेट्टी (शिवसेना)
कल्याण पश्चिम सचिन बासरे (शिवसेना- यूबीटी) विश्वनाथ भोईर (शिवसेना)
मुरबाड सुभाष पवार (राष्ट्रवादी – एसपी) किसन कथोरे (भाजप)
अंबरनाथ राजेश वानखेडे (शिवसेना- यूबीटी) डॉ. बालाजी किणीकर (शिवसेना)
उल्हासनगर ओमी कलाणी (राष्ट्रवादी – एसपी) कुमार आयलानी (भाजप)
कल्याण पूर्व धनंजय बोराडे (शिवसेना- यूबीटी) सुलभा गायकवाड (भाजप)
डोंबिवली दीपेश म्हात्रे (शिवसेना- यूबीटी) रवींद्र चव्हाण (भाजप)
कल्याण ग्रामीण सुभाष भोईर (शिवसेना- यूबीटी) राजेश मोरे (शिवसेना)
मीरा भाईंदर सय्यद मुजफ्फर हुसेन (काँग्रेस) नरेंद्र मेहता (भाजप)
ओवळा माजीवाडा नरेश मनेरा (शिवसेना- यूबीटी) प्रताप सरनाईक (शिवसेना)
कोपरी पाचपाखडी केदार दिघे (शिवसेना- यूबीटी) एकनाथ शिंदे (शिवसेना)
ठाणे राजन विचारे (शिवसेना- यूबीटी) संजय केळकर (भाजप)
मुंब्रा कळवा जितेंद्र आव्हाड (राष्ट्रवादी – एसपी) नजीब मुल्ला (राष्ट्रवादी कॉँग्रेस)
ऐरोली एम. के. मडवी (शिवसेना- यूबीटी) गणेश नाईक (भाजप)
बेलापूर संदीप नाईक (राष्ट्रवादी – एसपी) मंदा म्हात्रे (भाजप)

Disclaimer : निवडणुकीचे निकाल येण्यास सुरुवात झाली आहे. विजयी उमेदवारांची यादी अपडेट होत आहे. त्यानुसार बातमी रिफ्रेश करा.