Thalapathy Vijay Viral Video: थलपती विजय यांच्या मुख्यमंत्री शपथविधी सोहळ्यातील अवघ्या 18 सेकंदाच्या व्हायरल व्हिडिओची जोरदार चर्चा
Thalapathy Vijay Viral Video: सरकार स्थापन करण्यासाठी आपल्या पक्षाला पाठिंबा दिल्याबद्दल मुख्यमंत्री विजय यांनी काँग्रेस, व्हीसीके आणि डाव्या पक्षांचे आभार मानले.

Thalapathy Vijay Viral Video: अभिनेते-राजकारणी सी. जोसेफ विजय यांनी तामिळनाडूचे मुख्यमंत्री म्हणून पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली. यावेळी लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधीही उपस्थित होते. मुख्यमंत्री विजय यांच्यासोबत इतर नऊ मंत्र्यांनीही शपथ घेतली. यामध्ये एन. आनंद, आधव अर्जुन, डॉ. के. जी. अरुणराज, के. ए. सेंगोत्तैयन, पी. व्यंकटरमणन, आर. निर्मलकुमार, राजमोहन, डॉ. टी. के. प्रभू आणि सेल्वी एस. कीर्तना यांचा समावेश आहे. हे सर्व विजय यांच्या टीव्हीके (TVK) पक्षाचे आमदार आहेत. मित्रपक्षांच्या कोणत्याही आमदारांचा मंत्रिमंडळात समावेश करण्यात आलेला नाही. सरकार स्थापन करण्यासाठी आपल्या पक्षाला पाठिंबा दिल्याबद्दल मुख्यमंत्री विजय यांनी काँग्रेस, व्हीसीके आणि डाव्या पक्षांचे आभार मानले.
शपथ घेताच तीन मोठे निर्णय
मुख्यमंत्री झाल्यावर विजय यांनी तातडीने कार्यवाही सुरू केली आणि पहिल्या कागदपत्रांवर स्वाक्षरी केली. यामध्ये 200 युनिट मोफत वीज पुरवठा, महिला सुरक्षा दलाची स्थापना आणि अमली पदार्थ विरोधी पथकाच्या स्थापनेच्या आदेशांचा समावेश आहे.
This is Thalapathi Vijay's most viral and powerful speech.
— Shailendra Yadav (@Shailendraydv61) May 10, 2026
This is a new beginning.
A new era of real, secular social justice starts now
- Vijay pic.twitter.com/6LgrMN0LZL
विजय यांच्या व्हायरल व्हिडिओची चर्चा
दरम्यान, विजय यांच्या शपथविधी सोहळ्यातील अवघ्या 18 सेकंदाच्या व्हायरल क्लिपची सोशल मीडियात जोरदार चर्चा आहे. विजय यांनी शपथ घेताच भाषण दिले. ते म्हणाले, ही एक नवीन सुरुवात आहे. खऱ्या अर्थाने धर्मनिरपेक्ष आणि सामाजिक न्यायाच्या एका नवीन युगाची आता सुरुवात होत आहे. त्यांच्या या वाक्याची सोशल मीडियात चांगलीच चर्चा रंगली आहे.
विजय यांच्या भाषणातील 5 मुद्दे
- पारदर्शकता सुनिश्चित करण्यासाठी आणि पुढे जाण्यासाठी आम्ही राज्याच्या आर्थिक स्थितीवर 'श्वेतपत्र' जारी करू.
- आमचे काम सिद्ध करण्यासाठी आम्हाला पुरेसा वेळ द्या.
- ड्रग्जविरोधात कठोर कारवाई केली जाईल. जनतेच्या पैशाला हात लावला जाणार नाही.
- विजय यांच्याशिवाय सत्तेचे दुसरे कोणतेही केंद्र नसेल; विजय हेच सत्तेचे एकमेव केंद्र असतील.
- खऱ्या, धर्मनिरपेक्ष आणि सामाजिक न्यायाच्या एका नवीन युगाची आता सुरुवात होत आहे.
शपथविधी सोहळ्यादरम्यान विजय काय म्हणाले?
मी, सी. जोसेफ विजय, भारताच्या संविधानाशी खरी निष्ठा आणि एकनिष्ठ राहीन. तामिळनाडूचा मुख्यमंत्री म्हणून, मी भारताची एकता आणि अखंडता टिकवून ठेवीन आणि माझ्या सद्सद्विवेकबुद्धीनुसार माझी कर्तव्ये आणि कायद्याचे पालन करीन. मी कोणालाही घाबरणार नाही किंवा एकतर्फी आदेशांचे पालन करणार नाही. मी न्याय करीन, मी सर्व लोकांना न्याय देईन.
पहिला आदेश 200 युनिट मोफत वीज पुरवठा
मुख्यमंत्री जोसेफ विजय यांनी शपथ घेतल्याबरोबरच कार्यवाही सुरू केली. त्यांनी घरगुती ग्राहकांना 200 युनिट मोफत वीज पुरवठा करणाऱ्या फाईलवर स्वाक्षरी केली. त्यानंतर त्यांनी महिलांच्या सुरक्षेसाठी विशेष दल स्थापन करण्याच्या फाईलवर स्वाक्षरी केली. आपल्या पहिल्या भाषणात मुख्यमंत्री विजय म्हणाले की, ते राजघराण्यातून आलेले नाहीत. जनतेने त्यांचे स्वागत करून त्यांना स्वीकारले आहे. त्यामुळे, ते खोट्या आश्वासनांनी जनतेची फसवणूक करणार नाहीत. मुख्यमंत्री विजय यांनी मागील द्रमुक सरकारवर राज्यावर 10 लाख कोटी रुपयांचे कर्ज लादल्याचा आरोप केला.
इतर महत्वाच्या बातम्या
Before You Go
Vijay Thalapathy : तामिळनाडूनत काँग्रेस का हाथ अभिनेता विजय के साथ



















